पोलिसांकडून शहरातील गुन्हेगारांची धरपकड 15 ठिकाणी छापे.

नाशिक - शहरात आठवडाभरात झालेले 5 खून तसेच रोज होणार्‍या घटनांमुळे कायदा सुव्यवस्था मोडीत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती उरकताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांच्या आदेशानुसार पोलीस पथकांनी शहरातील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली असून त्यांच्या घराची झाडाझडती घेत घातक शस्त्र बाळगणार्‍या 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.अकबर उर्फ भुर्‍या शेख (रा. खडकाळी, जुने नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे, निखिल उर्फ निक्कु बेग (दोन्ही रा. कथडा), प्रवीण रामदास कुमावत (रा. पोटिंदे चाळ, मखमलाबाद रोड), मदन मारुती पवार (रा.नवनाथनगर, पेठरोड), ऋषिकेश अशोक निकम (रा. आंबेडकरनगर, मालधक्का रोड) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या संशयितांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुरूवारी पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते.शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या गुन्हेगारांचे ठावठिकाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी गोपनीय माहिती घेत पंधरा ठिकाणी छापेमारीचे सत्र राबविण्यात आले. बेकायदेशीरपणे स्वत:जवळ शस्त्रे बाळगणार्‍या संशयितांची माहिती संकलित केली.ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त पाण्डे्य यांनी त्या संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे वॉरंट देत जादा मनुष्यबळही पुरविले. त्यानुसार सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी घरझडती घेत एकाचवेळी पंधरा ठिकाणी छापे टाकले.यावेळी सहा संशशितांना जेरबंद करून पैकी पाच संशयितांकडून 1 गावठी कट्टा, 2 जीवंत काडतुसे, 4 कोयते, 2 तलवारी, 1 चाकू, चॉपरसारखे हत्यारे पोलिसांनी जप्त केली. संशयितांविरुध्द शस्त्रबंदी कायदा, विना परवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमध्ये 17 पोलीस निरिक्षक, 38 उपनिरिक्षक, 206 अंमलदार आणि 35 महिला पोलीस सहभागी झाले होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget