Latest Post

पुणे सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंध जनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना  कालावधीमध्ये त्यांची अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधी मध्ये काम करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे डॉ. प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती-धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले.मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणाऱ्या प्रतिभा हे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता तरी देखील आपल्या प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून तसेच अंध व अपंग जनांसाठी काम करणारी  स्वयंसेविका म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खाजगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत.अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधाला यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाने देखील  अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचले सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून डेड बॉडी घेऊन पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लिम मंचं यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या चारशे पेक्षा अधिक लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. यात मुस्लिम समाजा सोबतच हिंदू, ख्रिश्चन,लिंगायत,बौद्ध आदी सर्व धर्मीय लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहे.जात-पात न पाहता मदत करणे हेच पुणेकरांचे वैशिष्ट्य असून सर्व मानवतावादी महापुरुषांची परंपरा पुढे चालवत आम्हीदेखील जात-धर्म विरहित काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने आम्हाला सर्व लोकांचे सहकार्य मिळत आहे.सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे.असे आम्ही मानतो अशी भूमिका मनोगत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख,साबीर सय्यद,दानिश खान,अमजद शेख व्यक्त केली.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यातील दोन पुढार्यांचे मुद्द्यावरुन गुद्यापर्यत पोहोचलेले वाद पोलीस अधिकार्यांच्या साक्षीने मिटविण्यात टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष व बेलापूर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांना मिटविण्यात यश आले. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व त्यांचा पुतण्या बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यातील वाद तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला माहीती आहे दोनही नवले एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात अघाडीवर असत ग्रामपंचायत कार्यालया पासुन ते जिल्हा परिषदे पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने एकमेका विरोधात करण्यात आली होती दोघांचेही वाद अतिशय विकोपाला गेले होते कित्येक वेळा हमरा तुमरीचे प्रकार झाले होते काल तर या सर्वाचा कळस झाला ग्रामपंचायत कार्यालयात झालेली बाचाबाची लाठ्या काठ्या पर्यत पोहोचली दोघांच्याही नातेवाईकात भर चौकात हाणामारी झाली त्या नंतर तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशनला गेल्यावरही दोघांचेही नातेवाईक पुन्हा आपापसात भिडले त्याच वेळी बेलापूर पत्रकार सांघाचे खजिनदार सुनिल मुथा तेथे पोहोचले दोन्ही गटात चाललेल्या मारामार्या पोलीस उपनिरीक्षक उजे  बेलापूरचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ व सुनिल  मुथा यांनी बळाचा वापर करुन सोडविल्या त्या वेळी फार मोठा जमाव जमला होता आता दोघावरही गुन्हे दाखल होणार किती जणांना अटक होणार याची चर्चा रंगत असतानाच सुनिल मुथा यांनी शरद नवले व सुधीर नवले यांना घटनेच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली तुमच्या दोघात असलेल्या वादाचे परिणाम   दोन पिढ्यांना भोगावे लागतील फालतु भांडणात तुमचे कुटूंब उध्वस्त होतील त्यामुळे दुरचा विचार करुन हे वाद सोडून द्या असे उपविभागीय अधिकारी राहुल मदने व सुनिल मुथा यांनी सुचविले अन उपविभागीय  पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस  निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या समक्ष दोघांनीही आपापली चुक कबुल करत माघार घेतली सुनिल मुथा यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले अन दोन्ही नवले मधील कटूता कमी होवुन आपसात तडजोड झाली त्याबद्दल अनेकांनी मुथा यांना धन्यवाद दिले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे  महत्वाची कागदपत्रे गायब होण्याची दाट शक्यता असुन ग्रामपंचायतीची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी ?महत्त्वाची कागदपत्रे  नेणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केली आहे          ग्रामपंचायत कार्यालयाचे दप्तर व इतर कागदपत्रे जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी नेण्यात आली होती आम्ही त्या ठिकाणी पोहोचताच  संबधीत इसमांनी पळ काढला असे शरद नवले यांनी सांगितले आहे  ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामपंचायतीवर एस एस गडधे यांची प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ग्रामविकास आधिकारी संग्राम चांडे यांचीही बदली झाली असुन त्यांच्या जागी नविन ग्रामविकास अधिकारी तगरे हे हजर झाले आहेत बेलापूर ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्याकरीता टाळाटाळ केली जात असुन बोगस केलेल्या कामाची  कागदपत्रे ग्रामविकास अधिकारी व एक इसम जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी बसले असल्याची माहीती जिं प सदस्य शरद नवले यांना मिळताच अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांना घेवुन नवले संबधीत ठिकाणी गेले असता ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीचा कर्मचारी व आणखी दोन इसम त्या ठिकाणी कागदपत्राची जुळवा जुळव करत असल्याचे नवले यांच्या लक्षात आले आम्हांला पहाताच त्या दोन इसमानी एका दरवाजाने व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी दुसर्या दरवाज्याने पळून गेल्याचे नवले व खंडागळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले त्या नंतर आपल्या सहकार्यासह नवले ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले  प्रशासक गडधे व नविन आलेले ग्रामविकास अधिकारी तगरे यांना ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर व महत्वाची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी कुणाच्या परवानगीने ही कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर गेली असा सवाल जि प सदस्य नवले यांनी केला असुन आडीच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार करण्यात आला आहे अधिकार्यांना हाताशी धरुन बोगस कामाची बिले काढण्यात आलेली आहे त्या बाबत तक्रारी दाखल झाल्या असुन संबधीत ग्रामसेवक व इतरावर कारवाई होणारच आहे त्यामुळे बोगस कामाच्या कागदपत्राची जुळवा जुळव करण्यासाठीच महत्वाची कागदपत्रे बाहेर नेली असुन संबधीतावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जि प सदस्य शरद नवले यांनी केली आहे.

दिनांक ०१/०९/२०२० रोजी श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक,श्रीरामपुर शहर पोस्टे यांना गुप्त
बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हदीत संजयनगर वार्ड नं २
श्रीरामपुर परिसरात एक इसम गांजा घेवुन येणार आहे अशी माहिती मिळालेने सदर ठिकाणी पोलीस पथकाने
सापळा लावुन इसम नामे कमलेश उत्तम पवार वय २३ वर्षे रा.अहिल्यानगर,वॉर्ड नं.२,श्रीरामपुर यास ताब्यात घेतले
असुन त्याचेकडुन ६७,०००/- रुपये किंमतीचा उग्र व वर्ष वासाचा गुंगीकारक गांजा मिळुन आला असुन त्याचेविरुद्ध
श्रीनामपुर शहर पोस्टेला गु.र.नं. ।। १६६४ /२०२० एन.डी.पी.एस.अॅक्ट १९८५ चे कलम ८क), २०(य)(२)(ब) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरचा गांजा कोठून आणला असुन तो कोणास विक्री करणार आहे याबाबत
अधिक माहीती घेत असून पुढील तपास करत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे,
अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा.श्री.राहुल मदने, उपविभागीय पोलीस
अधिकारी, श्रीरामपुर विभाग , श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह सपोनि' समाधान
पाटील, तपास पथकाचे पोसई। संतोष बहाकर,पोहेकॉ। जे.के. लोटे, पोका/ सुनिल दिघे, पोकॉ। गणेश गावदे, पोकों।
महेंद्र पवार, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ. पंकज गोसावी, पोकॉ/ किशोर जाधव, मपोको/ अर्चना वई यांनी केली आहे.


अहमदनगर : कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी कोठला भागात मोहरमच्या सवा-यांचे रविवारी जागेवरच विसर्जन केले. जागेवरच विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.नगरचा मोहरम देशात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सवारी विसर्जन मिरवणुकीस पोलिसांनी बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांनीही सर्व नियमांचे पालन करीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाला सहकार्य केले. कोठला येथील बारे इमाम (छोटे इमाम) आणि हवेली येथील बडे इमाम यांच्या सवा-यांची स्थापना झाली त्या जागेवरच मिरवणूक काढून जागेवरच विसर्जन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवा-यांचे विसर्जन करण्यात आले.   पोलीस दलाने कोठला आणि हवेलीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले होते. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या नेतृत्त्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विसर्जन झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- जैन युवा महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या आखिल भारतीय भजन स्पर्धेत बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळविला खुल्या गटात प्रथम क्रमांक आग्रा येथील उन्नती जैन यांनी मिळवीला द्वितीय क्रमांक ओडीसा येथील मेघा जैन व जालना येथील दिपाली शहुजी यांना विभागुन देण्यात आला तरा तृतीय क्रमांक बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी मिळविला  छोट्या गटात प्रथम क्रमांक नांदगाव येथील आर्या कासलीवाल यांनी मिळविला द्वितीय क्रमांक शिलाँंग येथील चहक जैन तर तृतीय क्रमांक नाशिक येथील युग जैन यांनी मिळविला डाँक्टर  गंगवाल यांनी मिळविलेल्या विशेष पुरस्काराबद्दल जि प सदस्य  शरद नवले बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे देविदास देसाई  बाजार समितीचे संचालक सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके दिलीप काळे आदिंनी  अभिनंदन  केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी  )- एके काळी जिवंत देखाव्यासाठी  जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या बेलापूर गावातील जय श्रीराम गृपने   बसविलेल्या गणपती बाप्पा समोर पोलीस व डाँक्टर यांच्या प्रतिकृती तयार करुन कोरोनाचे संदेश देणारे फलक लावल्यामुळे मंडळाचा गणपती बाप्पा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.बेलापूरातील जय श्रीराम गृपच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली दर वर्षी पेक्षा या वर्षीचा गणेशोत्सव कोरोनामुळे शांततेत साजरा करावा लागला असे असले तरी सौ नम्रता जितेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतुन जय श्रीराम गृप या मंडळाने कोरोना बाबत वेगवेगळे संदेश समाजा पर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे  कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे पोलीस दादा तसेच वैद्यकीय सेवा देणारे डाँक्टर याच्या प्रतिकृती तयार करुन त्याच्या कामाविषयी कृतघ्नता व्यक्त करण्यात आली आहे  तसेच  फलकाद्वारे वेगवेगळे जनजागृती करणारे संदेश देण्यात आले आहे या संदेशात आम्ही बेलापूरकर देणार प्रशासनाला साथ ,करु कोरोनावर यशस्वी मात ,घाबरु नका पण जागृक रहा स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेवा ,आरोग्य हीच खरी संपत्ती, तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित  मास्क वापरा कोरोनाला हटवा सँनिटायझरचा वापर करा सुरक्षित अंतर ठेवा असे संदेश फलकावर लिहुन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे सौ नम्रता वर्मा यांना मंडळाचे अक्षय  ओहोळ श्रेयस गांधी अक्षय लढ्ढा ऋषीकेश सराफ निरज राठी ऋषीकेश मुंदडा स्वप्निल ओहोळ यश वर्मा अशुतोष थोरात कौस्तुभ कुलकर्णी  धिरज सुर्यवंशी आकाश वांढेकर आदित्य कोळसे हितेश बोरुडे जितेद्र वर्मा मंगेश आदिंनी  सहकार्य केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget