Latest Post

अहमदनगर: नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर मंगळवारी (दि.29) तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना केली असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी वाघ याने ओळख वाढविली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील  अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत पिडीत तरुणीने म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्या ठाण्यात निरीक्षक तेथेच दाखल झाला गुन्हाविकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि नगर येथील नाजूक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले होते.

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी बरकत अली शेख यांची निवड असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रजीत यादव (यु. पी.) व राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली) व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारत भर गरुड झेप घेत असलेल्या भारतातील प्रत्येक राज्यातील प्राइवेट कर्मचारी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणाऱ्याअखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर सा. राजनीती समाचार चे संपादक व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.बरकत अली शेख यांची निवड झाली असून राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली )व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांनी या बाबतचे नियुक्ती पत्र प्रदान केले.

        शेख यांच्या निवडीबद्दल अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून ॲड.हाजी मन्सूर भाई जागीरदार, ॲड.दारूवाला,

ॲड.शफीक शेख, ॲड.मुजीब शेख, ॲड. आरिफ शेख,

डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.रवींद्र पांडे, डॉ.मुस्ताक निजामी, विलासराव पठारे, किशोर गाढे,बी. के. सौदागर, शेख फकीर मोहम्मद, अमीरभाई जागीरदार,सुभाषराव गायकवाड, उस्मानभाई शेख, मन्सूर पठाण, वाहाब खान, अनिल देवरे, सूर्यकांत गोसावी, सुखदेव केदारे, राजमोहम्मद शेख, कॉ. सुरेश पानसरे,अन्वर पठाण, रवींद्र केदारे,जावेद भाई शेख,शब्बीर कुरेशी,अक्रम कुरेशी,

कोपरे पाटील, गुलाब वायरमन, शकील शेख,जैनुद्दीन सय्यद, रमेश शिरसाठ,हाजी शकीलभाई शेख, इब्राहिम भाई शेख, राहुल गायकवाड, सदाभाऊ मोरे, लक्ष्मण साठे, अमजद शेख, नसीर शेख, जफर पठाण,हनीफ शेख, दस्तगीर शाह,सज्जाद पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

श्रीरामपूर -(प्रतिनिधी) क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने शहरातील बाजारतळ येथील बजरंग ग्रुप येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख,  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, भानुदास धनवटे, भाऊसाहेब धोत्रे,  संतोष त्रिभुवन यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले.  यावेळी परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. 

अभिवादन सभेला संबोधताना कॉ. श्रीकृष्ण बडाख म्हणाले की, पारतंत्र्यात असताना मार्क्स च्या विचारांवर निष्ठा असलेला नवजवान क्रांतिवीर देशप्रेमी युवक भगतसिंग यांनी देश स्वातंत्र्य साठी इंग्रजांनी इथून चालते व्हावे म्हणून सशस्त्र संघर्ष केला. भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील  हो. तो  भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होतायाचं कारण भगतसिंगाचा व्यापक दृष्टीकोन आहे,  त्यांनी सशस्त्र क्रांती केली. एक वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेलं नाही.  शहीद भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले स्वतंत्र श्रमिक, कामगार, शेतकरी यांना मिळालेले नाही. सत्तेच्या माध्यमातून भांडवलशाही राजवट आलेली आहे. यात बदल घडवून आणण्यासाठी वंचितानी शिक्षित होवून कलमक्रांती घडवून आणण्याची आज गरज आहे. हीच खरी शहीद भगतसिंग यांना आदरांजली ठरेल.  यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सदर केली. तर आभार भानुदास धनवटे यांनी मानले. 



श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- अनेक जण आपला वाढदिवस पार्टी देवुन मोठ मोठ्या हाँटेलमध्ये साजरा करतात पण श्रीरामपुरातील एका अवलीयाने आपला वाढदिवस चक्क वृध्दाश्रमात जावुन साजरा केला या अवलीयाचे नाव आहे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपुरचे तहासीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या डामडौलात मोठ्या हाँटेलात साजरा होईल असे कुणालाही  वाटणे सहाजिकच आहे पण सामाजिक कार्याची जाण असणारे प्रशांत पाटील  यांनी आपला वाढदिवस चक्क श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमात जावुन  वृध्दांना मिठाई देवुन तसेच वृध्दाश्रमाला आर्थिक मदत देवुन तेथील वृध्दांचे आशिर्वाद घेवुन साजरा केला.श्रीरामपुर येथील सुभाष दशरथ वाघुंडे हे स्वखर्चाने माऊली वृध्दाश्रम या नावाने वृध्दाश्रम चालवतात या वृध्दाश्रमात पाच आजोबा सहा आजीबाई एक किशोरवयीन

अनाथ मुलगा तीन पगारी सेवेकरी असे पंधरा जण राहतात सुभाष वाघुंडे यांनी वैयक्तिक सात लाख रुपये कर्ज काढुन  आपल्या छोटेखानी जागेत हा उपक्रम सुरु केलेला आहे  आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी तहसीलदार प्रंशात पाटील वृध्दाश्रमात दाखल झाले तेथील वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडून वृध्दाश्रमाची सविस्तर माहीती घेतली कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करुन वृध्दांना मिठाईचे वाटप केले अन वृध्दाश्रमास आर्थिक मदतही केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पत्रकार देविदास देसाई हे होते  या वेळी आजचा वाढदिवस आयुष्यातील अविस्मरणीय असुन आपले वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही चांगले  काम करण्यासाठी  उर्जा मिळाली  असेही पाटील  म्हणाले या वेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे किशोर छतवाणी विकी काळे भाऊसाहेब वाघमारे आण्णासाहेब पारखे सुनिल पारखे योगेश नागले अजिज शेख अरुण खंडागळे आदि उपस्थित होते    कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले तर माणिक जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले.


प्रधानमंत्री १५ सूत्री कार्यक्रम नुसार केंद्र सरकार कडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान

श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व 

मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक फहीम शेख यांनी केला आहे.

  मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. इ. पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना “पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती” दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त पहिली ते पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १००० रुपये तसेच इ. सहावी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. तसेच इ. अकरावी ते बारावी सहित ITI ,डिप्लोमा,पदवी व पदवीधर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६००० ये १२००० रुपये ची आर्थिक मदत “पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती”च्या स्वरूपात दिली जाते. याच बरोबर प्रोफेशनल व टेक्निकल अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५००० ते ३०००० हजार रुपये ची आर्थिक मदत “मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती” स्वरूपात दिली जाते.

वरील सर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख “३१ ऑक्टोबर २०२०” आहे. अर्ज दाखल करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळा/ महाविद्यालया च्या मुख्याधिपक किंवा प्राचार्य यांच्याशी संपर्क साधा.  अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असा आहवान श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व 

मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व

समाजसेवक फहीम शेख आणि सर्व सदस्य यांनी केला आहे


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शेतकर्याच्या अंगावर आलेले संकट घरासामोर बांधलेल्या गायीने शिंगावर घेतले त्यामुळेच ते शेतकरी कुटुंब बिबट्याच्या हल्ल्यातुन बालबाल बचावले आले अंगावर घेतले शिंगावर याचा प्रत्यय खानापुर येथील आदिक परिवाराला आला.खानापुर तालुका श्रीरामपुर येथील नविन गावठाण येथे हरिश्चंद्र भानुदास आदिक हे शेतकरी कुटुंब राहात आहे काल पहाटे एक ते दिड वाजण्याच्या सुमारास त्यांना बिबट्याच्या मोठमोठ्या  डरकाळ्या ऐकु येवु लागल्या आदिक कुटुंब  झोपेतुन खडबडून जागे झाले अन पहातात तर काय समोर चक्क दोन बिबटे आपापसात भांडत होते आदिक यांनी बँटरीचा उजेड करताच एक बिबट्या मागे सरकला परंतु दुसरा बिबट्या जागेवरच गुरगुरग होता एक बिबट्या निघुन गेल्यानंतर हरिश्चंद्र आदिक यांनी त्या बिबट्याला पहाण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरच हल्ला केला योगायोगाने त्यांची गाय मधेच बांधलेली होती त्या गायीने बिबट्याला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला आमचा व गायीचा  हल्ला पाहुन बिबट्या मागे सरकला दोन बिबट्याच्या हल्ल्यात हा बिबट्या घायाळ झाला होता गाय व आदिक परिवाराने घेतलेल्या पावित्यामुळे घायाळ बिबट्या माघारी सरकला त्याच वेळी जोरदार पाऊस सुरु झाला दोन बिबटे पाहील्यामुळे आदिक कुंटुंब पुर्णपणे घाबरले होते त्यां

नी तातडीने आजुबाजुच्या नागरीकांना फोन केले आसपासचे नागरीक भर पावसातही मदतीला धावुन आले  तो पर्यंत जखमी झालेला बिबट्या पुर्णपणे घायाळ झालेला होता शरद रावसाहेब आसने यांनी धाडस करुनदोर बिबट्याच्या अंगावर टाकला काठीच्या सहाय्याने बिबट्याला ढकलले अन त्या दोराच्य सहाय्याने बिबट्याला जनावरा प्रमाणे खिडकीला बांधुन टाकले सकाळी वन अधिकारी आल्यानंतर त्यांनी जखमी बिबट्याला ताब्यात घेवुन त्याचेवर उपचार सुरु केले आहे हरिश्चंद्र भानुदास आदिक यांनु सांगितले की  आमच्याकडे एक गाय आहे चार वार्षापासुन ती दुधच देत नव्हती काहींनी तिला विकुन टाकण्याचा सल्ला दिला होता परंतु गाय कसायाला विकायची नाही असे आम्ही ठरविले अन आत्तापर्यत चार वर्ष त्या गायीचा सांभाळ केला अन त्याच गाईचे आमचा जिव वाचविला आमच्यावर आलेले संकट गाईने शिंगावर घेतले त्या गाईमुळेच आमचे कुटुंब सुरक्षित राहीले असल्याची प्रतिक्रिया आदिक यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- सर्व श्रेष्ठ दान म्हणजे देहदान नेत्रदान रक्तदान व कन्यादान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन निश्चितच अनेकांना प्रेरणादायी ठरेल असे उदगार अध्यात्मिक समन्वय अघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे   यांनी काढले  भारतीय  जनता पक्षाच्या श्रीरामपुर तालुका शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने बेलापुरातील जैन मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मुठे बोलत होते  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे सुनिल मुथा जि प सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक  अभिषेक खंडागळे हे मान्यवर उपस्थित होते   या वेळी ३५   रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे भाग्यश्री व योगेश शिंदे या उभयंतानी रक्तदान केले पत्रकार विष्णूपंत डावरे यांच्या वतीने उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे माजि शहराध्यक्ष मारुती बिंगले युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव युवा मोर्चा चिटणीस विशाल अंभोरे  प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड दिलीप काळे  मारुती राशिनकर राम पौळ रविंद्र खटोड रविंद्र कोळपकर अरविंद शहाणे दिलीप दायमा किशोर खरोटे अरुण धर्माधिकारी  प्रसाद लढ्ढा  मुकुंद लबडे महेश खरात पप्पू कुलथे अक्षय कावरे विशाल गायधने  आदि उपस्थित होते जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डाँ.दिलीप दाणे डाँ.विलास मढीकर श्रीमती धामणगावाकर त्रिवेणी माहुरे के पी यादव बाळासाहेब खरपुडे यांनी रक्तदानाचे काम चोख पार पाडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे पप्पु पौळ सुरेश बढे ओमप्रकाश व्यास राकेश कुंभकर्ण सागर ढवळे महेश खरात रमेश अमोलीक आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुरुषोत्तम भराटे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार व्यक्त केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget