श्रीरामपूर(प्रतिनिधी)श्रीरामपूर शहरात काल 23 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 20 जण हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट तपासणीतील तर एक जण अशोकनगर व दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतील आहे. तालुक्यातील करोनाबाधिताचा आकड 68 वर जावून पोहोचला आहे.खासगी रुग्णालयात उपचार करुन तपासणी करण्यात आलेल्यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व व्यापारी असो.चे माजी पदाधिकारी तर दुसरी महिला ममदापूर येथील करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहे. ती श्रीरामपूर येथील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली असता तिचा स्त्राब घेवून खासगी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यातआला होता. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला.तर रात्री साडेदहा वाजता आलेल्या एकूण 21 अहवालात 20 अहवाल हे वॉर्ड नं. 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमधील आहेत.एक जण अशोकनगरचा आहे. वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधित मयत व्यक्तीच्या घरातीलच दोन महिला, तीन मुलांचा समावेश आहे तर त्यांच्याच संपर्कातल अन्य काही लोक आहेत. वकील पॉझिटिव्ह असलेले रुग्णाचे वडील व त्याच्या लहान मुलाचा समावेश आहे. यामुळे वॉर्ड नं. 2 मधील करोनाबाधितांचा आकडा 34 तर श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधिताचा आकड 68 वर जावून पोहोचला आहे. काल आलेल्या अहवालापैकी 38 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.श्रीरामपूर शहरातील संतलूक रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्रातून तिघे जण बरे होवून घरी परतले आहेत. या कोविड केंद्रातून आतापर्यंत तालुक्यातील 14 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
Post a Comment