बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सफाई कामगार या पदा कार्यरत कैलास बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत मा. राज्यपाल यांच्या हस्ते मुंबई येथे सत्कार होणार आहे.
देशासह संपूर्ण जगासमोर कोरोना महामारी मुळे मोठे संकट उभे आहे.अशा वेळी अनेक लोक कोरोना योद्धा म्हणून समाजात काम करीत आहेत. यामध्ये रुग्णालयात काम करून आपली सेवा देणाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे.या कोवीड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर,अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य कर्मचारी,सफाई कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता राजभवन,मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.मागील 33 वर्षापासून सफाई कर्मचारी पदावर काम करीत आपली अविरत सेवा देत या कोरोना काळात ही कैलाश बेंडवाल यांनी उत्कृष्ट काम करून इतर कर्मचाऱ्या कडून ही नियोजन बद्धरित्या काम करून घेत आहे.अत्यंत मनमिळावू व आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या कैलाश बेंडवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मा. राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार हा मानवतेला लागलेला कलंक आहे.युवतीवर अमानुषपणे सामुहिक बलात्कार करुन शरिरावर केलेले आघात हे अमानवीय आहे, एवढेच नव्हे तर अत्याचार पिडीतेचे पार्थीव शरिर तिच्या परिवाराकडे सुपुर्त न करता प्रशासनाने त्याची परस्पर अंत्यविधी करुन विल्हेवाट लावली ही कुठल्याच संस्कारात न बसणारी बाब आहे.मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने बलात्कारीत नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सिटु संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, ताराबाई शिंदे स्मृती महिला संस्था, महिला जागृती संस्था, कृषी समृद्धी मल्टीपरपज फाऊंडेशन इत्यादी संघटनेच्या प्रतिधिनींनी बुलडाणा जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांच्यामार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिले आले.यावेळी शाहीनाताई पठाण, डॉ.इंदुमती लहाने, डॉ.विजया काकडे, अड.विद्या घोळे, नरेंद्र लांजेवार, कॉ.पंजाबराव गायकवाड, मृणालिनी सपकाळ,डॉ.वैशाली पडघान, मोहिनी बच्छाव, विजया ठाकरे, वर्षा गायकवाड, महेंद्र सौभागे, अनुराधा पाचराऊत, प्रिया वाघमारे, अक्षय आळेकर व विनोद जाधव इत्यादी उपस्थित
होते.
येथील निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांची बदली बाळापूर जि. अकोला येथे उपविभागीय अधिकारी पदी झाल्यानंतर या रिक्त झालेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी दिनेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाला तसे आदेश प्राप्त झाले आहेत. दिनेश गीते यांनी यापूर्वी बुलडाणा येथे तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. ते आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अमरावती येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.आज 6 ऑक्टोबरला दिनेश गिते यांनी निवासी उप जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
लडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असून झपाट्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशात बुलडाणा जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेले 3 जाणांचा आज 6 ऑक्टोबर रोजी मृत्यु झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिली आहे.या मध्ये घारोड ता. खामगाव येथील 80 वर्षीय पुरुष, हिंगणा ता खामगाव येथील 78 वर्षीय पुरुष व वाडी खामगाव येथील 76 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7849 कोरोनाबाधित रूग्ण संख्या झाली आहे.तसेच आजपर्यंत 102 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.