Latest Post

बुलडाणा - 29 जून
शेतकरी नेते रविकांत तुपकार आक्रमक होत त्यांनी आज 29 जून रोजी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालायात पोहोचन हल्लाबोल आंदोलन करत शेतकऱ्यांना आजच नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांची फसवणुक केल्यामुळे ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून व कृषी अधीक्षक कार्यालय व पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
     संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी व महाबीज नी शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली आहे.याच बियांयांची शेतकऱ्यांनी आपले शेतात पेरणी केली परन्तु बियाणे उगावलेच नाही. बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड कंपणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गेल्या 4 तासापासून हल्लाबोल आंदोलन चालू केले आहे.जर शेतकऱ्यांना आजच्या आज नुकसान भरपाई मिळाली नाही व कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर कृषी अधीक्षक कार्यालय व ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून पेटवून देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री  रविकांत तुपकरांनी दिला आहे.तुपकर आक्रमक होताच कार्यालायात पोलिस बल दाखल झालेला असून सायंकाळी 7:45 वाजे पर्यंत तुपकरचा आंदोलन सुरुच आहे.

दि.२५/०६/२०२० रोजी सोनई पोलीस पोलीसांनी घोडेगाव येथे आरोपी नामे निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार
रा.घोडेगांव ता.नेवासा याचे ताब्यातुन एक गावठी कटटा हस्तगत करुन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करुन त्याचेकडे गुन्हयासंदर्भात कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने त्याचा मित्र विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे यास
आणखी एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुस विकल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि जनार्दन सोनवणे यांनी मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पुर्व परवानगीने सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ दत्ता गावडे, पोकॉ बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले. सदर पथकाने पुणे येथे जावुन हडपसर पोलीस ठाण्याचे पथकाची मदत घेवुन गुन्हयात पाहीजे आरोपी विजय बाळु सोनवणे याचा शोध घेवुन व त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुसे पंचासमक्ष हस्तगत केले आहे. आरोपी विजय बाळु सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणुन अटक करुन त्यास मा न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपीस ३ जुलै पर्यत पोलीस कस्टडी रिमांड
मिळाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत. आरोपी विजय बाळु सोनवणे याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३०/२०१७ भा.द.वि.क. ३०२, ३९४(अ), ३४ प्रमाणे २. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३५८/२०१८ भा.द.वि.क. ३०७,३९७,३४ प्रमाणे सदरची प्रशंसनीय कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह साो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि/ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ दत्ता गावडे, पोना शिवाजी माने, पोकॉ विठठल थोरात, पोकॉ बाबा वाघमोडे व पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे.

जळगाव - चाळीसगावात खासगी वाहनामधून प्रवासी वाहतुकीच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस नाईकासह एका खासगी व्यक्ती (पंटर) ला न्यायालयाने चार वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड सुनावला आहे.तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे हे चाळीसगावात कॅप्टन कॉर्नर येथून मारुती ओमनी वाहनात प्रवासी भरत होते.या वेळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (वय ४४) तेथे आले. चाळीसगाव येथून प्रवासी वाहतूक करायची असेल, तर मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकूण ८०० रुपये लाचेची मागणी पोलीस नाईक पाटील यांनी तक्रारदाराकडे केली. रक्कम दिली नाही, तर तुला प्रवासी वाहतूक करू देणार नाही व वाहनावर कारवाई करणार, असा इशारा दिला.याबाबत जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ मार्च २०१६ रोजी तक्रार दाखल झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी करुन सापळा रचला.पोलीस नाईक पाटील याने ८०० रुपयांची लाचेची मागणी ३१ मार्च २०१६ रोजी केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी मोहन भिका गुजर (वय ५४) याच्यामार्फत १ एप्रिल २०१६ रोजी साईदत्त हॉटेल येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.चार साक्षीदार तपासलेयाबाबत आरोपींविरुद्ध जळगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.त्यानंतर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील भारती खडसे यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. यात तक्रारदार स्वप्निल कृष्णा अहिरे, पंच भाऊसाहेब बागुल, सक्षम अधिकारी, तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या कामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.अशी आहे शिक्षायाप्रकरणी पोलीस नाईक आबासाहेब पाटील, मोहन भिका गुजर यांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शिक्षा सुनावली. लाच मागितल्याप्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व लाच स्वीकारल्याप्रकरणी चार वर्ष सक्त मजुरी, तसेच दोन्ही कामात प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपी मोहन गुजर याला कलम १२ अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  बोल्हेगाव परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे व या अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महापालिकाच्या अग्निशमन विभागात काही दिवसांपूर्वी कर्मचारी असलेल्या बोल्हेगाव येथील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला महापालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून अनुकंपा तत्वावर भरती केले आहे. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. या महिलेच्या मुलाने आपल्या आईसह डॉ. बोरगे, मिसाळ व घाटविसावे हे रात्री घरी येऊन दारूची पार्टी करतात, धिंगाणा घालतात व मला मारहाण करून चटके देतात अशी व्यथा आधी पोलिसांकडे व नंतर चाईल्ड लाईनकडे मांडली होती. चाईल्ड लाईनने या मुलाचा जबाब नोंदवून तो रविवारी पोलिसांना सादर केला. यानुसार पोलिसांनी संबंधित मुलाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506 तसेच बाल अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहे.

बुलडाणा - 27 जून
बुलडाणा जवळच्या नांद्राकोळी येथील 23 वर्षीय युवकाची दुचाकीने रस्त्यावर उभे असलेल्या टिप्परला मागून धडक दिल्याने युवकाचा घटनास्थलीच मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.ऋषीकेश संजय जवंजाळ असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो रात्री काही कामानिमित्त बुलडाणा कडे जात असतांना हा अपघात घडला आहे.प्राप्त
माहितीनुसार बुलडाणा-नांद्राकोळी या रसत्यात पालसिद्ध कंस्ट्रक्शन कंपनीचा नादुरुस्त टिप्पर उभा होता व रात्रीच्या वेळी अंदाज ना आल्याने ऋषीकेशची बाइक टिप्परला मागून जोरात धडकली व तो गंभीर जख्मी झाला त्याला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.मृतकाने 15 दिवसांपूर्वीच स्प्लेंडर प्रो ही नवीन दुचाकी घेतली होती.बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात मृतकाचे काका सुखदेव जवंजाळ यांच्या फिर्याद वरुन टिप्पर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा - 27 जून
बुलडाणा जिल्ह्यातले संग्रामपूर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय आहे. वानखेड,पातुर्डा,वरवट बकाल,बावनबीर या परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुुुळे वाण नदी सह परिसरातील लहान नद्या व इतर नाल्यांना पूर आलाय.पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत  विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे.या पावसामुळे शेकडो  हेकटरवरील
पेरणीचे नुकसान झालंय तर नदी काठचे शेत खरडुन गेले आहे तसेच अनेक शेतात पाणीच पाणी असल्याने शेता शिवाराना तलावाचे स्वरूप आलेले आहे. वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ इथली वाहतूकही विस्कळीत झाली होती या सोबतच इतर पुलावरुन ही पुराचे पाणी वाहत होते.बावनबीर परिसरात सरासरी 85 मिलिमीटर  पातूर्डा इथं 55 मिलिमीटर नोंद झाली असून संग्रामपुर परिसरात सरासरी 64 मिलिमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात ही पाणी घुसल्याने घरांचे ही नुकसान झालाय तर वरवट बकाल येथील बाजार समिति मध्ये ठेवलेला धान्य व इतर पाण्यात भिजुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आमदार डॉ. संजय कुटे यांनी वरवट बकाल बाजार समिति व मतदार संघातील इतर भागात जाऊन पुर परिस्थितिचा आढावा घेतला.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- छोट्या व्यवसायीकांना काही नियम व अटीच्या शर्तीवर दुकाने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सर्व नियम धाब्यावर बसवुन व्यवसाय केले जात असुन कोरोना बाधीत व्यक्ती ही बेलापूरातील एकाची नातेवाईक असल्यामुळे नागरीकात भितीचे पसरले आहे       कोरोना बाधीत व्यक्तीचे नातेवाईक बेलापूरात असुन ती व्यक्ती नातेवाईकाकडे आल्याची जोरदार चर्चा गावात पसरली असुन सबंधीताकडे वैद्यकीय अधीकारी व कोरोना पथक जावून आले आहे या चर्चेमुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे तसेच बेलापूरात छोट्या मोठ्या व्यवसायीकांना काही नियम व अटीच्या शर्तीवर दुकाने चालू करण्यास परवानगी दिली असली तरी व्यवसाय करणाराच्या तोंडाला मास्कच नाही ना दुकानात सँनिटायझर  गावात अनेक नागरीक विनाकारण फिरताना दिसत असुन कुणाच्याही तोंडाला मास्क लावलेले नाही ना सोशल डिस्टनचे पालन  त्यामुळे बेलापूरकरांचा जिव टांगणीला लागला आहे या सर्वावर कोण नियंत्रण ठेवणार कोरोना कमीटी कुठे गेली असा सवाल ग्रामस्थाकडून विचारला जात असुन तोंडाला मास्क नसणार्या नागरीकावर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई  करावी तसेच जे व्यवसायीक नियम पाळत नाही त्याचेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget