श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी शहर हद्दीतील पाटाच्या पुलापासून ते गोंधवणी पाण्याच्या टाकीपर्यंत केलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या सिलकोट व कारपेटच्या कामात तफावत ठेवून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याबद्दल मा.जिल्हाधिकारी साहेब व संबंधित सर्व वरिष्ठांना तक्रारी देऊन देखील कुठलीही चौकशी व कारवाई न झाल्यामुळे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने पाण्याच्या टाकीजवळ शांततेच्या मार्गाने मास्क व सोशल डिस्टन्सिगचे पालन करून आंदोलन करण्यात आले याबाबत माहिती अशी की शहर हद्दीतील पाटाच्या पुलापासून ते गोंधवणी पाण्याच्या टाकीपर्यंत ५५० मीटर रुंदीचा दोन्ही बाजूच्या सिलकोट व कारपेटच्या कामाचे संबंधित नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदार यांनी केले असून सदरील रस्त्याच्या कामकाज अंदाजे रक्कम ५७ लाख १० हजार रुपये एवढी आहे परंतु संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत ठेवून व कामे मंजूर करून कामे पूर्ण झाल्याचे कळविले आहे तसेच रस्त्याचे सिलकोट व कारपेटची कामे करतांना प्रथम रस्ता एक ते दीड फूट खोल खोदून त्यामध्ये
खडी टाकून रोलर दाबून घ्यावी लागते नंतर सिंगल लेयरचे व डबल लेयरचे कारपेट करावी लागते परंतु ठेकेदारांनी रस्ता न खोदता काही ठिकाणीच खडी दाबून सिंगल लेयर चे कारपेट केले तर काही ठिकाणी कारपेट न करता डांबरचे टेपकॉट मारून त्यावर डस्ट खडी मारून सिलकोटची कामे झाल्याचे भासविले तसेच ज्या ठिकाणी कारपेटची कामे केली त्याठिकाणी कारपेट कामाची जाडी (थिकनेस) शासकीय मानकाप्रमाणे न घेता काही ठिकाणी एक इंच तर काही ठिकाणी 2 इंच जाडी ठेवून कामे करण्यात आली तसेच संपूर्ण रस्त्याच्या कामात डांबरचे प्रमाण कमी प्रमाणात ठेवून कामे करण्यात आली त्यामुळे पहिल्या पावसात रस्त्याची मटेरियल वर येऊन रस्त्यावर खडे पडण्यास सुरुवात झाली यावरून आम्ही सदरील रस्त्यावर पडलेल्या खड्याची छायांकित प्रती व व्हिडिओ शूटिंग काढून सर्व वरिष्ठांना पुरावे सादर केले आहे परंतु संबंधित श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी गैरप्रकार झालेल्या रस्त्याच्या कामाची ठेकेदाराची कुठलीही चौकशी व कारवाई न करता आम्हाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे झालेल्या रस्त्यांची कामे व शासकीय मानकाप्रमाणे आहेत असे म्हणून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे समजते तरी माननीय
नगराध्यक्ष मॅडम यांनी या सिलकोट व कारपेटच्या आलेल्या रस्त्याची चौकशी व कारवाई होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व कामाची काढण्याच्या तयारीत असलेले बिले मंजूर करू नये तसेच संबंधित
ठेकेदाराला यापुढे काम देऊ नये व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे जेणेकरून कुठल्याही काम संबंधित ठेकेदाराला भेटणार नाही याची नोंद घ्यावी यावेळी सदर निवेदन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट साहेब यांना देण्यात आले यावेळी मास्क व सोशल डिस्टनचे पालन करून आंदोलन करण्यात आले तसेच या आंदोलना प्रसंगी लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण राज्य संपर्कप्रमुख शेख अहमद नसीर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रज्जाकभाई शेख जिल्हा सचिव राजेंद्र त्रिभुवन जिल्हा संघटक संजय नवगिरे रईस शेख किशोर खंडागळे शाबीर शहा आदी उपस्थित होते.
Post a Comment