Latest Post

कोरोनाचा प्रकोप पाहता बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटिल भुजबळ यांच्या निर्देशाने सामाजिक कार्यात आग्रसर युवकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करुन कोरोनाला पराभूत करण्याचे युद्ध स्तरावर प्रयत्न त्यांनी चालविले आहेत.जिल्ह्यात समाजकार्य शिक्षणाची पदवी घेणाऱ्यां युवकांना यात प्राधान्य देण्यात आले असुन 1073 विशेष पोलिस अधिकारी विना मूल्य एका पोलिस सारखी सेवा देत आहे.
    आज जागतीक पातळवरील संकट पाहता देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहना नुसार त्याचा सामना करण्यासाठी संबधीत विभागातील कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे.कोव्हीड योध्दा म्हणुन बुलडाण्यातून समाजकार्य शिक्षणाची पदवी
घेतलेले प्रभाकर वाघमारे यांचे सह इतर इच्छूक व प्रामाणिक अशा जवळपास 1073 च्यावर व्यक्तींना कोव्हीडच्या पृष्ठभूमीवर जनजागृती व या संकटावर मात करण्यासाठी बुलडाणा एसपी डॉ दिलीप पाटिल भुजबळ यानी  प्रमाण पत्र देऊन कोव्हीड योध्दा म्हणून विशेष पोलिस अधिकारी ची जबाबदारी दिली आहे.जिल्ह्यात कार्यरत हे 1073 विशेष पोलिस अधिकारी शहरी व ग्रामीण भागात कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दवंडी,अनाउंसमेंट व इतर  माध्यमातून कार्य चालविले आहे. जिल्हयातील 1073 विशेष पोलीस अधिकारी हे कुठलेही मानधन की किंवा मोबदला न घेता समाज सेवेचा वसा घेवून देशावर आलेल्या कोरोना संकटाशी सामना करीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.

अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनकाळात गैरफायदा घेत एमआयडीसीमधील कामगारांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघ व क्रांतीसिंह कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला. मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत घोषणा देत कारखाना मालकांवर कारवाई करण्याची मागणी केली.कोरोनाच्या लॉकडाऊन काळात नोकर कपात करू नये, वेतन कपात करू नये असे आदेश असताना नगर एमआयडीसीमधील कारखानदार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. यामुळे कामगार वर्ग त्रासला आहे. या कारखानदारांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरवात पत्रकार चौक येथील शहिद भगतसिंह उद्यानातील भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सुरवात झाली. या मोर्चात कॉम्रेड बहिरनाथ वाकळे, महेबूब सय्यद, रामदास वाघस्कर सहभागी झाले होते. पत्रकार चौक ते डीएसपी चौक, कोठला स्टँड, स्टेट बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.त्यानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, कामगार प्रामाणिकरणे काम करीत आहेत. कारखान्याची उन्नती व्हावी, यासाठी घाम गाळत आहेत. तरीही काही अपप्रवृत्ती प्रयत्नांना दाद देत नाहीत. औद्योगिक कायदे, कामगार कायदे, शासननिर्णय, न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत. नफेखोरीच्या नादात कामगारांचे कायदेशीर हक्क डावलले जात आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा सर्रास भंग केला जात आहे. कामगारांना कायम न करता वर्षानुवर्षे कंत्राटी दाखवून कायद्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. मुख्य उत्पादनाचे कायम कामही कंत्राटी कामगाराकडून करून घेतले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने कामगारांना दिलासा देण्यासाठी वेतन कपात व कामगार कपात न करण्याचा आदेश दिला. या आदेशाला एमआयडीसीमधील काही कारखानदार जुमानत नाहीत. सरकारी अधिकाºयांनाही ते टोलवाटोलवी करतात. अधिकाºयांचे फोन कॉलही ते स्वीकारत नाहीत. कामगारांना बेकायदेशिरपणे कामापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कामगारांना आॅफिसमधे बोलावून बळजबरीने राजीनामे घेतले जात आहेत. जे कामगार राजीनामे देत नाहीत त्यांना बेकायदेशिरपणे निलंबित केले जात आहे. हे प्रकार तातडीने कारवाई करून थांबवावेत, अशी विनंती मोरे यांच्याकडे करण्यात आली. चौकशी करून कारवाईचे आश्वासन मोरे यांनी दिले.

अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर दि.१३- अंभोरा चेक पोस्ट येथे सापळा लावून दोन अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या डिबीला यश आले आहे. संतोष नंदू भोसले (वय १९), काळू निलगिर्या भोसले (वय ३०, दोघे रा.वाळूंज पारगाव ता.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चंदन इस्टेट मध्ये बंगाल्याच्या दराचे कुलूप तोडून चोरीप्रकरणी दाखल गुन्हातील आरोपी हे अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवालीचे पो.नि. प्रविण लोंखडे यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अंभोरा चेक पोस्टवर सापळा लावून संतोष नंदू भोसले , काळू निलगिर्या भोसले या दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. यावेळी पोलीस खाक्या दाखविताच, कोतवाली हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.प्रविण लोंखडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार डिबीचे पोसई सतिश शिरसाठ, अंभोरा पोस्टचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, कोतवालीचे पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापू गोरे, गणेश चव्हाण, देवडे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- आमच्या आडीच वर्षाच्या कार्य काळातील संपुर्ण कामकाजाची निपक्षपातीपणे चौकशी  करुन आम्ही दोषी आढळल्यास आमच्यावर फौजदारी कारवाई करा असे आव्हानच बेलापूरचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी देवुन सत्ताधार्यांना एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे         बेलापूर ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या राधाताई बोंबले या सरपंच असुन सर्व कारभार त्यांच्या वतीने बाजार समितीचे संचालक सुधीर नवले हे पहात आहेत सत्ताधारी पार्टीचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी मागील मासीक बैठकीत आपला विरोध नोंदवुन या पुढे आमच्या परवानगी शिवाय आर्थिक व्यवहार करु नये असे लेखी दिलेले असतानाही एक तास उलटत नाही तोच एक धनादेश देण्यात आला त्यामुळे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी ग्रामविकास अधिकार्याकडे विविध माहीती मागीतली असुन पंधरा दिवस होवुनही ती माहीती दिली गेली नाही त्यामुळे खटोड यांचा पारा चांगलाच चढला या वेळी ग्रामपंचायतीतील सर्व कामे ही पारदर्शीच झाली पाहीजे चुकीचे काम करणारांना आम्ही पाठीशी घालणार नाही असे म्हणताच बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की माजी सरपंच भरत साळुंके यांच्या काळातील सर्व कामे नियमाने झाली का ? टाळ खरेदी कोणत्या पध्दतीने झाली त्यावर रविंद्र खटोड यांनी आम्ही पारदर्शी कारभार केला असुन टाळ खरेदी करताना ई परचेसींग केलेले आहे आणी आमच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्याचा अर्ज मीच देतो अन दोषी सापडलो तर फौजदारी कारवाई करा पण कुणाचेही चुकीचे काम यापुढे खपवुन घेणार नाही  अंगणवाडीचे साहीत्य सदस्यांना न विचारता खरेदी केलेच कसे कोणत्या बैठकीत हा विषय घेतला हे दाखवुन द्या ग्रामपंचायतीने खरेदी केलेला संगणक दुसर्याच्या घरी गेलाच कसा? तो कुणाच्या घरी होता त्या अधिकार्याचे लेखी पाहीजे अशी तंबीच खटोड यांनी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिली सी सी टि व्ही खरेदीची सर्व कागदपत्रे मला हवी आहे असे बजावुन टाळ खरेदीच्या कागदपत्राचीच फाईल उपस्थित सर्वासमोर ठेवुन कुणीही चौकशी करा असेही खटोड यांनी बजावले  या वेळी माजी सदस्य अशोक गवते यांनी नळ कनेक्शनचे पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला त्या वेळी खटोड यांनी तातडीने गवते यांना बोलावुन खुलासा करण्यास सांगितले गवते यांनीही आडीच वर्षात मी एकाही व्यक्तीकडून पैसे घेतले नसुन ज्यांचे म्हणणे असेल ते पैसे ग्रामपंचायत कार्यालयात जमा झालेले असेल असे सांगितले या वेळी खटोड यांनी राजकारण हा आमचा धंदा नसुन आम्ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन काम करत असल्याचे सांगितले ग्रामपंचायत कार्यालयात बर्याच नागरीका समोरच दोन नेत्यामध्ये चांगलीच तु..तु.,.मै..मै..झाली त्याची दिवसभर गावात चर्चा असुन गावात चाललेली सर्व विकास कामे ही पारदर्शिपणे व्हावीत अशीच नागरीकांचीही अपेक्षा आहे.

बुलडाणा - 13 जून
बुलडाणा तालुक्याती सैलानी येथे माहामार्ग ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका अनेक शेतकरी व नागरिकांना बसला आहे.जोरदार पावसामुळे शेतांचे नुकसान झाले व घरात व दुकानात पाणी शिरले आहे.
       बुलडाणा तालुक्यातील पिंपळगांव सराय जवळ हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह आहे.हिन्दू-मुस्लिम एकतेची प्रतीक या दर्ग्यावर देश भरातून भाविक येत असतात.हे स्थान मुख्य मार्गापासुन आत
असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना फार अडचनीचा सामना करावा लागत होता म्हणून भाविकांच्या सुविधेसाठी दूधा ते हातनी या मार्गचा काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे.ठेकेदार सदर काम संथा गति ने होत असल्याने मागील वर्षी पावसाळ्यात तर सैलानी कडे जाणारा मार्ग तब्बल 4 महीने बंदच होता या मुळे या मार्गावरील गावाच्या नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. 12 जून रोजी सैलानी परिसरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे सैलानीत अनेक घरात,दुकानात रात्रीच्या वेळी पानी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली होती.रसत्याला लागून योग्यरित्य नाल्या नसल्याने पानी शेतात शिरले व शेतात उभे मिर्ची व इतर पिकांचे फार नुकसान झाले आहे.सदर लोकांना ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाउन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये आणि वाहिन्यांवर येत आहेत पण अशाप्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले मात्र स्वयंशिस्त पाळावीच लागेल गर्दी करणे आरोग्याला अपायकारक होईल असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.राज्यात पुन्हा लॉकडाऊन अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नये अशा गैरसमज आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करून दिली
स्वयं शिस्त पाळावी
बाहेर पडल्यावर कायम चेहर्‍याचा मास्क लावणे, साबणाने जंतुनाशक आणि हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगीकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- फेस बुक अकाऊंट हँक करुन मोबाईल धारकाच्या नातेवाईका कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न  थोडक्यात फसला असुन संबधीत मोबाईल धाराकाने सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली आहे          या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे मोबाईल  अज्ञात व्यक्तीने हँक करुन त्या मोबाईल मधील सर्व व्यक्तीचे मोबाईल नंबर  मिळवुन त्यांना मेसेज केले की मला पैशाची अंत्यंत गरज असुन तातडीने फोन पे वर या खात्यावर पैसे पाठविण्याची विनंती केली मात्र हे संदेश पाठविताना पाठविणार्या व्यक्तीने हिंदीतुन संदेश पाठविला त्यामुळे अमोल गाडे यांच्या मेव्हण्याला संशय आला त्यांनी तातडीने अमोलला फोन करुन विचारणा करताच मी पैसे मागीतलेच नाही असे अमोलने सांगताच त्याच्या मेव्हण्याने   मोबाईलचा स्क्रीन शाँट काढून पाठविला त्याच दरम्यान अमोलला एका व्यापार्याचाही फोन आला अन मग अनेक मित्राचे फोन सुरु झाले की तुला अचानक पैशाची काय गरज पडली या प्रश्नामुळे अमोल गोंधळून गेला त्याने तातडीने गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कर्डीले मनोज गोसावी यांना ही घटना सांगीतले त्यांनी ताताडीने व्हाँटसअप वर संदेश पाठविण्यास सांगीतला अशाच प्रकारे गावातील चार पाच जणाचे मोबाईल हँक करण्याच्या घटना घडल्या असुन अमोल गाडे याने अहमदनगर येथील सायबर शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली असुन गाडे यांच्या बरोबर घडलेली घटना आणखी कुणाच्याही बाबतीत घडू शकते त्यामुळे कुणीही विनाकारण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नये असे अवाहन बेलापूर पोलीस स्टेशनचे रामेश्वर ढोकणे यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget