Latest Post

बुलडाणा - 17 जुलै
पोलीसाने एका गोदामात छापा मारून अवैधरित्य साठवून ठेवलेला गुटका व रेशनचा तांदूळ पकडला मात्र तिसऱ्या दिवशी ही अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात 3 रा दिवस उलटला तरीही अद्याप गुन्हा दाखल ना झाल्याने अनेक प्रकारची चर्चेला उधान आलेले आहे. 
      बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर  जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कुंड या गावाच्या शिवारात एका गोडाऊन मधुन
अवैधरित्या साठवून ठेवलेले रेशन तांदूळ व प्रतिबंधित गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने 14 जुलैला पकडला आहे.या प्रकरणी रेशनचा धान्य असल्यामुळे मलकापुर तहसिलविभागाने पोलिस स्टेशन मध्ये 16 जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे, मात्र 16 लाखाचा गुटखा पकडल्या नंतर तिसऱ्या दिवशी ही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे ज्या गोदमावर धाड मारण्यात आली तिथे गुटखा-रेशन माफिया अतिकुरहमान हजर होता मात्र पोलीसाने त्या माफियाला सोडून दिले व फक्त माल ताब्यात घेतला आहे.तर माला सोबत आम्हाला संबंधित व्यक्ति ही लागेल तेव्हाच आम्ही पुढील करवाई करू,अशी प्रतिक्रिया बुलडाणा
अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त केदारे यांनी दिली आहे.अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात 3 दिवस झाले तरी गुटखा माफियावर कार्रवाइ ना झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी शहर हद्दीतील पाटाच्या पुलापासून ते गोंधवणी पाण्याच्या टाकीपर्यंत केलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या सिलकोट व कारपेटच्या कामात तफावत ठेवून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याबद्दल मा.जिल्हाधिकारी साहेब व संबंधित सर्व वरिष्ठांना तक्रारी देऊन देखील कुठलीही चौकशी व कारवाई न झाल्यामुळे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने पाण्याच्या टाकीजवळ शांततेच्या मार्गाने मास्क व सोशल डिस्टन्सिगचे पालन करून आंदोलन करण्यात आले याबाबत माहिती अशी की शहर हद्दीतील पाटाच्या पुलापासून ते गोंधवणी पाण्याच्या टाकीपर्यंत ५५० मीटर रुंदीचा दोन्ही बाजूच्या सिलकोट व कारपेटच्या कामाचे संबंधित नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदार यांनी केले असून सदरील रस्त्याच्या कामकाज अंदाजे रक्कम ५७ लाख १० हजार रुपये एवढी आहे परंतु संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत ठेवून व कामे मंजूर करून कामे पूर्ण झाल्याचे कळविले आहे तसेच रस्त्याचे सिलकोट व कारपेटची कामे करतांना प्रथम रस्ता एक ते दीड फूट खोल खोदून त्यामध्ये
खडी टाकून रोलर दाबून घ्यावी लागते नंतर सिंगल लेयरचे व डबल लेयरचे कारपेट करावी लागते परंतु ठेकेदारांनी रस्ता न खोदता काही ठिकाणीच खडी दाबून सिंगल लेयर चे कारपेट केले तर काही ठिकाणी कारपेट न करता डांबरचे टेपकॉट मारून त्यावर डस्ट खडी मारून सिलकोटची कामे झाल्याचे भासविले तसेच ज्या ठिकाणी कारपेटची कामे केली त्याठिकाणी कारपेट कामाची जाडी (थिकनेस) शासकीय मानकाप्रमाणे न घेता काही ठिकाणी एक इंच तर काही ठिकाणी 2 इंच जाडी ठेवून कामे करण्यात आली तसेच संपूर्ण रस्त्याच्या कामात डांबरचे प्रमाण कमी प्रमाणात ठेवून कामे करण्यात आली त्यामुळे पहिल्या पावसात रस्त्याची मटेरियल वर येऊन रस्त्यावर खडे पडण्यास सुरुवात झाली यावरून आम्ही सदरील रस्त्यावर पडलेल्या खड्याची छायांकित प्रती व व्हिडिओ शूटिंग काढून सर्व वरिष्ठांना पुरावे सादर केले आहे परंतु संबंधित श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी गैरप्रकार झालेल्या रस्त्याच्या कामाची ठेकेदाराची कुठलीही चौकशी व कारवाई न करता आम्हाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे झालेल्या रस्त्यांची कामे व शासकीय मानकाप्रमाणे आहेत असे म्हणून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे समजते तरी माननीय
नगराध्यक्ष मॅडम यांनी या सिलकोट व कारपेटच्या आलेल्या रस्त्याची चौकशी व कारवाई होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व कामाची काढण्याच्या तयारीत असलेले बिले मंजूर करू नये तसेच संबंधित
ठेकेदाराला यापुढे काम देऊ नये व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे जेणेकरून कुठल्याही काम संबंधित ठेकेदाराला भेटणार नाही याची नोंद घ्यावी यावेळी सदर निवेदन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब यांना देण्यात आले यावेळी मास्क व सोशल डिस्टनचे पालन करून आंदोलन करण्यात आले तसेच या आंदोलना प्रसंगी लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण राज्य संपर्कप्रमुख शेख अहमद नसीर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रज्जाकभाई शेख जिल्हा सचिव राजेंद्र त्रिभुवन जिल्हा संघटक संजय नवगिरे रईस शेख किशोर खंडागळे शाबीर शहा आदी उपस्थित होते.

जे.टी. एस. विद्या संकुलात बारावी परीक्षेत  कु. श्रुष्टी थोरात, कु. विद्या जाधव,कु. निलेशा मुंजाळ आणि गणेश बडे प्रथम
 बेलापूर(वार्ताहर)येथील बेलापूर शिक्षण संस्थेच्या जे. टी. एस. विद्या संकुलातील कनिष्ठ महाविद्यालय विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.*
*विविध विभागांचा शाखानिहाय निकाल- विज्ञान शाखा -98.68 टक्के, वाणिज्य शाखा-96.25,कला शाखा-60.58,व्यवसाय शिक्षण शाखा-83.50 याप्रमाणे आहे.*

विज्ञान शाखेत- कु. श्रुष्टी बाबासाहेब थोरात(90.15)प्रथम,कु. पूनम किसन सालबंदे(81.69)द्वितीय, व कु. गौरी अनिल थोरात(80.00)तृतीय आली.


*वाणिज्य शाखेत -कु. विद्या सीताराम जाधव(85.23)प्रथम,कु. हर्षदा जगन्नाथ सदाफुले(84.61)द्वितीय व कु. वैष्णवी अनिल जोशी(83.85)तृतीय आली.*

*कला शाखेत-कु. निलेशा अण्णा मुंजाळ(89.38)प्रथम, कु.सुवर्णा गोविंद राशीनकर(75.69)द्वितीय व कु.सुयशा अशोक नागले(75.54)तृतीय आली.*

*व्यवसाय शिक्षण शाखेत-गणेश भुजंग बडे (71.84)प्रथम,गणेश संजय महाडिक (70.00)द्वितीय व कु. प्रियंका संजय बडधे (68.46) तृतीय आली.*

*या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव अँड. शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची,खजिनदार हरिनारायण खटोड,जे. टी. एस.हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष बापुसाहेब पुजारी, ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद खटोड,एम. सी. व्ही. सी. विभागाच्या अध्यक्षा श्रीमती लीलावती डावरे, सिनियर कॉलेजचे अध्यक्ष राजेश खटोड,कॉलेज प्रतिनिधी संचालक माजी सरपंच भरत साळुंके, एस. आर. के. प्राथमिक विद्यालय अध्यक्ष रविंद्र खटोड,विश्वस्त हरिश्चंद्र महाडिक,मधुकर दराडे, श्रीवल्लभ राठी,अशोक भगत, नारायणदास सिकची,  सौ. प्रेमा मुथा, डॉ. सुरेश मूथा,तसेच शेखर डावरे ,शिक्षक प्रतिनिधी अनिल तायडे,यांच्यासह प्राचार्या जयश्री उंडे, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर,प्रा. अरविंद नवले यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवकवृंदाने सर्व यशवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक अध्यापकांचे कौतुक केले आहे.

एक दिवस बाहेर जावून येणाऱ्यांनाही विलगीकरणाची अट
जिल्हयात येणाऱ्या व जिल्हयातून बाहेर जावून पून्हा परत येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आता पून्हा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन जसे विलगीकरण, मास्क न लावणे व गर्दी करणे याबाबत सूचनांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने, गरज पडल्यास लवकरच पून्हा संपूर्ण जिल्हयात संचार बंदी लागू करावी लागेल असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व जिल्हयातील जनतेला आवाहन केले आहे.
जिल्ह्यामध्ये, कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचे अनुषंगाने टाळेबंदी जाहिर करण्यात आली असून सर्व व्यक्तींना परवान्यासह आंतरराज्य, राज्यांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासास मंजुरी देण्यात आली आहे. परराज्यात/राज्यांतर्गत प्रवासाकरीता https://covid19.mhpolice.in   यावर ऑनलाईन अर्ज करुन ई-पास प्राप्त करुन घेण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदरचे ई-पासचा वापर योग्य अतिमहत्वाच्या कामासाठीच करणे अपेक्षित आहे.  यापुढे ई-पाससाठी योग्य कारणाशिवाय अर्ज केल्याचे/प्रवास केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकात म्हटले आहे. 
यामध्ये बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून विना परवाना  जिल्ह्यात  प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित वाहनाचे मालकावर  रु. 1,00,000/- इतका दंड  आकारण्यात येणार आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून विना परवाना  जिल्ह्यात  प्रवेश  करणाऱ्या व्यक्तीवर रु. 5,000/- इतका दंड, गृह/संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहण्यासाठी  नेमूण दिलेला कालावधी पुर्ण होण्यापुर्वी अनधिकृतपणे बाहेर पडल्यास संबंधित व्यक्तीवर  रु. 5,000/- इतका दंड तसेच फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, प्रतिबंधात्मक क्षेत्रातुन (कन्टोनमेंट झोन)  बेकायदेशीररित्या बाहेर  पडल्यास किंवा आत आल्यास संबंधित व्यक्तीवर रु. 5,000/- इतका दंड  आकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहिर केले आहे. 
            जिल्ह्याबाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तिंना आरोग्य विभाग यांचेकडून दिलेल्या निर्देशानूसार 14 दिवस गृह विलगीकरण वा संस्थात्मक विलगीकरण राहणे बंधनकारक असल्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.  जरी एकाच दिवशी जिल्ह्यातून बाहेर जाणे-येणे होणार असेल तरीही गृह/संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल व सदरचे विलगीकरण सबंधाने प्रवास्यांनी चेक पोस्ट वरील वैद्यकीय पथकातील अधिकारी/कर्मचारी याच्याशी हुज्जत घालु नये. त्या अनुषंगाने संबंधित चेक पोस्ट येथे प्रत्येक प्रवासी व्यक्तिकडून हमीपत्र घेणेत येणार आहे.  तसेच वैद्यकीय पथकाकडून चेक पोस्ट वरच गृह / संस्थात्मक विलगीकरणाची कार्यवाही पुर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवासी व्यक्तिने स्वत: जिल्हा सामान्य रुग्णालय/उप जिल्हा रुग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्र  येथे जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे .
                सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास, विना मास्क/रुमाल आढळून आल्यास व योग्य कारणाशिवाय दुचाकीने एकापेक्षा जास्त व्यक्ती फिरताना आढळल्यास संबंधित व्यक्तिकडून रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल.   व सबब दंड वसूल करण्यास सबंधित तहसिलदार, पोलीस निरीक्षक व  मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत हे सक्षम अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.
               जिल्ह्यामध्ये वैद्यकीय बाबींची असलेली किमान संसाधने व खाजगी दवाखान्यात कोविड-19 च्या अनुषंगाने उपचार होणे शक्य नसल्याने  सदरची परिस्थिती आटोक्यात येण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास १००% संचार बंदीची घोषणा करावी लागेल असे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याकरीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

सोनई पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/07/2020 रोजी फिर्यादी शेख अब्दुल अजीज जैनुद्दीन,वय 46 वर्ष,व्यवसाय व्यापार,रा.मुकुंदनगर,कापरी मस्जीत जवळ,अहमदनगर यांच्या फिर्यादवरुन गुरनं. 228/2020 भारतीय दंड संहीता 1860 कलम 454,457,380 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर घटनेत MIDC परीसर शिंगवेतुकाई ता नेवासा येथुन किंमती रुपये 6,50,000/- च्या दुधपावडर च्या गोण्या,त्यात मिल्कमिस्ट कंपनी,गोवर्धन कंपनी,अमुल कंपनी चे छाप असलेल्या एकुण 350 ते 400 दुधपावडर गोण्या गोडावुन चे शटर तोडुन चारीस गेल्या वायत फिर्यादीने फिर्यादमध्ये नमुद केले होते. गुन्ह्याचा तपास चालु असतांना दिनांक 15/07/2020 रोजी तपास पथकास गुन्ह्यातील आरोपीचायत गोपनीय माहीती मिळाली त्यावरुन प्रभारी अधिकारी जनार्दन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक,तपास अधिकारी ज्ञानेश्वर थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई यांनी स्वतंत्र दोन पथके तयार केली मिळालेल्या माहीती प्रमाणे तपास सुरु केला. गोपनीय माहीती प्रमाणे शिंगवे तुकाई शिवारात सापळा रचुन आरोपींना शिताफीने पकडले,त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे ज्ञानेश्वर
मछिद्र पुंड वय 26 वर्ष रा शिंगवेलुकाई ता नेवासा य आविनाश एकनाथ विरदकर वय 28 वर्ष रा शिंगवेलुकाई ता नेवासा असे
सांगितले.दोघां आरोपीना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चोरीबाबत विचारपुस केली असता सुरवातीला त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे
दिली.त्याच्यावर संशय असल्याने पोलीस स्टेशनला आणुन त्यांच्याकडे कोशल्यपुर्ण व विश्वासात घेवुन विचारपुस केली
असता,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,सदर गुन्हा वरील दोन आरोपीसह अधिक एक आरोपी असे एकुण तिन आरोपींनी केल्याचे नमुद अटक आरोपींनी सांगितले.आरोपींनी गुन्हा करण्यासाठी एका मालवाहु गाडीचा वापर केला आहे.तसेच नमुद गाडी व मुदेमाल आरोपी ज्ञानेश्वर पुंड रा शिंगवेतुकाई ता नेवासा यांचे घराच्या परीसरात ठेवले असल्याबाबत आरोपींनी माहीती दिलेवरुन सदर ठिकाणी जावुन पंचासमक्ष पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्ती मालाचे वर्णन :1) किंमत 3,93,750 /- रुपये किंमतीचा गोवर्धन कंपनीच्या Lacto rich Deprotienized Whey Permeate powder spray dried च्या 25 किलो वजनाच्या एकुण 210 गोण्या. 2) किंमत 7,00,000/- रुपये - एक अशोक लेलंड कंपनीची मालवाहु गाडी क्रं MHI7BY 4864 
3) किंमत 50/- रुपये एक कुलुप.
4) किंमत 10/- Hacksaw Blade असा एकुण 10,93,810 /- रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला. आरोपी ज्ञानेश्वर मच्छिंद्र पुंड वय 26 वर्ष व आविनाश एकनाथ विरदकर वय 28 वर्ष दोघे रा शिंगवेतुकाई ता नेवासा यांना दिनांक 16/07/2020 रोजी अटक करुन मा न्यायालय नेवासा यांचे समक्ष हजर केले असता,मा न्यायालयाने आरोपींचा दिनांक 20/07/2020 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांडचा आदेश केला आहे. सदरची प्रशंसनीय कारपाई श्री.अखिलेशकुमार सिंह,मा.पोलीस अधिक्षक सो अहमदनगर, दिपाली काळे मॅडम,मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, श्री मंदार जवळे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.ठाणेदार श्री.जनार्दन सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर चोरात, पोहेको दत्तात्रय गावडे, पोना शिवाजी माने , पोको विठ्ठल थोरात, पोका चावा वाघमोडे,पोको शित्रे,पोकों सचिन टोंबरे पोको मृत्युंजय मोरे ,पोको अमोल भांड यांनी केली.

राहाता : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणाने तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना राहाता तालुक्यातील को-हाळे गावात घडली. अनिल काशिनाथ खरात (वय २३) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने दि.१२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून  त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नरोडे हे करीत आहेत.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)श्रीरामपूर शहरात काल 23 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 20 जण हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट तपासणीतील तर एक जण अशोकनगर व दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतील आहे. तालुक्यातील करोनाबाधिताचा आकड 68 वर जावून पोहोचला आहे.खासगी रुग्णालयात उपचार करुन तपासणी करण्यात आलेल्यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व व्यापारी असो.चे माजी पदाधिकारी तर दुसरी महिला ममदापूर येथील करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहे. ती श्रीरामपूर येथील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली असता तिचा स्त्राब घेवून खासगी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यातआला होता. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला.तर रात्री साडेदहा वाजता आलेल्या एकूण 21 अहवालात 20 अहवाल हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमधील आहेत.एक जण अशोकनगरचा आहे. वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधित मयत व्यक्तीच्या घरातीलच दोन महिला, तीन मुलांचा समावेश आहे तर त्यांच्याच संपर्कातल अन्य काही लोक आहेत. वकील पॉझिटिव्ह असलेले रुग्णाचे वडील व त्याच्या लहान मुलाचा समावेश आहे. यामुळे वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधितांचा आकडा 34 तर श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधिताचा आकड 68 वर जावून पोहोचला आहे. काल आलेल्या अहवालापैकी 38 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.श्रीरामपूर शहरातील संतलूक रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्रातून तिघे जण बरे होवून घरी परतले आहेत. या कोविड केंद्रातून आतापर्यंत तालुक्यातील 14 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget