Latest Post

श्रीरामपूर -प्रतिनिधी - ज्याअर्थी मा मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, आपती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन , मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भ क्रमांक ०१ मधील व मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे संदर्भ क्रमांक ०२ मधील आदेशान्वये राज्यात कोव्हीड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोविङ-१९ विषाणुचा फैलाय रोखण्यासाठी आणि तातडीने काही उपाययोजना करण्यासाठी काही सूचनांचे काटेकोर पालन करणेबाबत आदेशीत केले आहे. त्यामर्थी दिनांक ५.४.२०२१ च्या मध्यरात्रीपासुन पुढील आदेश होईपर्यत अहमदनगर जिल्हयातील मद्य  विकी अनुज्ञप्तीसाठी मद्य विक्रीबाबत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. १. सप्ताहाच्या सोमवार ते शुक्रवार या दिवशी एफएल-३ अनुज्ञप्तीमध्ये ( परवानाकक्ष ) सकाळी ०७.०० ते ११.०० वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी मद्यविक्री करता येईल. तसेच संदर्भीय न.२ नुसार दिलेल्या आदेशात नमुद केलेल्या सुचना तंतोतंत लागू राहतील. २. नमुना एफएल-२ ब एफएल-डब्ल्यू-२ था अनुज्ञप्तीतून घरपोच या प्रकाराने मद्यविक्री करता येईल. नमूना सीएल-३ अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल, ३. अहमदनगर जिल्हयातील सर्व एफएल-१ ( विदेशी मद्याचे ठोक विक्रेते ) व सीएल-२ ( देशी मद्य ठोक विक्रेता ) या अनुज्ञप्तीचे व्यवहार उक्त नमूद गद्य विक्री अनुज्ञप्तीना मद्य पुरवठा करण्यासाठी सकाळी ७..०० ते ११.०० या वेळेत सुरु ठेवता येतील.सिलबंद भाटलीतून घरपोच मद्य देण्याकरीता यापुर्वांच्या मा.शासन व मा.आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. केंद्र सरकार व राज्य शासनाने दिलेले सुचना निर्देशाचे तंतोतल सर्वानी पालन करणे आवश्यक राहिल. तसेच कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत संदर्भ क्रमांक ०२ अन्वये देण्यात आलेले निर्देश व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे कराचयाची असून त्यात कसूर झाल्यास संबधीत अनुशाप्तीधारकाविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ / महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबधीतावर कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा सूचना असतानाही शहरामध्ये शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाईन शॉप मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून याकडे  पोलिसांची मात्र डोळे मिटून गाढ झोप चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. 


कोल्हार-कोल्हार भगवतीपूरमध्ये विनाकारण मोकाट फिरणार्‍यांवर आता कारवाईचा बडगा अन रस्त्यातच अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यास प्रारंभ झाला आहे. पॉझीटिव्ह निघणार्‍या रुग्णांना थेट कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील यांनी दिली.करोनाचा कहर दिवसागणिक नवा उच्चांक गाठत आहे. या महामारीने अनेकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे. शासनाकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही नागरिक सुधारायला तयार नाहीत. मृत्यूचे भयच त्यांना राहिलेले नसल्याने जनता कर्फ्यूमध्ये रस्त्यावर होणार्‍या गर्दीवरून दिसत आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.कोल्हार बुद्रुक व भगवतीपूर ग्रामपंचायत, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी पोलीस आणि तलाठी यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून रस्त्यावर मोकाट भटकणार्‍यांवर अंकुश लावला जात आहे. कोल्हार-बेलापूर रस्त्यावर लोणी पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची जागेवरच अँटिजेंन रॅपिड चाचणी करण्यात येत होती. ज्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह येतील आशा नागरिकांना थेट अ‍ॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.त्यामुळे रस्त्यावर भटकंती करणार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे. यावेळी नगर-मनमाड रस्ता, बेलापूर चौक येथे नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत होती. सदर कारवाईत लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील, पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी, कोल्हार प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप, ग्रामसेवक शशिकांत चौरे, तलाठी सुरेखा अबुज, सहाय्यक फौजदार लबडे, पो. हे. कॉ. राजेंद्र औटी, पो. हे. कॉ. आव्हाड, पो. ना. शिवाजी नर्‍हे व कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

बेलापुर (प्रतिनिधी  )- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे मे महीन्यात मोफत धान्याचे वाटप होणार असुन तसा आदेश कक्ष अधिकारी हेमंत वाडीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.या आदेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा या करीता महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळविण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योंदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील ७ कोटी लाभार्थ्यांना एक महीन्याकरीता मोफत अन्नधान्य गहु तांदूळ  वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत देय धान्य तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असुन एप्रिल महीन्याचे विकतचे धान्य तसेच मे महीन्याचे मोफत धान्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असुन मे महीन्याचे धान्य मोफत देण्यात येणार आहे कार्डधारकांनी त्याचे पैसे देवु नये तसेच दुकानदारांनी मे महीन्यात रेग्यूलर धान्य वाटप करताना पैसे घेवू नये असेही आदेशात म्हटले असुन मे महीन्याच्या धान्यासाठी कार्डधारकांना आता पैसे मोजावे लागणार नाही.

राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी  कान्हु गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून  Dy.S.P. संदीप मिटके व त्यांचे पथकाने ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. *सरकारी पक्षातर्फे   ॲड. श्री शिंपी व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी दिली* . आरोपीच्या बाजूने ॲड.तोडमल व सांगळे यांनी काम पाहिले.

राहुरी-राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार

दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपासDy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. Dy.s.p.मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हो गंगाराम मोरे  वय 46  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून शिताफीने अटक केली आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली DySP   संदीप मिटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख  , स फौ. राजेंद्र  आरोळे, पोहे का सुरेश  औटी, ,  पोलीस कॉन्स्टेबल  नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ ,  आदींनी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संध्याकाळी जिल्ह्यात चौदा दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याच वेळी उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी फेरआदेश काढतील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री बारा वाजेपासून 1 मे च्या सकाळी  7 वाजेपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.
 विवरणपत्र- अ बंद करण्यात आलेल्या बाबी.
हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालु राहील,
धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील,आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील,भाजीपाला/ फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील,
दारु दुकाने पुर्णतः बंद राहतील,टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.सर्व खाजगी कार्यालये पुर्णतः बंद राहतील
कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील ,स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील,विवाह समारंभास बंदी राहील.
चहाची टपरी दुकाने पुर्णतः बंद राहतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पुर्णतः बंद राहतील, सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पुर्णतः बंद राहतील
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पुर्णतः बंद
राहतील,सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पुर्णतः बंद राहतीलसेतू ई-सेवा केंद्र, आधार केंद्र पुर्णतः बंद राहतील, व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मोनिगाइव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पुर्णतः बंद राहतील

विवरणपत्र -
वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी

किराणा दुकाने वेळ सकाळी 7.00 ते 11.00
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री (फक्त ब्दार वितरण),फळे विक्री (फक्त व्दार वितरण)अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री कृषी संबंधीत सर्व सेवा दुकाने पशुखादय विक्री
पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल, डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी 7.00 ते 11.00या वेळेत करता येईल. पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा। मालवाहतूक याकरीता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार करता येनार आसल्याचे पत्रकात नमुद केले आहे.


पुणे ः हिंदू विवाह कायदा आधीच मिस यूज म्हणून वारला जात आहे. महिला या नियमाचा 90 टक्के मीस यूज करत आहेत आणि पुरुष 10 टक्के देखील करत आहेत. परंतु केवळ हिंदू विवाह कायद्यामुळे पुरुषांना न्याय मिळण्याची तरतूद नाही आणि केवळ स्त्रियांसाठी बनविला गेला, पुरुष साठी या कायद्यात काहिच नाहीं या अन्यायामुळे पुरुष आत्महत्या करीत आहेत, तरीही यंत्रणा सुधारण्यास तयार नाही. 

न्याय  देवतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, परंतु न्यायालय अंध नाही किंवा सर्व समजत असूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही का? आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सर्व वेळ का म्हणतात?

असा हा  अत्याचारी , दहशतवादी आणि देशद्रोही   हिंदू विवाह  कायदा बंद करावा आणि पुरुषांना न्याय मिळवा म्हणून हक्क अयोग स्थापन करावा आणि महिलांवर खोटा आरोप सिद्ध करणार्‍या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. यासाठी न्याय मिळाला पाहिजे या साठी आम्ही आमरण उपोषणाला कोर्टासमोर बसणार आहे. विकास महाजन शशीकला गादिया, गणेश गुंजाल, मुकेश खनके आणि पोटगी बंद आंदोलन चळवळीचे नायक अतुल छाजेड पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या वेळी हिंदू विवाह कायद्याची होळी करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget