Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  शहरातील अस्वच्छता दुर होऊन स्वच्छता निर्माण व्हावी याउद्देशाने श्रीरामपूर नगर परिषदेमार्फत श्रीरामपूर शहरातील भुयारी गटारीचे नियोजन करून शहरात विविध ठिकाणी भुयारी गटारींची कामे करण्यात आली,

मात्र सदरील कामे ही अर्धवट आणि अपूर्ण असल्याचे दिसून येते आहे, यामुळे शहरातील नागरीकांचा त्रास वाचण्याऐवजी वाढला असून याची प्रचंड चिड सध्या शहरातील नागरीकांमध्ये बघावयास मिळत आहे,

कारण या भुयारी गटारींचे अर्धवट झालेल्या कामांचा सर्वसामान्य नागरीकांना काहीही लाभ होत नाही, याउलट जास्तच मनस्ताप आणि त्रास वाढला आहे, सदरील भुयारी गटारीत कोणीही आपापल्या स्वतःच्या घरातील ड्रेनेज /बाथरुम घाण पाण्याचे कनेक्शन जोडून मोकळा होत आहे, व त्याचा त्रास इतरांना होत आहे, तसेच श्रीरामपूर शहरातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच्या गटारी देखील नेहमीच तुंबलेल्या दिसून येतात,त्यांची वेळोवेळी नित्य नियमाने योग्य साफसफाई होत नाही, शहरातील बहुतांश रस्त्यावरुन खळखळून हे दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी वाहत असते, तथा वेळोवेळी कचरा उचलणारी घंटागाडी देखील येत नसल्यामुळे रस्त्यावर नेहमीच कचऱ्याचे ढीगारे बघावयास मिळतात,त्याचा सर्वच नागरिकांना मोठा त्रास होत होत असून या कमालीच्या अस्वच्छतेमुळे भविष्यकाळात शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची शक्यता ही नाकारता येऊच शकत नाही,

कधीतरी महिन्यातून एखादेवेळी  सदरील कचरा घंटागाडी येते, फक्त त्यावेळीच कचरा कुंड्या साफ दिसतात,मात्र दुसर्यादिवशी  पुन्हा त्या कचऱ्याने ओसांडून वाहताना दिसून येतात, याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यालयात समक्ष भेटून, तथा तोंडी व लेखी समस्या मांडूनही सदरीलबाबी रस्त्यावरील कचऱ्याची तसेच तुंबलेल्या गटारीची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन स्वच्छतेबाबत कुठलीही सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे,

याकरीता मा.मुख्याधिकारी

 साहेबांनी जे.जे.फाऊंडेशनच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे  तथा प्रथम भुयारी गटारीच्या नियोजनाचे काय झाले याचा खुलासा करावा आणि याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने सदरील प्रकरणी नियमितपणे कमीतकमी दिवसांततरी गटारी साफ करण्यात याव्यात,तथा कचरा उचलणारी घंटागाडी ही दैनंदिन पाठविण्यात यावी, याबाबत आपण मा.मुख्याधिकारी साहेबांनी स्वत: जातीने लक्ष घालावे अन्यथा या गंभीर प्रकरणी याविरोधात जे.जे. फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आपल्या मित्र परिवारासह लोकशाही मार्गाने श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनासह अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत तथा यापासून निर्माण झालेल्या बर्या वा वाईट परिणामास संबंधित श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनच जबाबदार राहील असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सदरील निवेदन हे मा.मुख्यधिकार्यासह मा.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,आमदार, खासदार आणि सर्व प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या या निवेदनावर जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार,असिफ तंबोली, अय्युब पठान, अल्तमश शेख, दानिश पठान,जकरिया सैय्यद, अरबाज कुरैशी, मुबसशीर पठान, शाहिद शेख, शकील शेख, गुड्डू जमादार, अनवर तंबोली, मोसीन कुरैशी,नईम बागवान, शादाब पठान,फरहान शेख,आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


 बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक विश्लेषन

बेलापुर ( देविदास देसाई )- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रात्रीतुन झालेली युती अमान्य झाल्यामुळे अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका जनता विकास अघाडीला बसल्यामुळे त्यांना केवळ सहाच जागेवर समाधान मानावे लागले  मात्र गावकरी मंडळाने गाव विकासाचा आराखडा जनते सामोर ठेवुन सत्ताधार्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे सभामधुन काढले ते जनतेला भावले त्यामुळे गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या                                             प्रभाग क्रमांक एक हा जनता अघाडीचा अभेद्य प्रभाग होता प्रत्येक निवडणूकीत या प्रभागात जनता अघाडीने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो विजयी होत होता परंतु या निवडणूकीत जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड उभे होते परंतु यांवेळी त्यांचीही दमछाक झाली या प्रभागात सलग दोन पंच वार्षिक सदस्य राहीलेल्या शेख शिरीन जावेद यांना पराभव पत्करावा लागला तो ही केवळ ४५ मतांनी त्यात काहींना कोणते बटन दाबावयाचे हे न समजल्यामुळे नोटा बटन दाबले गेले तसेच जनता अघाडीने नाकारल्यामुळे सय्यद बेगम अबुताहेर यांनी अपक्ष निवडणूक लढविली त्यात त्यांना ९० मते मिळाली अपक्ष उमेदवारांचा फटका हा शिरीन शेख यांना बसला व गावकरी मंडळाचा विजय झाला रंजना बोरुडे या ही केवळ २१ मताच्या फराकाने विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील अपक्ष उमेदवार कैलास चायल मुळे चुरशीची लढाई झाली दोन वेळेस सरपंच राहीलेले भरत साळुंके यांचा केवळ ६८ मतांनी विजय झाला गांवकरी मंडळाचे प्रफुल्ल डावरे यांनी जोरदार लढत दिली त्यांना ५५४ मते मिळाली तर अपक्ष असलेले कैलास चायल यांनी ५४१ मते मिळविली तर याच प्रभागात चुकुन उमेदवारी अर्ज राहीलेल्या पवार नंदा अनिल यांचा फटका जनता अघाडीलाच बसला या ठिकाणी गावकरी मंडळाच्या सविता उत्तम आमोलीक ६१ मताच्या फरकाने विजयी झाल्या तर  नंदा पवार यांनी जाहीरपणे जनता अघाडीला पाठींबा दिलेला असतानाही त्यांना ८६ मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन हा अरुण पा नाईक यांच गड म्हणून ओळखला जात होता या भागातुन कुठल्याही निवडणूकीत अरुण पा नाईक यांना मताधैक्य असायचे परंतु या वेळी नवखा तरुण तडफदार उमेदवार अभिषेक खंडागळे याने ४४० मताच्या फरकाने विजयी झाला अरुण पा नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांना ५७८ मते मिळाली तर अपक्ष असणारे शेख नवाज ईलीयास यांना ४५६ मते मिळाली प्रभाग क्रमांक  पाच मध्ये साळवी महेंद्र जगन्नाथ हे २१६ मताच्या फरकाने विजयी झाले या ठिकाणी अपक्ष उमेदवार अच्छेलाल यादव यांना १०७ मते मिळाली सुविध भोसले यांना ६२ मते मिळाली तर नोटा १७ मते मिळाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये मिना अरविंद साळवी या ५२ मताच्या फरकाने विजयी झाल्या तेथे कविता झीने यांना ९३ मते मिळाली या ठिकाणीही अपक्षामुळे गडबड झाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवखे उमेदवार चंद्रकांत नवले हे १४७ मताच्या फरकाने विजयी झाले या प्रभागात तीन जण अपक्ष उभे होते  प्रकाश पाटणी यांना ६३ अच्छेलाल यादव यांना ६३  राशिनकर राजेंद्र  यांना ५४ मते मिळाली त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी सर्व उमेदवारांची बेरीज वजाबाकी बिघडवण्याचे काम केले हे ही तितकेच  सत्य आहे.

श्रीरामपूर :-( प्रतिनिधी)आय.पी. एस. पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी श्रीरामपूर शहरातील तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ उत्कृष्टपणे पूर्ण केला शहरात कायदा व सुव्यवस्था दृढ करण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाचे संरक्षणाची काळजी घेतली विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात शहर व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले होते. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले होते. आज रोजी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून श्रीरामपूर करांचा निरोप घेतला. यावेळी त्यांना निरोप देणे करिता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या

अप्पर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक श्री. मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खान साहेब आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी गेल्या तीन महिने उत्कृष्टपणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, शेख गुलाब भाई वायरमन इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद,स्वप्नील सोनार, फकीर मोहंमद शेख, देविदास देसाई, जयेश सावंत, सुभाषराव गायकवाड, अमन शेख, शहबाज पठाण, रुषीकेष पोल.सचीन केदार, रोहित भोसले,युनूस इनामदार, हर हर ,अमोल शिरसाट, अँड.डोके, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, राजमोहंमद शेख, कलीम बिनसाद, मोहसीन शेख,आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र लघु उत्त पत्र व पत्रकार संघ च्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की श्रीरामपूर शहरासाठी असाच निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी द्यावा.



बेलापूर(देविदास देसाई )बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत गावकरी मंडळाने ११ जागा जिंकुन सत्ता मिळविली. तर प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या जनता विकास आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

जि. प. अध्यक्ष शरद नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे,भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखाली गावकरी मंडळाचे सौ. तबसुम आसिफ बागवान,सविता उत्तमराव अमोलिक, अभिषेक भास्करराव खंडागळे, सौ.प्रियंका प्रभात कु-हे,मुस्ताक उमर शेख,महेंद्र जगन्नाथ साळवी,सौ. मिना अरविंद साळवी, वैभव विलास कु-हे,चंद्रकांत मोहनराव नवले,सौ. उज्वला रविंद्र कुताळ,व रमेश कमलाकर अमोलिक हे विजयी झाले. प्रभाग पाच मधून गावकरी मंडळाचे महेंद्र साळवी व .सौ. मिना साळवी हे दिर भावजयी गावकरी मंडळाकडून विजयी झाले.

तर पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे रविंद्र मुरलीधर खटोड,भरत अशोकराव साळुंके, सौ. रंजना किशोर बोरुडे, सौ. शिला राम पोळ,सौ. सुनीता राजेंद्र बर्डे व सौ.छाया बाळासाहेब निंबाळकर हे सहा उमेदवार विजयी झाले.


प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे-

*प्रभाग-१*    रविंद्र मुरलीधर खटोड   *विजयी* ज वि आ (७४१),संजय बापूराव गोरे-पराभूत गा मं (५६१)राजेंद्र राशीनकर-पराभूत-स्वतंत्र(३३),

सौ. रंजना किशोर बोरुडे-* *विजयी* ज वि आ (६७१),सौ. माधुरी प्रशांत ढवळे पराभूत- गा मं (६५०),सौ. तबसुम असिफ बागवान *विजयी* गा मं (६३०),सौ. शिरीन जावेद शेख-पराभुत ज वि आ (५८५),सौ.सय्यद बेगम आबुताहेर-पराभूत-स्वतंत्र(९०)

*प्रभाग-२* भरत अशोकराव साळुंके   *विजयी* ज वि आ (५८६),प्रफुल्ल हरिहर डावरे-पराभुत गा मं (५५४),कैलास मदनलाल चायल -पराभूत स्वतंत्र(५४१)

कु. सविता उत्तमराव अमोलिक *विजयी* गा मं (८१८),सौ. छाया विलास सोनवणे-पराभुत ज वि आ (७५७),सौ. नंदा अनिल पवार -पराभूत स्वतंत्र(८६)

सौ. शिला राम पोळ *विजयी* ज वि आ (९३६),सौ. सोनाली हेमंत बनभेरू पराभुत-गामं(७२८)

*प्रभाग-३* अभिषेक भास्करराव खंडागळे *विजयी* गा मं ( १०१८ ),चंद्रकांत गुलाबराव नाईक-पराभुत ज वि आ ( ५७८     ),नवाज इलियास शेख-पराभूत स्वतंत्र( ४५६ ),

सौ. प्रियंका प्रभात कु-हे- *विजयी* गा मं  ( ११४५),सौ.गौरी चेतन कु-हे पराभूत ज वि आ (८७० )


*प्रभाग-४* मुश्ताक उमर शेख- *विजयी* गा मं ( ९१०), हरुन महेमुद सय्यद पराभुत -ज वि आ (६९६),सौ. छाया बाळासाहेब निंबाळकर *विजयी* ज वि आ (  ८१६),सौ. कल्याणी रमेश लगे पराभूत गा मं (७९४  ),सौ. सुनीता राजेंद्र बर्डे *विजयी* ज वि आ ( ८५२),सौ. कमल भगवान मोरे पराभुत गा मं( ७४८)


*प्रभाग-५* महेंद्र जगन्नाथ साळवी *विजयी* गा मं ( ७२२    ),विशाल डॅनियल साळवे पराभुत ज वि आ (  ५०६ ), अच्छेलाल यादव पराभुत -स्वतंत्र (१०७),सुविध भोसले पराभुत स्वतंत्र(१७),वैभव विलास कु-हे *विजयी* गा मं ( ७०८),विजय लहू कु-हे  पराभूत ज वि आ (६७३) ,      ,सौ.मिना अरविंद साळवी *विजयी* गा मं  (  ६५९ ),सौ.राणी मिलिंद एडके -पराभुत ज वि आ (  ६०७),कविता झिने पराभुत स्वतंत्र (९३ )

*प्रभाग-६* चंद्रकांत मोहनराव नवले *विजयी* *गा मं (९९७),सुधीर वेणूनाथ नवले पराभूत ज वि आ (८५०),राजेंद्र मोहन राशीनकर पराभुत स्वतंत्र(५४),अच्छेलाल यादव पराभुत स्वतंत्र(६३),निलेश प्रकाश पाटणी पराभुत स्वतंत्र(६३),रमेश कमलाकर अमोलिक* *विजयी* *गा मं (१०५०),भाऊसाहेब वसंत तेलोरे पराभुत ज वि आ (९३२),सौ. उज्वला रविंद्र कुताळ *विजयी* गामं(१०९६),सौ.सिमा विवेक वाबळे पराभुत ज वि आ (८७७)याप्रमाणे मते मिळाली आहेत*.



*या निवडणुकीत अरुण पा. नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांचा अभिषेक खंडागळे यांनी मोठया मताधिकक्याने  तर सुधीर नवले यांचा शरद नवले यांचे बंधु चंद्रकांत नवले यांनीही मोठया फरकाने धक्कादायक पराभव केला*.

*तर प्रभाग दोन मध्ये माजी सरपंच भरत साळुंके यांनी लक्षवेधी तिरंगी लढतीत तिसऱ्यांदा बाजी मारली.त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष* *प्रफुल्ल डावरे व स्वतंत्र उमेदवार कैलास चायल  यांचा पराभव केला .येथे मोठी मत विभागनी झाली.तसेच रविंद्र खटोड यांनी नवखे उमेदवार संजय बापूराव गोरे यांचा मोठया फरकाने पराभव करून तिसऱ्यांदा बाजी मारली .जनता आघाडीच्या सौ. छाया विलास सोनवणे या  सविता अमोलिक यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. येथे जनता आघाडीच्या वेळेत अर्ज माघारी घेऊ न शकलेल्या व नंतर जनता आघाडीला पाठिंबा दिलेल्या सौ. नंदा अनिल पवार यांना ८६ मते मिळाली. त्यांची तांत्रिक उमेदवारी राहिल्याचा फटका आघाडीच्या सौ. सोनवणे यांना बसला*.

*मात्र एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीतही प्रभाग १ आणि २ मध्ये खटोड-साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता आघाडीचे आजही वर्चस्व कायम असल्याचे दाखवुन दिले आहे*.

*माजी उपसरपंच रविंद्र खटोड व भरत साळुंके प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचा समर्थ वारसा पुढे चालविताना गावाच्या विकासाला बांधील राहुन काम करु.सक्षम सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामात साथ देऊ.तर सुधीर नवले म्हणाले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहे.हा जनतेची दिशाभूल, दहशत, दादागिरी व धनशक्तीचा विजय आहे.*


*जि. सदस्य शरद नवले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक संपली मतभेद संपले. आता गावाच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहोत. पिण्याच्या पाण्याची योजना,घनकचरा आदीकामे प्राधान्याने करणार आहोत. विजय सुज्ञ मतदारांना समर्पित करीत आहोत.*विजया नतंर बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की आमचा कारभार पारदर्शी अन  सर्वांना विश्वासात घेवुन होणार आहे ३६५ दिवसात आमच्याकडून योग्य कारभार झाला नाही तर आमचा राजीनामा श्रेष्ठींनी घ्यावा तो देण्यास आम्ही बांधील आहोत.


बेलापुर  (प्रतिनिधी )- श्रीराम मंदिर बांधकामात आपलाही सहभाग असावा या हेतुने बेलापूरातील मुस्लिम बांधवानी ४४ हजार एकशे अकरा रुपयाची देणगी श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष , गोविंद देवगीरीजी महाराज तथा राष्ट्र संतआचार्य किशोरजी व्यास यांच्याकडे सुपुर्त केला                                           श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे बेलापुर  या जन्मगावी येणार असल्याची माहीती मुस्लीम बांधवांना मिळाली जामा मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाफरभाई आतार बहोद्दीन सय्यद हैदरभाई अकबरभाई टिन मेकरवाले हाजी ईस्माईल रफीक भाई शेख  शफीक बागवान मुनीर बागवान मोहसीन सय्यद गँसुद्दीन शेख आजिज शेख यांनी मुस्लिम बांधवाची ताताडीची बैठक बोलविली वा त्या बैठकीत

राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला सर्व मुस्लिम बांधवांनी ताताडीने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थीक मदत केली आचार्य किशोरजी व्यास यांचे गावात आगमन होण्यापुर्वी मुस्लिम समाजाने ३३ हजार रुपये जमा केले होते आचार्य किशोरजी व्यास यांचे बेलापुर गावातील जामा मस्जिदमध्ये आगमन होताच चिफ ट्रस्टी जाफराभाई आतार व बहोद्दीन सय्यद हाजी ईस्माईल अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले त्या वेळी आणखी अकरा हजार रुपये जमा झाले अशा प्रकारे मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर बांधाकामासाठी  ४४ हजार रुपयाची देणगी गोविंद देवागिरीजी महाराज यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली या वेळी बोलताना हाजी ईस्माईल म्हणाले की श्रीराम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा विटा उचलण्याचा प्रयत्न केला या वेळी बोलताना अकबर भाई टिन मेकरवाले म्हणाले की एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा मुस्लिम बांधवांना लाभले गावाच्या वतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष  यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन हाती घ्यावे लागले 

संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे आजही आर्थिक गडी विस्कटलेली आहे  उद्योग-व्यवसायात  कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात झाली कमी वेतनात काम करण्याचा फतवा काढला पूर्वीच्या कोरोनाची  लस बाजारात उपलब्ध होत असताना दुसरी कोरोना ची लाट येणार या धास्तीने पूर्वापार सुरू असलेल्या उद्योगांना खीळ बसली

 हजारो नागरिक या मुळे धास्तावले आहे  संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले होते   देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे रोजगार नाही शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही त्यामुळे  सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन सर सगट कोरोना काळातील विज बिल माप करावे या मागणीसाठी  आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा या मागणीसाठी  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, वक्ते  प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान शांततेत संपन्न झाले एकुण ७२.५० टक्के मतदान झाले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान संपन्न झाले बेलापुर गावात एकूण १४१०४ मतदारा पैकी १०२१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक १ मध्ये एकुण मतदार १८९५ होते पैकी १३४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाला प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐकुण मतदान २३५० होते पैकी १६९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक  तीन मधुन ऐकुण मतदार होते २८५४ पैकी २०७६ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक चार मध्ये ऐकुण २१२३ मतदार होते पैकी १६३७ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक पाच मध्ये ऐकुण मतदार होते २०३९पैकी १४१४मतदारानी मतदानाचा हक्क बजावला प्रभात क्रमांक सहा मध्ये ऐकूण मतदार होते २८८१पैकी २०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जि प सदस्य
शरद नवले सुनिल मुथा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांचा गावकरी मंडळ तर जनता अघाडीचे

रविंद्र खटोड काँग्रेसचे अरुण पा नाईक व बाजार समितीचे संचालक

सुधीर नवले यांचा जनता विकास अघाडी  यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती त्यात प्रभाग क्रमांक एक दोन तीन सहा मध्ये अपक्ष उमेदवार असल्यामुळै सर्वच प्रभागात कमालीची चुरस निर्माण झाली आहे प्रत्येक प्रभागात दोनही पँनल बरोबरच अपक्षांनीही आपला हात सैल सोडल्यामुळे सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्राभोवती रांगा लावल्या होत्या काही अनुचित प्रकार होवु नये म्हणून भापोसे आयुष नोपाणी हे बेलापुरात तळ ठोकुन होते सर्व मतदारांचे भवितव्य आता मशिनमध्ये बंद झाले आहे अपक्षासह दोनही पँनलने विजयाचा दावा केला असला तरी मतदार कुणाला कौल देणार हे सोमवारच्या निकाला नंतरच जाहीर होईल

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget