Latest Post

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या धास्तीने नागरीक घरात बसलेले असताना काही जण आजही करणी चेटूक करत असुन ऐनतपूर येथील नवले वस्तीवरील रस्त्यावर  आढळून आलेल्या टाचणी सुया काटे टोचलेल्या लिंबु वांग्यामुळे  खळबळ उडाली आहे बेलापूर  ऐनतपूर शिवारात असलेल्या नवले वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर कुणीतरी अज्ञात ईसमाने शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या घराच्या पाठीमागे तसेच नवले वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर वांगे लिंबु त्यास टाचण्या खिळे काटे टोचुन टाकलेले आढळून आले या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असुन कुणीतरी या परिसरात दहशत पसारविण्याच्या उद्देशाने हा खोडसळपणा केलेला असण्याची  दाट शक्यता आहे पूर्वी हे प्रकार करताना लिंबाचा वापर केला जात असे परंतु आता भोंदुबाबांनी त्यात प्रगती केली असुन लिंबा बरोबरच वाग्यांचाही वापर सुरु केलेला दिसतो  आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली असतानाही लोकांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रध्देचे भूत अजुनही उतरु शकलेले नाही या कृत्यावरुन हेच सिध्द होत आहे या परिसरात पुजा पाठ करुन सर्व सामान्य नागरीकात दहशत पसरविणार्या भोंदु बाबाचा  बंदोबस्त  करण्याची मागणी या परिसरातील नागरीकांनी केली आहे

श्रीगोंदा ( ता. प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८ वर्षे रा. आढळगाव) या युवकाचे गळा, छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात वार करून धारदार हत्याराने जिवंत मारण्यात आले. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत मुकुंद याचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादेवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील शनिवार दि. २ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुकुंद जयसिंग वाकडे हा ट्रकटरच्या सहाय्याने स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट नं. १३३/१ मध्ये डाळिंबाचे पिकावरती फवारणी करण्याकरिता गेला होता. त्यानंतर शेतातील पाईप लाईनचा वाल फिरवण्यासाठी त्याचे वडिलाने मोबाईलवरून त्याला तीन ते चार वेळा फोन केला मात्र मुकुंद याने फोन उचलला नाही.त्यानंतर सुमारे १०.१५ च्या सुमारास विजय लहानू वाकडे याने फोनकरून सांगितले की, मुकुंद यांच्या गळ्याला तार लागून जखमी झाला आहे. ताबडतोब डाळींबच्या शेतात या असे सांगितल्यावर मुकुन्दायाचे आई, वडील व भाऊ डाळींबच्या शेतात जाऊन पहिले असता  मुकुंद हा त्याच्याकडील ट्रकटर जवळ पडल्याला व त्याच्या गळ्यावर तसेच छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणावर जखम झालेली होती व तो मयत झालेला होता. त्यानंतर त्यास त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते.याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हा खुनाचा प्रकार असावा त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरु केली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

बेलापूर   (प्रतिनिधी )- कोरोनाच्या संकटकाळातही आपला जीव धोक्यात घालुन कार्य करणारे पोलीस बांधव आरोग्य कर्मचारी यांचा बेलापूर पत्रकार व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने गुलाबपुष्प देवुन टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सर्व ग्रामस्थ घरात बसलेले असताना पोलीस बांधव व आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावुन सेवा देण्याचे काम करत आहे अशा देवदुतांचे मनोबल वाढावे या हेतूने बेलापूर ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने   गुलाबपुष्प देवुन सर्वांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी बी उजे पोलीस नाईक आर जे उघडे पोलीस काँन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ ,निखिल तमनर ,पोपट भोईटे तसेच आरोग्य कर्मचारी डाँ .देविदास चोखर डाँ.प्रतिक काकडे आसाराम गोरे किरण दळवी अशोक साळवे गणेश टाकसाळ संतोष शेलार श्रीमती ग्रेटा कदम कांता शिंदे रत्ना नागले आदिंचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले तसेच गोरगरीबासाठी मोफत भोजन चालवत असलेले सुवालाल लुक्कड व लुक्कड  परिवार त्यांना सहकार्य करणारे रणजीत श्रीगोड  यांनाही गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले या वेळी पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे बेलापूरचे  उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके  पाणी पुरवठा समितीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड बेलापूर खूर्दचे उपसरपंच शरद पुजारी पत्रकार देविदास देसाई पत्रकार  दिलीप दायमा ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान जावेद शेख महेश कुर्हे प्रसाद खरात आदि उपस्थित होते या वेळी सोशल डिस्टनच्या नियमाचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक डी बी उजे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)-शासनाच्या परिपत्रकानुसार व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार एक मे पासुन सावळीविहीर बुद्रुक गावात कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सौ.रूपाली संतोष  आगलावे(९९२२३६३७८३),तर सदस्य म्हणून कामगार तलाठी श्री सतीश भाऊसाहेब गायके,(९८६०८६८५२४) ग्राम विकास अधिकारी श्री रावसाहेब दगडू पा. खर्डे ,(९६३७९६३४९६), व सदस्य सचिव म्हणून पोलीस पाटील सौ.संगिता सुरेश वाघमारे,(७२७६६२६१८९) यांची नियुक्ती करण्यात आली असून या समितीमार्फत
कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात येणाऱ्या व गावातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी व नोंद ठेवण्यात येणार आहे ,या कोरोना ग्रामसुरक्षा समितीमार्फत
 बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस तहसीलदार यांची परवानगी असल्यासच गावात राहण्यास परवानगी मिळणार आहे,
विनापरवाना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना येऊ न  देणे , परवानगी असणाऱ्या बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळविहीर बु!! येथील वर्ग खोल्या ताब्यात घेण्यात आल्या असून पुरुष-स्त्री स्वतंत्र्य विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.याबाहेरून आलेल्या व्यक्तीना विलगीकरण कक्षात१४दिवस राहणे बंधनकारक राहणारआहे,तसेच  कोरोना(कोविड 19) सदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवणे गरजेचे आहे.कोणीही परस्पर गावात आल्यास किंवा माहिती लपवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.येथून पुढे कोणीही गावात येणार असल्यास प्रथमतः समितीला संपर्क करावा, गावातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांमध्ये बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला थेट प्रवेश देऊ नये, येणांऱ्या व्यक्ती संदर्भात ग्राम सुरक्षा समितीला त्वरित कळवावे, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वजण कसोशीने प्रयत्न करीत आहेत, कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी ही कोरोणा ग्राम सुरक्षा समिती गावागावात नेमण्यात आली आहे, या समितीला प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्य व सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहान या सावळीविहीर बुद्रुक ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष सरपंच सौ, रूपाली संतोष आगलावे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

(शिर्डी प्रतिनिधी)-श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या  शिर्डीत  दारू विक्रीला बंदी असतांना शिर्डी व परिसरात अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने कालच दि,२ मे रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर  यांनी पोलीस अधीक्षक व गुन्हा अन्वेषण विभागाला  शिर्डी व परिसरातील अवैध दारूधंदे त्वरित बंद करण्याचे आदेश दिल्याने या विभागामार्फत शिर्डी व परिसरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे, वरिष्ठपोलीस अधिकारी अवैध दारू धंद्याकडे विशेष लक्ष देत असताना मात्र  स्थानिक शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी काय करतात ।असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत, त्यामुळे  एकीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत असताना शिर्डीत मात्र  कार्यक्षम व कर्तव्यदक्ष पोलिस अधिका्रयाची नेमणूक करावी ,अशी मागणी आता होऊ लागली आहे.शिर्डी व परिसरात अवैध दारूधंदे व अवैध व्यवसाय यासंदर्भातचे वृत्त बिनधास्त न्यूज व जंनमत चॅनलला नुकतेच प्रसिद्ध झाले होते व यासंदर्भात दारू बंदी व उत्पादन शुल्क मंत्री ना, दिलीप वळसे पाटील व इतर संबंधित मंत्र्यांना तसे निवेदन देण्यात आले होते, याचा परिणाम म्हणून ही वरीष्ट पातळीवरून शिर्डीत  कारवाई झाल्याचे बोलले जात आहे,
  सन 1985 ला श्री साईबाबा संस्थानने शासनाकडे अर्ज करून शिर्डीत संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने शिर्डी येथे तेव्हापासून दारू विक्रीला बंदी करण्यात आली आहे, शिर्डीत कोणताही दारू विक्रीचा परवाना दिला जात नाही किंवा दारू विक्रीला परवानगी नाही, असे असताना शिर्डीत सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री ठीक ठिकाणी होत आहे , गल्लीबोळात ,काही हॉटेलमध्येही दारूविक्री होत असते, त्यामुळे शिर्डीत येणारे साईभक्त व येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, शिर्डी परिसरातही मोठ्या प्रमाणात अवैध दारू धंदे सुरू आहेत, मात्र शिर्डी पोलिसांचे याकडे  लक्ष नाही, किंवा आर्थिक देवाण घेवाणातून  या अवैध दारूविक्री धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते की काय। अशी शंका शिर्डीकरांना येत आहे, अनेकदा  शिर्डी व परिसरातील अवैधधंद्याविषयी निवेदने व  उपोषणे झाली,  वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांकडून तेवढ्यापुरती तेवढी थातूर मातूर कारवाई होते ,नंतर मात्र जैसे थी परिस्थिती राहते, असे अनेकदा घडले आहे, कालच दि,२ मे रोजी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कार्यालयीन आदेश  19( अ)  210 / 20 20  अन्वये कोरोना  (covid-19)  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्यात  साथरोग नियंत्रण  कायदा  व आपत्ती व्यवस्थापन  कायद्यानुसार  त्या अनुषंगाने जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना  शिर्डी व परिसरातील अवैध दारू धंद्यांवर छापा टाकण्याचे आदेश दिले , त्यानुसार पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहाय्यक फौजदार  मोहन लक्ष्मण गाजरे पोहे बाळासाहेब किसन मुळीक पो को एमसी खर्डे सुमेधा वाघमारे,शेलार ,गोरे ,आदि पोलिसांच्या साह्याने शिर्डी परिसरातील अवैध दारू विक्री धंद्यांवर छापे टाकले ,त्यामध्ये सावळीवीर सोनेवाडी रस्त्यालगत एका भिंतीच्या आडोशाला अवैद्य दारूविक्री करणाऱ्या सोनी विनोद जाधव या महिलेच्या घरी सुमारे तीन हजार रुपयाची तीस लिटर हातभट्टीची दारू सापडली, त्यावरून या महिले विरोधात भादवि कलम 188 (2) 269 271 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 234 तसेच महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्ट कलम (ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अश्या अनेक हातभट्ट्या व अवैध दारू विक्री शिर्डी व परिसरातील अनेक ठिकाणी सुरू आहेत, मात्र त्यांना या छाप्याच्या अगोदरच छाप्याची खबर कळत  असल्याने  या पाठीमागे कोण आहे ।याची चौकशी होणे गरजेचे आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट शिर्डीत येवून अवैध धंद्यांवर कारवाई करतात, मात्र या धंदेवाल्यांना त्या अगोदरच कोण खबर देतो, ,याची गुप्तपणे चौकशी होणे गरजेचे आहे.शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असताना शिर्डी पोलीस स्टेशनला प्रभारी चार्ज साध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे आहे ,येथे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम असे पोलिस निरीक्षक नेमण्याची मागणी आता शिर्डी करांकडून होत आहे,  वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक होत असतांना शिर्डीतील  पोलीसावर शिर्डी व परिसरातील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत, जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक, यांनी शिर्डी व परिसरात अजूनही विशेष लक्ष देऊन या परिसरात चालणारे अवैध दारूधंदे व इतर अवैध व्यवसाय, लॉजमध्ये चालणारे वेश्याव्यवसायावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच शिर्डीसाठी  कार्यक्षम ,कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक ,पोलीस अधिकारी नेमावेत ,अशी मागणी आता शिर्डी व परिसरातील नागरिकांकडून  होत आहे.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-कोरोनाच्या संकटकाळात जे सेवा देतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे हे ओळखून डाँक्टर आपल्या दारी हा राबविण्यात आलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे उदगार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी काढले.भारतीय जैन संघटना ,श्रीरामपूर तालुका ड्रगीस्ट असोसिएशन श्रीरामपूर नगर परिषद जैन डाँक्टर फेडरेशन व ग्रामिण रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमाने " डाँक्टर आपल्या दारी " हा उपक्रम राबविण्यात आला त्या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात त्या व्यक्तीस तसेच त्याच्या कुटुंबीयास या आजाराची लागण होवु शकते हे लक्षात घेवुन शहरातील निष्णांत डाँक्टरांनी फिरता दवाखाना सुरु करुन आरोग्य तपासणी सुरु केली आहे या उपक्रमामुळे आमचे आमच्या कर्मचार्यांचे मनोबल निश्चितच वाढणार आहे असेही बहीरट म्हणाले. या उपक्रमांतर्गत १६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना औषधेही देण्यात आली  त्यात पोलीसा बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर चे अध्यक्ष डाँक्टर संचेती , डाँक्टर शिरसाठ ,डाँक्टर टिळेकर ,डाँक्टर  देव ,डाँक्टर राहींज ,डाँक्टर परे ,डाँक्टर बडाख ,डाँक्टर  बाठीया ,डाँक्टर कोठारी ,डाँक्टर गंगवाल ,डाँक्टर मुंदडा ,डाँक्टर  अनारसे तसेच रमेश कोठारी अशोक थोरे कल्याण कुंकुलोळ शशिकांत रासकर जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे ,अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे,  मुख्यत्वेकरून सलून दुकाने उघडण्यास बंदी असताना अनेक नाभिककारागीरांनी वरून दुकाने बंद ठेवून आतून मात्र  ती  सुरू आहेत  तर काहीनी आपल्या घरीच गुपचुपपणे केशकर्तनालये सुरू केली आहेत , काही  ग्राहकांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करीत आहेत ,हे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने मोठे धोकादायक आहे, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात असे घडू नये ,यासाठी त्वरित शासकीय अधिकाऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे,  कोरोनाने जगात हाहाकार उडाला आहे, देशातही अनेक रुग्ण सापडत आहेत महाराष्ट्रात तर कोरोनारुग्णांची वाढतच आहे, शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे दोन टप्पे संपून  चार मेपासून यालॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे ,तिसऱ्या टप्प्यात ग्रीन ऑरेंज, रेड ,असे तीन झोन करण्यात आले असून या तीनही झोनमध्ये काही दुकानांना उघडण्यास परवानगी दिली असताना सलूनची दुकाने उघडण्यास पूर्णतः बंदी आहे ,मात्र  गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन सुरू असताना काही नाभिककारागीरांनी गावातील, शहरातील, चौकातील, आपली दुकाने बंद ठेवून आपल्या घरीच केशकर्तनालये सुरू केली आहेत, अनेक ग्राहक फोन करून नाभिक कारागिरांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करत आहेत किंवा गावातील , शहरातील नाभिक ओळखीचे,कायमचे संपर्कात असल्यामुळे त्यांना फोन करून काही लोक आपल्या घरी ,वाडी-वस्तीवर बोलावून कटिंग दाढी करून घेत आहेत ,यामुळे कोरेणाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे ,या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही ,राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या डॉक्टर कन्याने नामदार बाळासाहेब थोरात यांची कटिंग घरी केली ,आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी आपल्या वडिलांची कटिंग घरी केली, असे उदाहरण समोर असताना मंत्री ,आमदार लॉक डाऊनचे नियम पाळत असताना काही लोक लॉकडाऊन चे नियमाचे उल्लंघन करून आपली कटिंग दाढी नाभिक कारागिरांना घरी बोलावून किंवा या कारागिरांच्या घरी जाऊन करून घेत आहेत, कटिंग दाढी करणे हे थेट संपर्कात येत असल्याने  कोरोणाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो ,तरी हे बिनधास्तपणे सुरू आहे,  वरून सलूनची बंद असली तरी आतून मात्र ती चालू आहेत, अनेकांनी गुपचुपपणे ,बेकायदेशीर घरीच सलूनची दुकाने थाटली आहेत, यावर येथून पुढे तरी कडक कारवाई व्हावी ,गावातील का, तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्व नाभिक कारागिरांना सूचना किंवा नोटीस दिल्या जाव्यात, शहरातही मुख्याधिकारी यांच्या मार्फत किंवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत ,पोलिसांमार्फत सूचना करण्यात याव्यात , याकारागिरांना दाढी कटिंग करण्यासाठी कोणाच्याही घरी जाऊ नये किंवा कोणाला  त्यासाठी आपल्या घरी बोलू नये, अशी सक्त ताकीद देणे गरजेचे आहे ,राहता तालुका कोरोना मुक्त आहे ,सर्वजण लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळत आहेत, मात्र तालुक्यातील अनेक गावात, शहरात नाभिक कारागिरांकडून हे नियम मोडले जात असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget