Latest Post

प्रतिनिधी राहुरी-आज दिनांक ७ मे रोजी खरीप हंगाम पार्श्वभूमीवर येवले आखाडा राहुरी बुद्रुक येथे आकाश शेटे यांच्या प्रक्षेत्रावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व कापुस शेतीशाळेच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले की एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रकाश सापळे,बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी याबाबींचा वापर शेतीला फायदेशीर ठरेल. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शरदराव लांबे, शेतकरी संदीप कदम,दादा येवले, अमोल जाधव,दादा भवर,महेश येवले, शशिकांत येवले, सुनिल जाधव शेतकरी उपस्थित होते तसेच वळण येथील किसान कृषी सेवा केंद्र  येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गढधे व संचालक युनुस शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अरुण फुलारी, दिलिप डमाळे,विजय रूपनवर,कैलास रूपनवर आदी शेतकरी उपस्थित होते.



नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरणावर महत्त्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी देशात सर्वांना मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्याचे सांगितले. तसेच दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येणार आहे.

जाणून घ्या महत्वाचे मुद्दे-1) देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. २१ जूनपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले. लसनिर्मिती कंपन्यांकडून एकूण उत्पन्नाच्या ७५ टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार आहेत.

2) मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. 

3) भारताने जगात जिथे कुठे उपलब्ध होईल, ते सर्व भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या लढाईत लस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लशीची संपूर्ण देशातून मागणी आहे. लस बनवणारे देश मोजकेच आहे. भारतात जर लस बनवण्याची कंपनी जर नसती तर आपल्या या विशाल देशात काय अवस्था झाली असती. आधी भारताला विदेशातून लस मिळवण्यासाठी खूप कठीण काम होतं. बाहेरच्या देशात लस तयार झाल्यानंतर आपल्याला लस मिळत होती. पोलिओच्या लशीचे तसेच झाले' असेही मोदी म्हणाले.

4)काही लोक या महामारीच्या काळातही भ्रम पसरवत होते, भारताची लस आली त्यावर अनेकांनी शंका उपलब्ध केली. जे लोक लसीबाबत शंक उपस्थित करत होते, ते भोळ्या बाबड्या लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. अशा अफवांपासून सावध राहावं.

5) १ मे पासून राज्यांना २५ टक्के काम सोपवण्यात आले, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.

मुंबई.कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले. गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने सहा जून हा दिवस दरवर्षी शिव स्वराज्य  दिन म्हणून साजरा करावा असे अवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले, ह्या आवाहनास बेलापूर ग्राम पंचायतने प्रतिसाद देऊन सकाळी ९-३० वाजता बेलापूर ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन उत्सहात संपन्न करण्यात आला      सरपंच महेंद्र साळवी उप सरपंच आभिषेक खंडागळे  ,सदस्य व  नागरिक यांनी एकत्र येऊन छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी   ६ जुन १९७४ रोजी शिवराज्याभिषेक केला. होता रयतेचे राज्य शाश्वत् ,निरंतर,चीरकाल रहावे या साठी शिवराज्याभिषेक केला. होता याच दिवशी शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले .तो हाच शुभदिन होय .स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे हे प्रतीक होय, म्हणून दरवर्षी हा सोहळा बेलापूर ग्राम पंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे  सरपंच  महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी संगीतले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी ,मा.सरपंच भरत साळुंके,जि.प्.विस्तार अधिकारी रवींद्र माळी , सदस्य  रवींद्र खटोड,राम पोळ,मुश्ताक शेख,प्रभात कुऱ्हे,प्रा.ज्ञानेश गवले, दिपक क्षत्रिय, दिलीप दायमा, श्रीमती कांबळे मॅडम, लोंढे मॅडम,  भालेराव सर, गागरे मॅडम, कांबळे सर, अनिता कांबळे, सोपान हिरवे, मधुकर गायकवाड, किरण खरोटे, विजय खरोटे, सचिन नगरकर, सचिन साळुंके, रवी बागडे आदी हजर होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-सोमवार दिनांक  ७ जुन पासुन पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर कोपरगाव शिर्डी बस सेवा सुरु करण्यात येणार असुन प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन श्रीरामपुर आगार प्रमुख राकेश शिवदे व प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड  यांनी केले आहे                               श्रीरामपुर आगारातुन पुणे बस सेवा सुरु करण्यात आली असुन त्यास मिळालेला प्रतिसाद पहाता आता उद्यापासुन श्रीरामपुर आगारातुन श्रीरामपुर कोपरगाव श्रीरामपुर पुणे श्रीरामपुर नाशिक श्रीरामपुर शिर्डी श्रीरामपुर औरंगाबाद श्रीरामपुर अकलुज या बस सेवा सुरु करण्यात येणार आहे या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड व आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी केले आहे.

अहमदनगर -मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( बजरंगचौक , श्रीरामपुर), शाम भाऊराव सांळुके (वय २० रा. खटकळी, बेलापुर ता. श्रीरामपूर), आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय १९ रा . कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ , श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ मे २०२१ रोजी सकाळी ६ वा . सुमारे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचे दोस्त मॉडेलची गाडी (एमएच ४२, एम ९४८२) ही मध्ये ४,९१,३२८ रु . किमतीचे भंगार त्यात पितळ, तांबे, अॅल्युमिनीयम व स्टील असे नगर येथे घेऊन जात असतांना शनिशिंगणापूर फाटयाजवळ त्यांना एक पांढऱ्या इर्टीका गाडी मधून ४ इमस येऊन त्यांनी आडवून 'आम्ही पोलीस आहोत' अशी बातावणी करुन शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. बळजबरीने त्यांचेकडील इर्टीका गाडीत बसवून त्यांचे अपहरण करुन त्यांना पुढे वरवंडी गावाचे शिवारात आडरानात नेवून सोडून दिले. गाडी भंगारसह घेऊन गेले आहेत, या चालक श्रीधर जंगलू सोनवणे (रा.लजपतरायवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १४१३/२०२१ भादवी कलम ३२७,३६३,१८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथक गुन्हा दाखल झाला पासुन दिवस-रात्र तांत्रिक विश्लेषानाचे आधारे व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने सदर आरोपीच्या शोधात असतांना पोहेकॉ मनोज गोसावी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली. सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार तसेच मोक्का गुन्हयात जामीनावर मुक्त असलेला तोफीक सत्तर शेख याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. श्री. कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने श्रीरामपूर येथे जाऊन तोफीक सत्तर शेख यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत चौकशी करता त्याने गुन्हा हा त्याचे साथीदार साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा.पापाजलाल रोड , वार्ड नं . २ श्रीरामपुर), जावेद मुक्तार कुरेशी (बजरंगचौक , श्रीरामपुर), युसुफ उर्फ सोनु आजम शेख (रा.लक्ष्मीनगर , कोपरगाव), शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापुरवाले (रा. श्रीरामपुर) यांचेसह मिळून केला असल्याची कबुली दिली. यानंतर साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन, जावेद मुक्तार कुरेशी हे मिळून आल्याने त्यांना श्रीरामपुर मधील वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यता घेतले. तसेच फरार असणारे आरोपी युसुफ उर्फ सोनु आजम शेख (रा . लक्ष्मीनगर , कोपरगाव) व शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापुरवाले (रा . श्रीरामपुर) यांचा त्यांचे राहते घरी जावुन शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा रामगड (ता.श्रीरामपूर) येथील आयशा टेर्डस , नावाचे भंगारवाला आरबाज मन्सुरी उर्फ पिंजारी यास विकेलेला आहे असे सांगितले. या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणी जावुन आरोपी आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय १९ रा. कुरेशी मोहल्ला , सुभेदारवस्ती जवळ , श्रीरामपूर ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यास ताब्यात घेऊन गुन्हयातील चोरीस गेले मालापैकी ५ हजार ९२० रु . किमतीचे १४८ किलो स्टील ( भंगार ) हे आरोपीने काढून दिल्याने ते दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपी तोफीक शेख, जावेद कुरेशी यांना गुन्हा करतांना त्यांनी आणखी कोणी साथीदार आहे काय, असे विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाचे फिर्यादी यांची गाडी भरुन निघाले बाबतची माहिती ही बेलापूर येथील साथीदार शाम सांळुके याने दिल्याचे सांगीतले. आरोपी शाम भाऊराव सांळुके (वय २० रा. खटकळी, बेलापुर ता.श्रीरामपूर जि.अ.नगर) यास ताब्यात घेतले आहे . आरोपी तोफीक सत्तर शेख, साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन हे मोक्का गुन्हयात सध्या जामीनावर मुक्त आहेत. आरोपी तोफीक सत्तर शेख याचेवर लोणी, श्रीरामपूर शहर, कोपरगाव तालुका, रांजणगाव (जि.पुणे), तर आरोपी साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन याचेवर लोणी, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.आरोपी तोफीक सत्तर शेख, साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन, जावेद मुक्तार कुरेशी, शाम भाऊराव सांळुके, आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी यांना मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि.श्री कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ मनोज गोसावी, पोना सुरेश माळी, पोना विशाल दळवी, पोना दिपक शिंदे, पोना शंकर चौधरी, पोकाँ सागर ससाणे, पोकॉ आकाश काळे, पोकॉ जालिंदर माने व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


मुंबई : राज्यामध्ये सोमवार (दि.७) पासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एक ही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 

टप्पा - 1

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत.

👉टप्पा - 2

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबईचा समावेश होतोय. त्यामुळे मुंबईसह इतर पाच जिल्ह्यात खालील नियम लागू राहतीलमुंबईसह या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा बंद राहील.

📥 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील.

📥 मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील.

📥 सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील.

📥 बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील.

📥 कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील.

📥 ई सेवा पूर्ण सुरू राहील.

📥 जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

📥 बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

📥 जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

👉टप्पा - 3

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे.

📥 अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील. 

📥 मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील. 

📥 हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील. 

📥 खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.

📥 इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील.

📥 सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल.

📥 सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार).

📥लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील.

📥 कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.

📥 दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल.

👉टप्पा - 4

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश आहे.

📥अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील.

📥अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील.

📥 सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील.

📥 हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील.

📥 सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार).

📥अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील.

📥 शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती.

📥 स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील.

📥 कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही .

📥 लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक.

📥 राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील.

📥 ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील.

📥 कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.

📥 ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील.

📥सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही.

📥 बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही.

📥संचारबंदीचे नियम लागू राहतील.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget