बेलापुर (प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने सहा जून हा दिवस दरवर्षी शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करावा असे अवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले, ह्या आवाहनास बेलापूर ग्राम पंचायतने प्रतिसाद देऊन सकाळी ९-३० वाजता बेलापूर ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन उत्सहात संपन्न करण्यात आला सरपंच महेंद्र साळवी उप सरपंच आभिषेक खंडागळे ,सदस्य व नागरिक यांनी एकत्र येऊन छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जुन १९७४ रोजी शिवराज्याभिषेक केला. होता रयतेचे राज्य शाश्वत् ,निरंतर,चीरकाल रहावे या साठी शिवराज्याभिषेक केला. होता याच दिवशी शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले .तो हाच शुभदिन होय .स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे हे प्रतीक होय, म्हणून दरवर्षी हा सोहळा बेलापूर ग्राम पंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी संगीतले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी ,मा.सरपंच भरत साळुंके,जि.प्.विस्तार अधिकारी रवींद्र माळी , सदस्य रवींद्र खटोड,राम पोळ,मुश्ताक शेख,प्रभात कुऱ्हे,प्रा.ज्ञानेश गवले, दिपक क्षत्रिय, दिलीप दायमा, श्रीमती कांबळे मॅडम, लोंढे मॅडम, भालेराव सर, गागरे मॅडम, कांबळे सर, अनिता कांबळे, सोपान हिरवे, मधुकर गायकवाड, किरण खरोटे, विजय खरोटे, सचिन नगरकर, सचिन साळुंके, रवी बागडे आदी हजर होते.
Post a Comment