Latest Post

आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत पेट्रोल विक्रीस परवानगी
अहमदनगर, दि. 06 - अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी  ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
            जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक सोईसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ वाढविण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता   (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना,सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा  दि.06-शिर्डी शहर परिसरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक बारामध्ये मधील कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तिंना अहमदनगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर संबधितांना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
            प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ गोकुळ घोगरे, शिर्डी पोलीस, नगरपंचायतचे कर्मचारी, वैद्यकीय पथकाने या परिसरास तातडीने भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये, जर कोणी बाहेरील व्यक्ती आली तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनास देण्यात यावी. या भागातील रहिवाशांनी तसेच शिर्डी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता  घरीच थांबावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हाच उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सूचित केले. 
            साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा  शिर्डी प्रतिनिधी- जय शर्मा ,दि.6: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबिय यांना आज दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने टाळयांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना करण्यात आले. गुरुवारी, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यत सदरहू रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल.
           राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हयात संचारबंदी जारी करण्यात आली असून लॉकडाऊन आदेशीत करण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया पार पडून त्यांच्या गावी आणि राज्यात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने
 आदेशित केले होते. संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया तहसीलदार कुंदन हिरे तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सर्व व्यवस्था केली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. गत दोन दिवसांपासून ही प्रक्रिया पार पाडण्यात येत होती.
            लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1484 जणांनी त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी तालुका प्रशासनाकडे विनंती अर्ज सादर केले होते. त्यापैकी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन 1251 जणांची रवानगी आज रेल्वेद्वारे करण्यात आली. यामध्ये 752 प्रौढ,314 अर्धे तिकीट प्रवासी आणि 185 चार वर्षाखालील बालकांचा समावेश आहे. बावीस डब्यांच्या रेल्वेमध्ये प्रत्येक डब्यात पन्नास प्रवाश्यांची सोय करण्यात आली होती. या सर्वांची योग्य ती वैद्यकी तपासणी करण्यात आली होती. यासाठी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या
मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली होती. विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी साई संस्थानतर्फे जेवणाची, पाण्याचे पाऊच तसेच फूड पॅकेट पार्सलची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेस्टेशनपर्यत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था विविध शाळांच्या  मदतीने करण्यात आली होती. यासाठी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली होती. प्रवरा मेडीकल ट्रस्टच्यावतीने प्रवास करणाऱ्यांसाठी दोन हजार मास्कचा पुरवठा करण्यात आला होता. रेल्वेने प्रवासी पाठविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमपनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली  मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
            लॉकडाऊनसारख्या अडचणीच्याप्रसंगी स्थानिक तालुका प्रशासनाने आत्मीयतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी प्रवाश्यांनी व्यक्त केली. जवळच्या नातेवाईंकाकडे जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

            यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी.एस.प्रसाद, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी) स्कूल व्हॅन मधून विदेशी दारुची वाहतूक करून विक्री करणाऱ्या एकाला भिंगार कँम्प पोलिसांनी बुधवारी आज दुपारी अटक केली आहे. संजय एकनाथ लोणारे (रा. कापुरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चार हजार ६८० रुपये किंमतीच्या ३६ विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी व्हॅन (क्र. एमएच- 12 एएफ- 4889), दारु असा एक लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणारे विरुद्ध भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी दुपारी शहर उपअधीक्षक संदीप मिटके, भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील भिंगार पोलीस ठाण्यात असताना, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांना माहिती मिळाली की, नगर ते कापुरवाडी रोडवर नागरदेवळे फाटा येथे नागरदेवळे कमानी जवळ एक इसम पिवळ्या रंगाच्या मारुती स्कूल व्हॅन मध्ये विक्री करत आहे. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस नाईक आर. ए. सुद्रीक, पोलीस शिपाई सचिन धोंडे यांच्या पथकाने नागरदेवळे फाटा येथील कमानी जवळ जाऊन छापा टाकला. यावेळी स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात आली. यामध्ये विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी लोणारे याला अटक केली असून व्हॅन व दारू जप्त केली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलिसांनी केली.

ब्रेकिंग न्यूज शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ,,,,,,,,,,,,,,,,
 शिर्डी येथील रहिवासी असलेले डॉक्टर कोरोणाग्रस्त असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी घोघरे यांनी बोलतांना सांगितले हे डॉक्टर येवला येथे सेवेत आहेत ते  दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे आपल्या घरी आले होते त्या मुळे त्यांच्या कुटुंबातील व डॉक्टरांच्या संपर्कात एकूण दहा लोकांना तपासणी साठी अहमदगर येथे तपासणी साठी नेले असल्याने प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत त्यांच्या कुटूंबियांना तपासणी साठी येथील  ग्रामीण रुग्णालयात नेले नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून घराबाहेर पडू नये असे बिंदास न्यूज कडून आवाहन करण्यात येत आहे तेव्हा जनतेने सहकार्य करावे

मालेगाव | प्रतिनिधी शहरात करोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असे असतानाही मालेगावातील रस्त्यावरील अनावश्यक गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तात्पुरत्या स्वरुपात मालेगावी नियुक्ती करण्यात आली आहे.कायदा-सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. कडासने यांनी यापूर्वी मालेगावी कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा शहरात जनसंपर्क दांडगा असल्याचे लक्षात घेत ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.मालेगावात मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाल्यानंनंतरदेखील मालेगावातील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पोलीस यंत्रणा २४ तास कर्तव्य बजावत आहे. तरीदेखील नागरिक ऐकण्याच्या पलीकडे गेले आहेत.दरम्यान, आज सक्षम अधिकारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुनील कडासने यांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. एकीकडे रस्त्यावरील गर्दी आटोक्यात आल्याचे कुठेही चिन्ह दिसत नसताना संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर धावून जाण्याचे काही ठिकाणी प्रकार घडले आहेत.दुसरीकडे 70 अधिकारी व पोलीस बाधित झाले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या सोबत आणखी एक सक्षम अधिकारी याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था विभागाने दिल्याने मालेगावी शांतता अबाधित राखण्याला मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर, दि.५ : जिल्‍हयातील नागरी व ग्रामीण भागातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पिटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्‍यावश्‍यक सेवा, कार्यालये, आस्‍थापना वगळून इतर सर्व दुकाने दि. १७ मे, २०२० रोजी पर्यंत संध्‍याकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच या कालावधीत उपरोक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा वगळून इतर कामांसाठी व्‍यक्‍तीच्‍या हालचालीवर निर्बंध असल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. असल्‍याबाबत आदेशीत करीत आहे.ज्‍याअर्थी, राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार, श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणेकामी प्रतिबंधात्‍मक आदेश पारित करण्‍यात आलेले आहेत. नागरिकांची अनावश्‍यक गर्दी टाळण्‍यासाठी जिल्‍हयातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, एटीएम इ. वगळता सर्व दुकाने संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्तीच्‍या हालचालीवरही या कालावधीत निर्बंध लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.   

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget