Latest Post

शिर्डी-राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.बाबांची पहाटे होणारी काकड आरती तसेच रात्रीची शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. दर गुरुवारी निघणारा पालखी सोहळा बंद करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी म्हणून रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना बंदी घातली आहे. सदरील आरत्या नित्यनेमाने मोजक्याच पुजार्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचप्रमाणे लॉकडाऊनंतर तीन आठवड्यापुर्वी सुरू करण्यात आलेली साईबाबांची पालखी सोहळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बायोमेट्रिक दर्शन व्यवस्था गुरुवारी, शनिवार, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे, असेे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.


आज दि.  23/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  वांबोरी येथील कुसमुडे वस्ती जवळ काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1)  संतोष नवनाथ कुसमुडे वय 34 वर्ष रा. कुसमुडे वस्ती वांबोरी ता. राहुरी 2) राहुल सतीश नन्नवरे वय 21 वर्षे रा.राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी 3)  शंकर सुखदेव कात्रज वय 38 वर्षे रा. गडाख वस्ती वांबोरी ता. राहुरी 4) किरण राजेंद्र कुसमुडे रा. राहुरी वेस वांबोरी ता. राहुरी यांचेसह 1,03,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य  दोन आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द    राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 177/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

आज दि.  22/02/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत हरेगाव ते उंदिरगाव जाणारे रोडवर एका टपरी चे आडोशाला  काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1) सचिन लक्ष्मण गायकवाड वय 39 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर 2)दीपक मेघन भोसले वय 45 रा.डी. क्वार्टर ता श्रीरामपूर 3) मयूर सर्जेराव पगारे वय 24 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर यांचेसह 69,240  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य चार आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द   श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 31/21 मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा पुणे शहर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ बनवा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बेलापूर उर्दू शाळेतील उपक्रमशील शिक्षिका, श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या संघटक, तालुका संघाचे अध्यक्ष शकील बागवान यांच्या सौभाग्यवती सौ.महेजबीन शकील बागवान यांचा तसेच डाएट मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री शकील बागवान सर यांचा पाचवा क्रमांक आल्याबद्दल श्रीरामपूर तालुका व शहर शिक्षक संघ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली मंडळ, श्रीरामपूर तालुका व शहर गुरुमाऊली महिला आघाडी तसेच अहमदनगर जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने छोटेखानी दिमाखदार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल, ज्येष्ठ सल्लागार अर्जुन बडोगे, शहर संघाचे अध्यक्ष राजू गायकवाड, फारुक पटेल,  शाम पटारे, सिताराम भांगरे, वाघोजी पटारे,बाबासाहेब डोखळे,जलील शेख, अनिस शेख, परविन बाजी, शाहीन बाजी, हुसेनाबानो पटेल, यास्मिन शेख, मेहरुन्निसा बाजी,नाझिया शेख, नसीबा बागवान आदि उपस्थित होते .

 प्रमुख भाषणात सलीमखान पठाण यांनी शकील बागवान व सौ बागवान  या शिक्षक जोडीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये हे पती-पत्नी सदैव सक्रिय असून आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते असे गौरवोद्गार त्यांनी काढले .बाळासाहेब सरोदे, सरदार पटेल, अर्जुन बडोगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. शेवटी सौ महेजबीन बागवान यांनी सर्वांचे आभार मानले .

राहुरी - दि. २१ फेब्रुवारी २०२१- आरोग्य मंत्र्यांना समक्ष भेटून देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. 

     देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी तुकडेबंदी  समितीचे अध्यक्ष तथा  आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींची स्वाक्षरी असलेले निवेदन तुकडेबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी येथे भेट घेऊन निवेदन दिले असता मंत्री तनपुरे बोलत होते. 

      समितीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण २०११ च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या ३०९९७ इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची ४२ गावे जोडली गेली आहेत. व या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो. 

     देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास २० कि.मी.  परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. 

      सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. व ते येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.

       तरी आपणास विनंती की, मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे खास बाब म्हणून अद्यावत सुविधांनी युक्त असे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे कामी आरोग्य मंत्रालयास योग्य ती शिफारस देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.  

       या निवेदनावर बोलताना मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी येथील रुग्णालयाच्या जागेचा व देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांची समक्ष भेट घेऊ व खास बाब म्हणून देवळाली प्रवरा येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळवून देऊ.


भोकर- शेतकर्‍यांची विज बंद करू नका, थकित बिल भरण्यास दोन महिन्याची मुदत द्या, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावू नका,व्यावसायीक व घरगुती विज ग्राहकांना इतर आकार बंद करून ग्राहकांची लुट थांबवा, रोहित्रांची दुरुस्ती करा आदी मागण्यांसाठी काल भोकर येथे क्षत्रीय बेलदार सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे व भोकरचे पसरपंच महेश पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकतास शेतकरी व विज ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सध्या अनेक ठिकाणी रब्बीची पिक शेवटच्या पाण्यावर आहेत, अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याच शेतकर्‍यांना थकित विज बिल भरण्यास मुदत दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान टळून आपली वसुली होईल.शेतात अनेक ठिकाणी विजवाहक तारा हाताच्या अंतरावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवितास धोका होवू शकतो, त्यामुळे त्वरीत अशा धोकादायक विजवाहक ओढून घ्या व अनेक रोहित्रांवरील लग्झ व फ्युज खराब आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करा.घरगुती, व्यापारी व व्यावसायिक विज ग्राहकांच्या मासिक बिलात इंधन आकार, स्थीर आकार आदी प्रकारचे आकाराची आकारणी करून या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे, ती थांबवा अन्यथा यापेक्षा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंदोलकांनी दिला. यावेळी क्षत्रीय बेलदार समाज सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, युवा कार्यकर्ते दिपक पटारे व प्रताप पटारे यांची भाषणे झाली.सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोको आंदोलकांच्या विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी स्विकारत आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या पुर्ण करू, सध्या कुठलेच रोहित्र बंद केले जाणार नाही. सध्या बंद असलेले रोहित्र सुरु करून देत आहोत.परंतू विज बिल वसुली शिवाय पर्याय नसल्याने विज बील वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उर्वरीत मागण्यांबाबत तातडीने कारवाई करून चांगली सेवा देवू, असे आश्वासन यावेळी श्री. कांबळे यांनी आंदोलकांना दिले. त्यांचे समवेत महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक, लाईनमन कैलास घोळवे, गजेंद्र कासार आदिंसह कर्मचारी उपस्थीत होते. या रास्ता रोको दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.यावेळी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, सतिष शेळके, रामदास शिंदे, भागवतराव पटारे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र विधाटे, ज्ञानदेव चव्हाण, सुनिल विधाटे, नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, रविंद्र मते, रमेश साठे, लहानु मते, आप्पासाहेब लोखंडे, रविंद्र आबुज, बजरंग पटारे, मुसा पठाण व राजेंद्र म्हसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व विज ग्राहक उपस्थीत होते.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान, पो. उप निरीक्षक अतुल बोरसे, पो. ना. आबा गोरे, पो. हे. कॉ. सतिष गोरे, रविंद्र पवार, आयुब शेख, पो. काँ. योगेश राऊत आदिंसह मोठा फौजफाटा उपस्थीत होता.


श्रीरामपूर - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामपुरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कालपासून दंडात्मक कारवाई सुरू केली.मास्कचे महत्त्व पटवून सांगत प्रबोधनासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.संपूर्ण महाराष्ट्रातच आता करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभर मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार काल प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस, पालिका प्रशासन यांनी श्रीरामपुरात नेवासा रोड, मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोडवर रस्त्याने फिरून लोकांना मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.सर्व अधिकारी रस्त्याने पायी चालत जात होते. एस. टी. बसस्थानकावर जाऊन एसटीतील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत यावेळी त्यांनी आग्रह केला. याशिवाय एस. टी. कंट्रोलर यांना तशाप्रकारे प्रवाशांना आवाहन करण्यास सांगितले. तसेच विनामास्कच्या कोणत्याही प्रवाशास एसटी बसमध्ये बसू देऊ नये, अशा सूचना त्यांनी वाहक व चालकांना दिल्या. याशिवाय रस्त्याने विनामास्क जाणार्‍या वाहन चालकांवरही यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील जे दुकानदार मास्क न लावता दुकानात बसलेले दिसले त्यांनाही 100 रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येऊन पुन्हा विनामास्कचे आढळल्यास यापेक्षाही मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी तसेच मास्क न लावणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डिवायएसपी संदीप मिटके, पो.नि सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget