देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी तुकडेबंदी समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींची स्वाक्षरी असलेले निवेदन तुकडेबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे भेट घेऊन निवेदन दिले असता मंत्री तनपुरे बोलत होते.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण २०११ च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या ३०९९७ इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची ४२ गावे जोडली गेली आहेत. व या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो.
देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास २० कि.मी. परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.
सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. व ते येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी आपणास विनंती की, मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे खास बाब म्हणून अद्यावत सुविधांनी युक्त असे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे कामी आरोग्य मंत्रालयास योग्य ती शिफारस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
या निवेदनावर बोलताना मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी येथील रुग्णालयाच्या जागेचा व देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांची समक्ष भेट घेऊ व खास बाब म्हणून देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळवून देऊ.
Post a Comment