जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संध्याकाळी जिल्ह्यात चौदा दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याच वेळी उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी फेरआदेश काढतील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री बारा वाजेपासून 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.
विवरणपत्र- अ बंद करण्यात आलेल्या बाबी.
हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालु राहील,
धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील,आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील,भाजीपाला/ फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील,
दारु दुकाने पुर्णतः बंद राहतील,टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.सर्व खाजगी कार्यालये पुर्णतः बंद राहतील
कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील ,स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील,विवाह समारंभास बंदी राहील.
चहाची टपरी दुकाने पुर्णतः बंद राहतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पुर्णतः बंद राहतील, सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पुर्णतः बंद राहतील
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पुर्णतः बंद
राहतील,सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पुर्णतः बंद राहतीलसेतू ई-सेवा केंद्र, आधार केंद्र पुर्णतः बंद राहतील, व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मोनिगाइव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पुर्णतः बंद राहतील
विवरणपत्र -
वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी
किराणा दुकाने वेळ सकाळी 7.00 ते 11.00
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री,भाजीपाला विक्री (फक्त ब्दार वितरण),फळे विक्री (फक्त व्दार वितरण)अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री कृषी संबंधीत सर्व सेवा दुकाने पशुखादय विक्री
पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल, डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी 7.00 ते 11.00या वेळेत करता येईल. पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा। मालवाहतूक याकरीता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार करता येनार आसल्याचे पत्रकात नमुद केले आहे.
Post a Comment