Latest Post

भोकर- शेतकर्‍यांची विज बंद करू नका, थकित बिल भरण्यास दोन महिन्याची मुदत द्या, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावू नका,व्यावसायीक व घरगुती विज ग्राहकांना इतर आकार बंद करून ग्राहकांची लुट थांबवा, रोहित्रांची दुरुस्ती करा आदी मागण्यांसाठी काल भोकर येथे क्षत्रीय बेलदार सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे व भोकरचे पसरपंच महेश पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकतास शेतकरी व विज ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सध्या अनेक ठिकाणी रब्बीची पिक शेवटच्या पाण्यावर आहेत, अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याच शेतकर्‍यांना थकित विज बिल भरण्यास मुदत दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान टळून आपली वसुली होईल.शेतात अनेक ठिकाणी विजवाहक तारा हाताच्या अंतरावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवितास धोका होवू शकतो, त्यामुळे त्वरीत अशा धोकादायक विजवाहक ओढून घ्या व अनेक रोहित्रांवरील लग्झ व फ्युज खराब आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करा.घरगुती, व्यापारी व व्यावसायिक विज ग्राहकांच्या मासिक बिलात इंधन आकार, स्थीर आकार आदी प्रकारचे आकाराची आकारणी करून या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे, ती थांबवा अन्यथा यापेक्षा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंदोलकांनी दिला. यावेळी क्षत्रीय बेलदार समाज सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, युवा कार्यकर्ते दिपक पटारे व प्रताप पटारे यांची भाषणे झाली.सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोको आंदोलकांच्या विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी स्विकारत आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या पुर्ण करू, सध्या कुठलेच रोहित्र बंद केले जाणार नाही. सध्या बंद असलेले रोहित्र सुरु करून देत आहोत.परंतू विज बिल वसुली शिवाय पर्याय नसल्याने विज बील वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उर्वरीत मागण्यांबाबत तातडीने कारवाई करून चांगली सेवा देवू, असे आश्वासन यावेळी श्री. कांबळे यांनी आंदोलकांना दिले. त्यांचे समवेत महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक, लाईनमन कैलास घोळवे, गजेंद्र कासार आदिंसह कर्मचारी उपस्थीत होते. या रास्ता रोको दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.यावेळी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, सतिष शेळके, रामदास शिंदे, भागवतराव पटारे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र विधाटे, ज्ञानदेव चव्हाण, सुनिल विधाटे, नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, रविंद्र मते, रमेश साठे, लहानु मते, आप्पासाहेब लोखंडे, रविंद्र आबुज, बजरंग पटारे, मुसा पठाण व राजेंद्र म्हसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व विज ग्राहक उपस्थीत होते.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान, पो. उप निरीक्षक अतुल बोरसे, पो. ना. आबा गोरे, पो. हे. कॉ. सतिष गोरे, रविंद्र पवार, आयुब शेख, पो. काँ. योगेश राऊत आदिंसह मोठा फौजफाटा उपस्थीत होता.


श्रीरामपूर - करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीरामपुरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कालपासून दंडात्मक कारवाई सुरू केली.मास्कचे महत्त्व पटवून सांगत प्रबोधनासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासनाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.संपूर्ण महाराष्ट्रातच आता करोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभर मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार काल प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस, पालिका प्रशासन यांनी श्रीरामपुरात नेवासा रोड, मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोडवर रस्त्याने फिरून लोकांना मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली.सर्व अधिकारी रस्त्याने पायी चालत जात होते. एस. टी. बसस्थानकावर जाऊन एसटीतील प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत यावेळी त्यांनी आग्रह केला. याशिवाय एस. टी. कंट्रोलर यांना तशाप्रकारे प्रवाशांना आवाहन करण्यास सांगितले. तसेच विनामास्कच्या कोणत्याही प्रवाशास एसटी बसमध्ये बसू देऊ नये, अशा सूचना त्यांनी वाहक व चालकांना दिल्या. याशिवाय रस्त्याने विनामास्क जाणार्‍या वाहन चालकांवरही यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील जे दुकानदार मास्क न लावता दुकानात बसलेले दिसले त्यांनाही 100 रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येऊन पुन्हा विनामास्कचे आढळल्यास यापेक्षाही मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी तसेच मास्क न लावणार्‍या वाहन चालकांची धांदल उडाली. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डिवायएसपी संदीप मिटके, पो.नि सानप, मुख्याधिकारी गणेश शिंदे आदींनी केले.

नाशिक - शहरात आठवडाभरात झालेले 5 खून तसेच रोज होणार्‍या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था मोडीत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती उरकताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या आदेशानुसार पोलीस पथकांनी शहरातील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली असून त्यांच्या घराची झाडाझडती घेत घातक शस्त्र बाळगणार्‍या 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.अकबर उर्फ भुर्‍या शेख (रा. खडकाळी, जुने नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे, निखिल उर्फ निक्कु बेग (दोन्ही रा. कथडा), प्रवीण रामदास कुमावत (रा. पोटिंदे चाळ, मखमलाबाद रोड), मदन मारुती पवार (रा.नवनाथनगर, पेठरोड), ऋषिकेश अशोक निकम (रा. आंबेडकरनगर, मालधक्का रोड) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या संशयितांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुरूवारी पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते.शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या गुन्हेगारांचे ठावठिकाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी गोपनीय माहिती घेत पंधरा ठिकाणी छापेमारीचे सत्र राबविण्यात आले. बेकायदेशीरपणे स्वत:जवळ शस्त्रे बाळगणार्‍या संशयितांची माहिती संकलित केली.ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी त्या संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे वॉरंट देत जादा मनुष्यबळही पुरविले. त्यानुसार सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी घरझडती घेत एकाचवेळी पंधरा ठिकाणी छापे टाकले.यावेळी सहा संशशितांना जेरबंद करून पैकी पाच संशयितांकडून 1 गावठी कट्टा, 2 जीवंत काडतुसे, 4 कोयते, 2 तलवारी, 1 चाकू, चॉपरसारखे हत्यारे पोलिसांनी जप्त केली. संशयितांविरुध्द शस्त्रबंदी कायदा, विना परवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमध्ये 17 पोलीस निरिक्षक, 38 उपनिरिक्षक, 206 अंमलदार आणि 35 महिला पोलीस सहभागी झाले होते.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )-नासिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी राहुरी पोलिस ठाणेच्या कामकाजाचा आढावा घेत तालुक्यातील गुन्हेगारी व पोलिसांच्या अडीअडचणी व कायदा व सुवेवस्थे बाबत माहिती घेतली व सुचना केल्या.

यावेळी राहुरी पोलिस ठाणेत पोलिस महानिरिक्षक डाॅ.प्रताप दिघावकर येताच त्यांचे अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे व पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांनी गुलाब पुष्प देवुन स्वागत करत मानवंदना देण्यात आली.

यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांनी सन्मान केला.

पोलिस महानिरिक्षक दर्ज्याचे अधिकारी राहुरी पोलिस ठाणेत भेट देण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

त्यांनी राहुरी पोलिस वसाहातीत जावुन पडझड झालेल्या घराची पाहणी करत सुचना केल्या तसेच गुन्हात जप्त असलेली व बेवारस पडुन असलेल्या वाहानांची विल्लेवाट लावण्याच्या सुचना केल्या अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांना सुचना केल्या तसेच पोलिस ठाणे बाहेर विजय सप्तपदी अभियनाच्या लावलेल्या फलकाचे पाहणी केली व कौतुक करत महसुला प्रशासनास सहकार्य करण्याच्या पोलिस विमागास सुचना दिल्या. तसेच देवळाली प्रवरा येथिल नविन पोलिस ठाणे बाबत अंतराष्ट्रिय खेळाडु आप्पासाहेब ढुस व राष्ट्रिय जल पुरस्कार प्राप्त असलेले शिवाजी घाडगे यांनी डाॅ दिघावरकर,पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली.



 

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी हे जागतिक तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जगभरातून येणार्‍या भाविकांना जवळपासच्या पर्यटनस्थळाची माहिती 

तसेच मार्गदर्शन मिळावे या मूळ हेतूने अद्ययावत वातानुकूलित साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्र उभारणी करण्यात आली असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली असून यामुळे साईमंदिर परिसरात आता पॉलिसी, साईयंत्र विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मंगळवार दि. 16 रोजी दुपारी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर शिर्डी नगरपंचायतच्या जागेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कोपरगाव विधानसभेचे आ. आशुतोष काळे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, नगरसेवक सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश कोते, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. न्याहाळदे, साईमंदीर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक श्री. दातरे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शिर्डी शहरात वर्षाकाठी सुमारे दोन कोटींपेक्षा भाविक साईदरबारी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. एखादी घटना घडल्यानंतर भाविकांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल या मूळ उद्देशाने या पोलीस मदत कक्षाची निर्मिती केली आहे. यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला असल्याचे समजते.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव यांनी सांगितले की, साईमंदिर परिसरात भाविकांना पॉलिसी करणारे तसेच साईयंत्र विक्रेते मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी सदरची पोलीस कक्षाची मदत मिळणार आहे. या पोलीस मदत केंद्रात प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

बहुभाषिक भाविकांबरोबर संवाद साधण्यासाठी बहुभाषिक पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. एकंदरितच या अद्ययावत पोलीस कक्षामुळे भाविकांना सुरक्षा मिळणार असून लुटमार करणार्‍यांंवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

राहुरी प्रतिनिधी मिनाष पटेकर-दिनांक १६ फेब्रुवारी रोजी राहुरी कृषी मंडळ अधिनस्त मौजे आरडगाव व पाथरे खुर्द येथे जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शास्रज्ञ डॉ अनिल दुरगुडे उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की आजच्या परिस्थितीत जमीनीच्या आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरिक्षण करून खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. यावेळी भरमसाठ खतांचा वापर केल्याने होणारे नुकसान यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. मातीपरिक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत केली जाईल असे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले.

कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, सहाय्यक  कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ,आकाश गोरे,बिरू केसकर, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, मंगेश बनकर व भिमराज गडधे यांनी विशेष परिश्रम घेतले. मौजे आरडगाव येथे सुनील मोरे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, कुशाबापू ढेरे, मच्छिंद्र भुसारे,अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब म्हसे, योगेश वाघ,संजय म्हसे, चिमाजी डोईफोडे व सूर्यभान म्हसे तसेच पाथरे खुर्द येथे गिताराम घारकर,रखमाजी जाधव, नारायण टेकाळे,बाळासाहेब जाधव,शिवाजी टेकाळे, हरिभाऊ जाधव,वामन पवार, नानासाहेब पवार, दीपक जाधव, विजय जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.



श्रीरामपूर -श्रीरामपुर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रीया पार पडली असून खर्च सादर करण्याची मुदत संपूनही अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रीया पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरण एक महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक होते. त्यांनी एकत्रित खर्चाचे विवरणपत्र मुदतीत दि. 17 फेब्रुवारी 2021 पुर्वी सादर करणे आवश्यक होते.मुदत संपूनही निवडणूक खर्चाचे विवरण सादर न करणार्‍या उमेदवारांनी केलेल्या कालमर्यादेत निवडणूक खर्चाची विवरणे सादर करण्यात कसुर करतील, त्यांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी निर्रह ठरविण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आलेला आहे.तरी अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा अन्यथा असे उमेदवार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 1 4-ब(1) अन्वये निर्रह ठरविण्यात पात्र राहतील, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget