Latest Post

श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. मात्र असे असताना देशात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या कारभाराचा यावेळी काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला.

अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील 24, कर्जत तालुक्यातील 02, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या आता 105 इतकी झाली आहे.नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात 06, वाघगल्ली नालेगाव भागात 04, तोफखाना भागात 12 आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील 05 करोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली आहे. करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील 03, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

बुलडाणा - 26 जून
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय काही ना काही गोष्टी मुळे नेहमीच चर्चेत राहतो.प्रसूति वार्डच्या पोर्च मध्ये एक डुक्कर रक्त चाटत असल्याचा किळसवाणा वीडियो समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्हाच हादरुन गेला होता, आता हे प्रकरण शांत होत नाही तर रुग्णालय परिसरातील एक मोठा चंदनचा झाड जवळपास दोन दिवस अगोदर कोणी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना 25 जून रोजी उघडकीस आली आहे.त्यामुळे रुग्णालय परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्हा सामान्य रुगनालायातील मोटरवाहन गैरेज लगतची पाण्याची टाकी जवळ असलेला मोठा चंदनचा झाड रात्रीच्या वेळी कोणी चंदन तस्कराने लंपास केला आहे. ही घटना रुग्णालय प्रशासनाला माहित असतांना हा महाग झाड चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही.चोरी गेलेला चंदन अंदाजे 30 ते 35 हजाराचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशाच प्रकारे रुग्णालय परिसरात इतर चोरीच्या घटना नेहमी होत असते,त्या मुळे येथे तैनात सुरक्षा रक्षक काय करतात,असा प्रशन उपस्थित होत आहे.

बुलडाणा - 25 जून
जिल्हा पोलीस दलाच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांच्या तातडीच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी स्व. दिपक जोग स्मृती भवन येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे फित कापून उद्घाटन आज 25 जुन रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले, पोलीस उपअधिक्षक (गृह) बळीराम गिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक  गिरीष ताथोड आदींची उपस्थिती होते.  
        तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी येथे व्हिसीच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कोविड केअर सेंटरविषयी माहिती दिली. सेंटरचे चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री यांनी पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या केसमध्ये दोन वेळा अकोला सामान्य रूग्णालयात जावून आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा राजपूत यांच्याविषयी चौकशी केली. त्यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्याचहस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्याच्या सूचना देत त्यांच्यासमोर त्यांनी ऑनलाईन उद्घाटन करायला लावले.  त्यानुसार महिला काँन्स्टेबल पुजा राजपूत यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
       त्यानंतर रविकांत तुपकर यांच्याहस्ते कोविड केअर सेंटरच्या पलिकडील भागात असलेल्या उपहारगृहाचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आलेल्या विंधन विहीरीच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

"बिंदास न्यूज" ची बातमीचा इम्पेक्ट
बुलडाणा - 25 जून
बुलडाणा जिल्हा सामान्य रुगनालायातील महिला प्रसूति वार्डच्या पोर्च मध्ये डुक्कर रक्ताचा स्वाद घेत असल्याचा भयंकर व किळसवाणा प्रकार सर्व प्रथम "बिंदास न्यूज" ने बातमीच्या माध्यमाने समोर आनल्या नंतर प्रशासन जागी झाला व आज गुरूवारला रुग्णालय परिसरातील मोकाट डुक्कर पकडण्याची मोहिम नगर पालिकेने सुरु केली आहे.
       सध्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणाची धावपळ सुरु आहे. मात्र कोरोना व इतर आजारग्रस्तांवर देखील लक्ष ठेवणे आवश्यक असतांना बुलडाणा जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर दिसून येत आहे. डुकरांचा येथे
मोठा सुळसुळाट असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताटातील अन्न सुद्धा डुकरे पळवितात. त्यामूळे डूकरांचा बंदोबस्त जरुरी आहे.परंतू इच्छाशक्ती नसली की, सर्व काही आलबेल असते. प्रसूती वार्डच्या पोर्च मध्ये महिलेचे सांडलेले रक्त चाटत अस्ताननाची जेव्हा बातमी "बिंदास न्यूज" वर झळकली तेव्हा एकच खळबळ उडाली.इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कान उघडनी तर केलीच आरोग्य उपसंचालक अकोला व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुद्धा रुग्णालयात जावून परिस्तिथिचा आढावा घेतला.इतकेच नव्हे जिल्हाधिकारी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित वर ताशोरे ओळत स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.दरम्यान बुलढाणा  नगर परिषदेला याबाबत अवगत करण्यात आल्याने डूकरांची धरपकड सुरु झाली आहे.असे असले तरी रुग्णालयावर स्वच्छते संदर्भात उपचार अत्यावश्यक झाले आहेत, अशी मागणी बुलडाणेकर करीत आहेत.

शिर्डी (शहर प्रतिनिधी ) दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच केला मित्राचा भोकसून खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली असून मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इकराम पठाण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका महिण्यात शिर्डीत दूसरा खून झाल्याने शहरातील गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.दरम्यान लाँकडाऊन काळात मोलमजुरी तसेच हातावर पोट भरणाऱ्या लोकांना पैशाची चणचण भासत आहे. गेल्या तिन महिण्यांपासून हाताला काम नाही त्यामुळे उपासमारीची वेळ सर्वांवर उद्भवली आहे. शिर्डीत पंधरा दिवसांपूर्वी खुनाची घटना ताजी असतांना पून्हा एका मजूराचा पैशाच्या कारणावरून खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

🔹धक्कादायक  वीडियो आला समोर
बुलढाणा - 24 जून
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे.या जिल्हा रुग्णालयातील प्रसूती वार्ड मधील एक हादरनारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे,या व्हिडिओ द्वारे हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रसूति वार्ड ची सुरक्षा व स्वच्छता किती ततपर आहे हे लक्षात येते. रुग्णालयातील प्रसूती कक्षाच्या आतील पोर्च मध्ये प्रसूती दरम्यान पडलेले रक्त डुक्कर कडून चाटल्या जात आहे.हा गंभीर प्रकार 23 जून च्या रात्री 9 वाजेच्या सुमारास चा असून हा वीडियो समोर आल्याने जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे.
         बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील जास्तीत जास्त गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंदू,शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालयात ये-जा सुरु असते. सद्या कोरोना विषाणु पसरलेला असल्याने मोठ्या प्रमाणात खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे.त्यामुळे लोकांना सरकारी दवाखानेच आधार ठरत आहे अशात आता पर्यंत टोलवा टोलवी करून आपली ड्यूटी करणारे सरकारी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना ही नाइलाजाने कामे करावी लागत आहे पण हे लोक आपला कर्तव्य फार इमानदारिने पूर्ण करत नसल्याचे चित्र दिसत आहे.याचाच एक उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूति वार्डचा वीडियो आहे.या रुग्णालयात येणाऱ्या महिलांची प्रसूती विशेष प्रसूती कक्षामध्ये केली जाते मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये प्रसूती कक्षाच्या पोर्च मध्ये खूप मोठे रक्त फर्शीवर सांडलेले असून या वार्ड मध्ये घुसुन एक डुक्कर त्याला चाटत आहे.या हादरुन सोडणाऱ्या वीडियो मुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कामकाज समोर येत आहे.रुग्णालय परिसरात मोकाट डुक्करांनी हैदोस घातला असून रुग्णालय प्रशासनाला या कडे लक्ष देण्याची गरज आहे.या प्रकरणी संपर्क साधला असता जिल्हा रुग्णालय प्रशासन काही प्रतिक्रिया देत नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget