प्रतिनिधी राहुरी-आज दिनांक ७ मे रोजी खरीप हंगाम पार्श्वभूमीवर येवले आखाडा राहुरी बुद्रुक येथे आकाश शेटे यांच्या प्रक्षेत्रावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व कापुस शेतीशाळेच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले की एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रकाश सापळे,बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी याबाबींचा वापर शेतीला फायदेशीर ठरेल. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शरदराव लांबे, शेतकरी संदीप कदम,दादा येवले, अमोल जाधव,दादा भवर,महेश येवले, शशिकांत येवले, सुनिल जाधव शेतकरी उपस्थित होते तसेच वळण येथील किसान कृषी सेवा केंद्र येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गढधे व संचालक युनुस शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अरुण फुलारी, दिलिप डमाळे,विजय रूपनवर,कैलास रूपनवर आदी शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment