माझी वसुंधरा अभियानाची बेलापुरात सुरुवात.
गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे, प्रदूषणाची शक्यता जास्त आहे, अशा गावांची निवड या अभियानात करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामधून अभियानास प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, प्लास्टिक , घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन , देशी वृक्षारोपन आदिंसह हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्त्वानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. अशी माहितीही गटविकास अधिकारी आभाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून अंगणात एकतरी देशी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आपल्या भाषणातून केले. सरपंच महेंद्र साळवी यांनीही पर्यावरण संवर्धनासंदर्भात आपले मत प्रकट केले.