श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पुणे शहर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ बनवा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बेलापूर उर्दू शाळेतील उपक्रमशील शिक्षिका, श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या संघटक, तालुका संघाचे अध्यक्ष शकील बागवान यांच्या सौभाग्यवती सौ.महेजबीन शकील बागवान यांचा तसेच डाएट मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री शकील बागवान सर यांचा पाचवा क्रमांक आल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व शहर शिक्षक संघ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली मंडळ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली महिला आघाडी तसेच अहमदनगर जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने छोटेखानी दिमाखदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल, ज्येष्ठ सल्लागार अर्जुन बडोगे, शहर संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड, फारुक पटेल, शाम पटारे, सिताराम भांगरे, वाघोजी पटारे,बाबासाहेब डोखळे,जलील शेख, अनिस शेख, परविन बाजी, शाहीन बाजी, हुसेनाबानो पटेल, यास्मिन शेख, मेहरुन्निसा बाजी,नाझिया शेख, नसीबा बागवान आदि उपस्थित होते .
प्रमुख भाषणात सलीमखान पठाण यांनी शकील बागवान व सौ बागवान या शिक्षक जोडीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये हे पती-पत्नी सदैव सक्रिय असून आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते असे गौरवोद्गार त्यांनी काढले .बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल, अर्जुन बडोगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. शेवटी सौ महेजबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले .
Post a Comment