साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते.

शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी हे जागतिक तिर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जगभरातून येणार्‍या भाविकांना जवळपासच्या पर्यटनस्थळाची माहिती 

तसेच मार्गदर्शन मिळावे या मूळ हेतूने अद्ययावत वातानुकूलित साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्र उभारणी करण्यात आली असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली असून यामुळे साईमंदिर परिसरात आता पॉलिसी, साईयंत्र विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मंगळवार दि. 16 रोजी दुपारी साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर शिर्डी नगरपंचायतच्या जागेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून साईतिर्थ पर्यटन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कोपरगाव विधानसभेचे आ. आशुतोष काळे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, नगरसेवक सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश कोते, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. न्याहाळदे, साईमंदीर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक श्री. दातरे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान शिर्डी शहरात वर्षाकाठी सुमारे दोन कोटींपेक्षा भाविक साईदरबारी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. एखादी घटना घडल्यानंतर भाविकांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल या मूळ उद्देशाने या पोलीस मदत कक्षाची निर्मिती केली आहे. यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला असल्याचे समजते.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव यांनी सांगितले की, साईमंदिर परिसरात भाविकांना पॉलिसी करणारे तसेच साईयंत्र विक्रेते मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी सदरची पोलीस कक्षाची मदत मिळणार आहे. या पोलीस मदत केंद्रात प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

बहुभाषिक भाविकांबरोबर संवाद साधण्यासाठी बहुभाषिक पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. एकंदरितच या अद्ययावत पोलीस कक्षामुळे भाविकांना सुरक्षा मिळणार असून लुटमार करणार्‍यांंवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget