बुलडाणा - 6 ऑक्टोबर
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार हा मानवतेला लागलेला कलंक आहे.युवतीवर अमानुषपणे सामुहिक बलात्कार करुन शरिरावर केलेले आघात हे अमानवीय आहे, एवढेच नव्हे तर अत्याचार पिडीतेचे पार्थीव शरिर तिच्या परिवाराकडे सुपुर्त न करता प्रशासनाने त्याची परस्पर अंत्यविधी करुन विल्हेवाट लावली ही कुठल्याच संस्कारात न बसणारी बाब आहे.मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने बलात्कारीत नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सिटु संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, ताराबाई शिंदे स्मृती महिला संस्था, महिला जागृती संस्था, कृषी समृद्धी मल्टीपरपज फाऊंडेशन इत्यादी संघटनेच्या प्रतिधिनींनी बुलडाणा जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांच्यामार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिले आले.यावेळी शाहीनाताई पठाण, डॉ.इंदुमती लहाने, डॉ.विजया काकडे, अड.विद्या घोळे, नरेंद्र लांजेवार, कॉ.पंजाबराव गायकवाड, मृणालिनी सपकाळ,डॉ.वैशाली पडघान, मोहिनी बच्छाव, विजया ठाकरे, वर्षा गायकवाड, महेंद्र सौभागे, अनुराधा पाचराऊत, प्रिया वाघमारे, अक्षय आळेकर व विनोद जाधव इत्यादी उपस्थित
होते.
Post a Comment