बेलापुर (प्रतिनिधी )-सोमवार दिनांक ७ जुन पासुन पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर कोपरगाव शिर्डी बस सेवा सुरु करण्यात येणार असुन प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन श्रीरामपुर आगार प्रमुख राकेश शिवदे व प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी केले आहे श्रीरामपुर आगारातुन पुणे बस सेवा सुरु करण्यात आली असुन त्यास मिळालेला प्रतिसाद पहाता आता उद्यापासुन श्रीरामपुर आगारातुन श्रीरामपुर कोपरगाव श्रीरामपुर पुणे श्रीरामपुर नाशिक श्रीरामपुर शिर्डी श्रीरामपुर औरंगाबाद श्रीरामपुर अकलुज या बस सेवा सुरु करण्यात येणार आहे या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड व आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी केले आहे.
Post a Comment