Latest Post

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जनांपैकी करोनाच्या संशयित तीन रुग्णाचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली आहे. तर इतर दोघांना श्रीरामपूर येथे क्वॉरंटाईन करण्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.रुग्णाच्या स्त्राव नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. स्त्राव नमुने चाचणीनंतर लॅबने रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यासह दत्तनगर परिसरातील लोकांसाठी दिलासादायक बाब आहे.करोनाचा संशयित रुग्ण सापडल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली होती. तर संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या करोना व्हायरसने ग्रामीण भागांतही प्रवेश केला, अशी चर्चा सुरू झाली होती. या संशयितांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील लॅबमधून संशयित रुग्णाच्या घशाच्या स्त्राव नमुन्याचे अहवाल आल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला असून, रुग्णाना करोनाची लागण झाली नसून प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते .श्रीरामपूर तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यांमधून नागरिकांचे येणे सुरूच आहे. त्यात दत्तनगरमध्ये आतापर्यंत बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह पंधरा नागरिकांना येथील डी.पॉल शाळेत क्वॉरंटाईन केले आहे. परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गावांतील विविध भागांत जाऊन कोरोना संदर्भात वेळोवेळी जनजागृती करीत आहेत.

टिळकनगर (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जणांपैकी दोन जणांना करोना सदृश्य लक्षणे आढळल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दोघांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवत दोघांचे घशाचे स्त्राव नमुने पुण्याला पाठविले आहेत. त्यांना अहमदनगर येथेच क्वारंटाइन केले आहे. तर इतर तिघांना श्रीरामपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रातोरात संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.करोनावर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील दत्तनगर परिसरातील बरेच नागरिक मुंबई, पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यापैकी करोनाच्या भीतीने मुंबईहून एक कुटूंब मंगळवारी दत्तनगर परिसरात चक्क रिक्षात आले.ग्रामस्थांच्या लक्षात येताच काहींनी सतर्कता दाखवीत ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मुंबईहून आलेल्या या पाच जणांची तपासणी केली असता त्यापैकी दोन जणांना खोकला व ताप असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाने तत्परतेने दोघांना अहमदनगर येथे हलविले व लगेचच त्यांच्या घशाचे स्त्राव घेऊन पुण्याला पाठविले.आज दुपारपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली. तर उर्वरित तिघांना श्रीरामपूर येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह येथे क्वारंटाइन करण्यात आले. तसेच ज्यांच्या घरी मुंबईहून हे पाचही आले होते त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.दोघांना अहमदनगर येथे नेताच सोशल मीडियावर दत्तनगर येथे करोनाचा संसर्ग असलेला रुग्ण सापडल्याची काहींनी अफवा पसरवली. सोशल मीडियात वेगाने पसरणार्‍या अफवांमुळे एकूण वातावरण गोंधळाचे, संशयाचे, भीतीची होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. करोनाबाबत कुणीही अफवा, खोटे वृत्त, माहिती पसरवू नये.नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे. असे आवाहन जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, जि.प. सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकलोळ, भीमराज बागुल, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर आदींनी केले आहे.दरम्यान, या व्यक्तींनी प्रवास करण्याचा अथवा स्थलांतर करण्याबाबतचा परवाना न घेता प्रवास केला. व प्रवासा दरम्यान साथीचा रोग होऊ नये यासाठी काही खबरदारी न घेता आरोपी नं 1 ते 4 यांनी नालासोपारा मुंबई ते श्रीरामपूर असे रिक्षा (नं. एम.एच. 48 बी.एफ. 1253) हिच्यामध्ये प्रवास करुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 918/2020 भा. द. वि. कलम 188, 269 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर ओंकार कारखेले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹महसूल विभागाची परवानगी नसतांना खोदला रस्ता
🔹संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडला
बुलडाणा - 7 मे
जळगांव जामोद तालुक्यातील इस्लामपुर गावा जवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तैयार होत असलेल्या इस्लामपुर उपसा सिंचन योजनेच्या आता पर्यंतच्या झालेल्या कामात  मोठ्या प्रमाणात भरष्टाचार झाल्याची ओरड नेहमी होत असते परंतु काही राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी आपले घशे भरून घेतल्यानेच संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची घटना आज पुन्हा समोर आली आहे.ठेकेदाराने महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच इस्लामपुर-हाशमपुर व शेत रास्ता खोदुन टाकला ही माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर काम बंद पाडला आहे.
      तापी पाठबंधारे विभाग अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यात इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे.जळगाव खानदेश जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनुर धारणाचा तसेच जिगांव धरणाचे पाणी पाइप द्वारे इस्लामपुर योजनेत आणले जाईल व हा पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे.या योजनेत शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली जाणार असून अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन शासनाला विकली आहे.योजेनेच्या कामा संदर्भात अनेक वेळी भरष्टाचार झाल्याचे आरोप होत असतात.अनेक राजकीय नेते व तापी पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी "वाहती गंगेत आपले हाथ धोऊन टाकले" अशी चर्चा नेहमी समोर येत असते.राजकिय नेते व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने योजनेचा ठेकेदार सामान्य शेतकऱ्यांवर दबाव टाकून आपली मरजीने काम करीत आहे.आज 7 मे रोजी ठेकेदाराने इस्लामपुर ते हाशमपुर व इतर शेतात जाणारा रस्ता महसूल विभागाची कोणतीही परवानगी ना घेताच खोदुन टाकल्याने स्थानिक शेतकरी आक्रमक झाले होते व त्यांनी सदर काम बंद पाडला.रस्ते खोदुन टाकण्याची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली का? अशी माहिती जेंव्हा तहसीलदार यांच्याशी काहीनी घेतली असता तहसीलदार यांनी अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, अशे सांगितले.शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांचा धाक दाखवून तापी पाठबंधारे विभागाचे राणे, किशोर चौधरी तसेच ठेकेदारा आपली मनमानी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा काम करीत असून आम्हाला सदर खोदलेले रस्ते सुरु जैसेथे करून द्यावे अशी मागणी स्थानिक शेतकरी अबरार खान,तस्लीम खान,ज़ियाउल्लाह खान,राज़ीक खान,शराफत खान,नज़ाकत खान,सखाउल्लाह खान,शफीक खान,ज़मीर पटेल व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथ नगर येथील शेतमजुरी करनारया  सुतगिरनी परीसरातील आर्चना तिड्के व सरोदे  या  महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चाल ल्या आस्ता फरगडे वस्ती वरील मारुती मंदीर समोरील वळनावर आयशर टेम्पो क्र.Mh-17 BD 0015 या टेम्पोच्या मद्यधुंद ड्रायव्हर ने  निर्दयी पने फरफटत नेऊन धडक दिली आस्ता एका  महिलेच्या डोक्यावरुन पुढील टायर गेल्याने सदर महिला जागीच ठार झाली. दरम्यान दुसरी महिला कामगार हौस्पिटल येथे उपचार साठी नेली आस्ता तीची ही परिस्थीती गंभीर आसल्याचे समजते.       

या रोडवर सतत छोटे मोठे आपघात होत आसतात. या रस्त्यावर लॉक डाउन आसल्यामुळ  मोठ्या प्रमानात वाहतुक सुरु आसून वाळू तस्करी ही मोठ्या प्रमाणात चालते. रात्री बेरात्री वाळू वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत आस्ते. या वाहतुकिचा प्रशासनाने बंदोबस्त करावा आशी मागनी संतप्त नागरिकांनी केली आहे.

पुणे : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ( वय 53) यांचे गुरूवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चार दिवसापूर्वीच त्यांची बदली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली होती.परंतु राज्य शासनाने पुन्हा त्याच्या बदलीला स्थगिती दिली होती. गायकवाड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.गायकवाड बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होते. परंतु गुरूवारी (दि.7) रोजी सकाळी घरी असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला.त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे स्टेशन येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. गायकवाड यांची सहा महिन्यापूर्वीच सातारा येथून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयत अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली होती. शासनाने मागील आठवड्यात महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये साहेबराव गायकवाड यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. परंतु येथे कामगार संघटनांनी राज्य शासन नियुक्त अधिकारी म्हणून गायकवाड यांना अतिरिक्त आयुक्त पदावर हजर करून घेण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान शासनाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. यामुळे बुधवारी ते नेहमी प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदावर रात्री उशिरापर्यंत काम करत होते. गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा   -  राहाता तालुक्यातिल सावळीविहीर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा वाढदिवसा निमित् लॉक  डाऊनचे नियम पाळत वृक्ष रोपण  करण्यात आले तशेच गावातील गोर गरीब लोकांना या कोरोना मुळे  निर्माण झालेल्या  परिस्तिथीत किराणा किट वाटप करण्यात आले त्या प्रसंगी किरण जपे दिनेश आरने चंद्रकांत जपे कापसे आदींनी लोकडाऊन चे नियम पाळत गावात किराणा किट सह साबण व सॅनिटायझर वाटप केले शिवसैनिकांनी ह्या संकटकाळात गोर गरिबांना मदत केल्याने गोर गरिबांनी समाधान व्यक्त केले.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा शिर्डीतील काल तपासणी साठी नेलेले सर्वजन निगेटिव्ह  १४ दिवस होम कोरोटाईन शिर्डीकरांमध्ये आनंद  शिर्डी  येथील रहिवासी असलेले डॉक्टर हे वैद्यकीय सेवेत येवलाला कार्यरत आहेत काही दिवसा पूर्वी ते आपल्या घरी आले होते त्या नंतर ते परत येवला येथे गेले होते त्यानंतर ह्या डॉक्टर ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते खबरदारी म्हणून डॉक्टरच्या साधिण्यात आलेले सर्व लोकांना अहमदनगर येथे तपासणी साठी नेण्यात आले होते तपासणी झाल्या नंतर त्या सर्व लोकांना होम कोरोनटाईन करण्यात आले आहे
व सर्व निगेटिव्ह आहेत अशे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घाघरे यांनी सांगितले सुरुवातीला शिर्डीत मोठी खडबड उडाली होते परंतु बाकीचे लोक निगेटिव्ह असल्याचे समजतात शिर्डीकरांनी समाधान व्यक्त केले संपूर्ण परिसर सॅनिटायजर करण्यात आले व पोलिसांनी दोन वेळेस पदसंचालन केले आहे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला  आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कोणीही कामा शिवाय घरा बाहेर निघू नये प्रशासनास सहकार्य करावे अशे बिंदास न्यूज तर्फे आवाहन करण्यात आले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget