Latest Post


बेलापुर  (प्रतिनिधी  )- पुर्वीच्या सत्ताधार्यांनी चुकीच्या पध्दतीने कामे करुन गैरप्रकार केल्यामुळे जनतेने आपल्या हाती सत्ता दिली असुन आता आपली जबाबदारी वाढली आहे  सर्वांना बरोबर घेवुन आपल्याला विकास कामे करुन गावाची वेगळी ओळख निर्माण करावयाची आहे असे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले  बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमाचा शुभांरभ प्रभाग क्रमांक एक मधील मळहद येथुन करण्यात आला त्या वेळी नवले बोलत होते कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रमेश वाबळे हे होते  जि प सदस्य शरद नवले पुढे म्हणाले की मिळालेल्या सत्तेचा उपयोग  रस्ते पाणी विज आरोग्य गटारी या व्यतीरीक्त अपंग निराधार विधवा परित्यक्त्या अशा गोर गरीबांची कामे आपल्याला करावयाची आहे सार्वजनिक कामा बरोबरच सर्व सामन्य नागरीकांच्या समस्या सोडवा लवकरच गावात एक कोटी रुपयाची विकास कामे  सुरु करण्यात येणार आहे असेही नवले म्हणाले सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की प्रभाग निहाय ग्रामपंचायत आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन आम्ही घरोघर जावुन नागरीकांच्या समस्या समजावुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु  असे सरपंच साळवी म्हणाले उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करण्यात येणार असुन प्रभाग निहाय स्पर्धा वृक्षारोपण निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येतील या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले या उपक्रमांतर्गत मळहद बोरुड गल्ली तकीया मोहल्ला केशवा गोविंदा गल्ली धनगर गल्ली कुंभार वेस येथील नागरीकांच्या घरोघर जावुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या केवळ समस्या जाणून त्यावर उपाय योजनाही केली जाणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे  यांनी सांगितले  या वेळी प्रफुल्ल डावरे गोविंदराव खरमाळे तबसुम बागवान मुस्ताक शेख रमेश अमोलीक माधुरी ढवळे दिलीप दायमा रमेश वाबळे सजंय रासकर तसवर बागवान संजया गोरे मोहम्मंद शेख रमेश काळे अजिज शेख विशाल आंबेकर अमोल गाढेकिरण गागरे श्रीहरी बारहाते विक्रम नाईक रत्नेश गुलदगड हुसेन शेख अन्वर बागवान भरत जाधव निलेश वाबळे शरद म्हैस शफीक बागवान दादा कुताळ कासम बागवान श्रीकांत अमोलीक ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे सचिन वाघ सचिन नगरकर रविंद्र मेहेत्रे महेश कुर्हे  उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक साहेबराव वाबळे यांनी केले तर रामदास वाबळे यांनी आभार मानले.


बेलापुर ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाकडून  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. बेलापुर येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली  तालुक्यातील निपाणी वडगाव व बेलापूर या दोन गावांचा सदर अभियानात समावेश आहे, पैकी बेलापूरगाव हे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली.

       गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, प्रदूषणाची शक्यता जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात येत आहे. श्रीरामपूर  तालुक्यातील बेलापूर गावामधून अभियानास प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लास्टिक , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन , देशी वृक्षारोपन आदिंसह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहितीही गटविकास अधिकारी आभाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगणात एकतरी देशी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून केले. सरपंच महेंद्र साळवी यांनीही पर्यावरण संवर्धनासंदर्भात आपले मत प्रकट केले.

      यावेळी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. उपमुख्याध्यापिका श्रीमती विजया दहिवाळ यांनी शपथ वाचन केले. याप्रसंगी जिप सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे,जलील जनाब, रमेश अमोलिक, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे पत्रकार सुहास शेलार, कासम शेख यांचेसह जिल्हा परिषद मराठी, उर्दू  मुला-मुलिंच्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

अहमदनगर-करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे.मात्र करोना वाढत असल्याने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता आवश्यक बनली आहे. आवश्यकता पडली तर करोना प्रतिबंधासाठी निर्बंध अधिक कडक केले जातील, अशा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी व्हीडिओद्वारे नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लग्न व इतर सोहळ्यांसाठी असणारी निर्बंधाची मर्यादा पाळावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी करोना प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बाजारपेठांसह इतर गर्दीच्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत.जिल्ह्यात सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 12 टक्के आहे. त्यात आता वाढ होताना दिसते आहे. 29 जानेवारीचा आदेश 28 फेब्रुवारीपर्यंत होता. तोच आदेश 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यकता पडली तर त्या आदेशात आणखी निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल. मंदिरे सुरूच राहतील.मात्र शिर्डीप्रमाणे सर्व मंदिरात नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित व्यवस्थापाने घ्यायची आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करीत मास्क वापरावेत.जिल्हयात सध्या 5 हजार 500 बेड उपलब्ध आहेत. व्हॉन्टीलेटर, ऑक्सिजन सिलेंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आयसीयू सज्ज आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नगरमधील मंगल कार्यालयांमध्ये जावून कारवाई केली आहे. आता या पुढे मंगल कार्यालयात गर्दी दिसली तर ते सील केले जातील. पुढील काही दिवस हे सील उघडले जाणार नाही. मास्क वापरलेले दिसले नाही तर नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सोमवारी करोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनपा वैद्यकिय विभागाकडुन भुजबळ फार्म येथील ६० जणांचे स्वॅब घेत ते चाचणीसाठी पाठविले होते..यापैकी पालकमंत्र्यांच्या स्टाफ पैकी 11 जण पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. या सर्वावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी महापालिकेकडुन तातडीने 5 ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन करोना बाधीतांचा आकडा वाढत असतांना सोमवारी (दि.22) रोजी बाधीतांचा आकडा कमी झाल्याचे समोर आली आहे. मात्र शहरात समारंभ, कार्यक्रम, लग्न याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती कायम आहे. यातच पालकमंत्री छनग भुजबळ यांनी रविवारी (दि.21) रोजी शहरात अनेक कार्यक्रम व बैठकांना हजेरी लावल्यानंतर ते करोना बाधीत झाले होते.भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मनपाच्या वैद्यकिय पथकाने भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांचे कुटुंबिय, स्टॉफ, त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते, बदोबस्तांतील पोलीस अशा संपर्कातील 60 जणांची यादी तयार करीत त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले. या सर्व नमुन्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला असुन यातील 11 जण करोना बाधीत असल्याचे समोर आले आहे.या बाधीत बहुतांशी जण हे पालकमंत्री यांच्या निवासस्थानावरील स्टाफ पैकी आहे. यात चालक, अंगरक्षक यांचा समावेश असुन त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असुन उर्वरित 9 जणावर घरीच उपचार सुरु करण्यात आले आहे.


शिर्डी-राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.बाबांची पहाटे होणारी काकड आरती तसेच रात्रीची शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. दर गुरुवारी निघणारा पालखी सोहळा बंद करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी म्हणून रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना बंदी घातली आहे. सदरील आरत्या नित्यनेमाने मोजक्याच पुजार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचप्रमाणे लॉकडाऊनंतर तीन आठवड्यापुर्वी सुरू करण्यात आलेली साईबाबांची पालखी सोहळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बायोमेट्रिक दर्शन व्यवस्था गुरुवारी, शनिवार, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे, असेे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.


आज दि.  23/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1)  संतोष नवनाथ कुसमुडे वय 34 वर्ष रा. कुसमुडे वस्ती वांबोरी ता. राहुरी 2) राहुल सतीश नन्नवरे वय 21 वर्षे रा.राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी 3)  शंकर सुखदेव कात्रज वय 38 वर्षे रा. गडाख वस्ती वांबोरी ता. राहुरी 4) किरण राजेंद्र कुसमुडे रा. राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी यांचेसह 1,03,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य  दोन आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द    राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 177/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

आज दि.  22/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत हरेगाव ते उंदिरगाव जाणारे रोडवर एका टपरी चे आडोशाला  काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1) सचिन लक्ष्मण गायकवाड वय 39 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर 2)दीपक मेघन भोसले वय 45 रा.डी. क्वार्टर ता श्रीरामपूर 3) मयूर सर्जेराव पगारे वय 24 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर यांचेसह 69,240  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य चार आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द   श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 31/21 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget