Latest Post

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- कोरोनाचे आलेले संकट लक्षात घेता सालाबाद प्रमाणे साजरा होणारा हजरत सैलानी बाबां दरबार चा ६१ वा उरुस  हा पोलीस बांधवांना सँनिटायझर डोर,नागरिकांना सँनिटायझर निर्जंतुकीकरण कक्ष व गरीब गरजवंतांना भाजीपाला किराणा सामान भेट देवुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर 
शहरातील हजरत सैलानी बाबांचा जंगी उरुस शरीफ  दरवर्षी हजरत सैलानी बाबा दरबार सांस्कृतिक  व शैक्षणिक  ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरा केला जात असे हजरत सैलानी बाबांच्या उरुसाचे हे ६१ वे वर्ष  होते त्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक व धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन दि . १५ एप्रिल ते १८ एप्रिल २०२० कालावधीत करण्यात आले होते परंतु  देशावर अचानक कोरोनाचे संकट आले प्रशासनानेही सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध  आणले या सर्व बाबींचा विचार करुन ट्रस्टने या वर्षीचा उरुस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला तसेच उरुन निमित्ताने होणारा खर्च हा पोलीस बांधवा करीता सँनिटायझर तसेच सामाजातील दुर्बल घटकांना भाजीपाला तसेच किराणा वस्तूचे वाटप करुन करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी सांगितले. तर उरुस कमिटीच्या या उपक्रमा बद्दल उरूस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवाविया उपाध्यक्ष  सलीम बिनसाद सल्लागार आजित डोखे खजिनदार कलीम बिनसाद सहाय्यक खजिनदार सुरेश बालतुरे सचिव प्रशांत गौड संघटक नवलशेठ बोरा आदिचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

अहमदनगर  : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.दरम्यान, बुधवारी पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १२१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील  ११४५ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि  ०४ मुलांचा समावेश आहे.

शिर्डी।  जितेश लोकचंदानी। आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहरांमध्ये नगर-मनमाड व शहरातील इतर रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावलेली होती ,परंतु दररोजच्या वाहनांच्या वर्दळीमुळे व प्रदूषणामुळे ही झाडे काळी पडली होती, मात्र लॉकडाऊन शिर्डीत सुरू झाल्यापासून सर्व वाहने व वर्दळ बंद आहे ,त्यामुळे प्रदूषणही खूपच कमी झाले आहे, व त्यामुळे रस्त्याच्या दुभाजका मधली झाडे आता टवटवीत व हिरवीगार अशी दिसू लागली आहेत, सध्या कडक उन्हाळा सुरू असतानाही ही झाडे अशी हिरवीगार व टवटवीत वाटू लागली असल्याने हा लॉक डाऊनच्या बंदकाळाचा परिणाम असल्याची चर्चा सध्या येथे होत असून येथील नागरिकाकडून या प्रकाराबद्दल  आश्चर्यही व्यक्त होत आहे,
शिर्डीत दररोज हजारो साईभक्त देश-विदेशातून येत असतात, त्यामुळे शिर्डीतील रस्ते सुशोभीकरण करण्यात आले आहे ,नगर-मनमाड व इतर ठिकाणी ,रिंग रोड अशा सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुभाजका मध्ये विविध जातीची सुशोभित अशी वृक्षे शिर्डी नगरपंचायत  ने लावली आहेत ,अनेक दिवसांपासून ही वृक्ष आहेत ,मात्र या वृक्षांची मोठी देखभाल नगरपंचायत करते, तरी ही वृक्षे वाहनांचा धूर व प्रदूषण यामुळे काळवंडलेली दिसत होती, मात्र सध्या लॉकडाऊन काळात येथे वाहने येत जात नसल्याने व इतर प्रदूषण फारच कमी झाल्याने ही दुभाजका  मधली व इतर ठिकाणची वृक्षे आता अगदी हिरवीगार व टवटवीत दिसू लागले असून येणारे जाणाऱ्यांचे लक्ष आता याकडे जातआहे,व व सर्वांनाच वृक्ष आपल्याकडे  पाहण्यासाठी आकर्षित  करत आहेत,

शिर्डी ।राजेंद्र गडकरी  ।
सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे, अहमदनगर जिल्ह्यातही लॉक डाऊन सुरू असल्याने जिल्ह्यात सर्व बंद आहे, मात्र त्यातू  न अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे ,अशा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना सध्या येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्यांना अडचण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस कार्यालया मार्फत ऑनलाइन पास देण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी  ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
 सध्या कोव्हीड19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 144 कलम जारी करण्यात आलेला आहे ,त्यामुळे सर्व बंद आहे ,मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना या बंद काळात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन या व्यक्तींना विशेष पास देण्यात येणार आहे, त्यामध्ये बँक अधिकारी, कर्मचारी, शासकीय-निमशासकीय निमशासकीय महामंडळे,, विविध आस्थापने, तसेच दवाखाने व आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर नर्स ,आरोग्य कर्मचारी, सेविका तसेच शासनाने ज्या कंपन्यांना या काळात सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशा कंपन्यातील कर्मचारी ,अंबुलन्स दूध विक्रेते, फळ विक्रेते, पेट्रोल पंप, टेलिकम्युनिकेशन, केबल टीव्ही, तसेच पत्रकार व आरटीओ चे परवाना पत्र घेतलेले माल वाहनधारक  आदी ठिकाणी काम करणारे अधिकारी ,कर्मचारी  परवानाधारक किराणा, मेडिकल   आदी अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्तींना आपल्या कंपनीचे किंवा आस्थापनेचे ओळखपत्र किंवा पत्र ऑनलाइन अर्जासोबतजोडून ते जिल्हा पोलीस कार्यालयाकडे पाठवून त्यानंतर या अर्जाची, ओळखपत्राची शहनिशा करून जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना या लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी संचार करणे भाग पडणार असल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष पास दिले जाणार आहेत तसेच  अंत्यविधीसाठी  रक्तातल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या  दोन व्यक्तींना तेही त्यांच्याकडे मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला असला तरच  अर्ज करून पास मिळणार आहे , त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या डॉक्टरांचे त्यासाठी विशेष पत्र असणाऱ्या रुग्ण यांना विशिष्ट कालावधीसाठी करून पास मिळणार आहे, त्यासाठी या---https://covid19mh.in वेबसाईटवर त्यांनी आपल्या ओळखपत्र सहित विशेष नमुन्यातील अर्ज ऑनलाईन भरावा अशी आवाहन जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत एका  पत्रकान्वये करण्यात आले आहे.

शिर्डी। जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
 सध्या कोराना मुळे देशात लॉकडाऊन  सुरू आहे, सर्वत्र संचारबंदी जारी आहे, सर्व बंद आहे ,परंतु शिर्डी व परिसरात  अवैध गुटखा साठा व अवैध दारूसाठा  आणि त्याची विक्री दाम दुप्पट रक्कम घेऊन गुपचुपपणे सुरू आहे, यावर स्थानिक पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे, जिल्हा पोलिसांनी तसेच जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी व जिल्हा अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी याकडे गुप्त पद्धतीने चौकशी करून या अवैध व्यवसाय व  अवैध दारू व गुटखा साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे,
जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी साहेबांनी एका आदेशान्वये या लॉकडाऊन काळात संचारबंदी व कलम 144 लागू केले आहेत, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,जिल्ह्यातील सर्व देशी दारू दुकाने, परमीटरूम, वाईन्स शॉपी बंद आहे , मात्र अनेकांनी अवैधरित्या बियर, दारू यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे व या बंद काळात दुप्पट, तिप्पट रक्कम घेऊन बिअर व दारूची विक्री गुपचुपपणे होत आहे, असे असताना स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, शिवाय राज्यात गुटखा बंदी पूर्वीपासूनच असताना सर्रास अनेक ठिकाणी गुटखा मिळत होता आता तर लॉकडाऊन सुरू आहे, तरीसुद्धा अनेक ठिकाणी अवैध  गुटखा साठा करून अनेक दुकानात गुपचुपपणे ह्या गुटख्याची विक्री केली जाते व मोठ्या प्रमाणात नफा कमवला जातो, स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे ,त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नुकतेच बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी त्याचप्रमाणे नुकतेच शिर्डीमध्ये धाड टाकून अवैद्य बियरसाठा जप्त करणारे जिल्हा दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालावे, तसेच जिल्हा अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात गुप्तपणे व आपल्या खबऱ्या मार्फत चौकशी करून कोणत्या ठिकाणी अवैधगुटखा साठा करून ठेवला आहे ,कोण गुटखा होलसेल व किरकोळ विक्री करतो, दाम दुप्पट ने गुपचुपपणे गुटखे विकून मोठा पैसा सध्या कमावतो, याचा तपास लावणे महत्त्वाचे आहे, शिर्डी व परिसरातील गावांमध्ये अवैध दारू साठी अवैद्य गुटका साठे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी असताना मात्र स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, स्थानिक पोलिसांचे यामध्ये काही गौडबंगाल आहे का। याची सविस्तर चौकशी करून अशा अवैध दारू साठे व अवैध गुटखा साठे करून ठेवणाऱ्या व या लॉकडाऊंनच्या काळात अव्वाच्या सव्वा पैसा कमावणाऱ्या व्यापाऱ्यांवर, दुकानदारांवर ,विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, सर्वसामान्य माणसांना बाहेर फिरणे मुश्कील होते ,भाजीपाला विक्रेत्यांवर  कारवाई होते ,पण असे अनेक किराणा दुकानदार लॉकडाऊन चे नियम पाळत नाही, दिसण्या पुरते दुकानापुढे फक्त भावफलक लावून ठेवले आहे ,तसेच सोशल डिस्टन्स साठी अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून ठेवले आहे, मात्र त्याचा प्रत्यक्ष उपयोग होताना दिसत नाही, अनेक ठिकाणी लोक दुकानासमोर गर्दी करून किराणा माल घेताना दिसतात, कोणतेही लॉक डॉऊन चे नियम पाळत नाही, अनेकांच्या तोंडाला मास्क ही नसतो ,जर एखादा  दुर्दैवाने कोरोना बाधीत रुग्ण दुकानदाराच्या संपर्कात आला तर त्या दुकानात गावातील परिसरातील हजारो लोक दररोज सकाळ-दुपार किराणा घेण्यास येत असतात, त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता दाट होऊ शकते ,त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, मात्र या काळातच दामदुप्पट पैसा कमवण्याची संधी समजून हे व्यापारी या लॉकडाऊन च्या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहे, कोणत्याही माल अधिक रक्कम घेऊन ग्राहकांना विक्री केली जाते, साठा कमी आहे ,मालाचे शॉर्टेज आले आहे, वरूनच किंमत वाढली आहे ,मालाची गाडी आली नाही ,असे अनेक कारणे दाखवून या मालाची किंमत वाढवली जात आहे,
 तसेचजोपर्यंत पोलीस समोरआहे, तोपर्यंत नियमात सर्व दाखवले जाते, मात्र पोलिस व अधिकारी गेले की परत जैसे थे परिस्थिती होते ,यावर आता पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी साध्या वेशात येऊन अशा ठिकाणी छापे घालणे, गरजेचे झाले आहे, सध्या गोरगरीब ,सर्वसामान्य माणूस घरात बसलेलाआहे, काम धंदा नाही ,आर्थिक चणचण जाणवत आहे ,अशा परिस्थितीत व्यापारी, दुकानदार मात्र सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक लुटालूट सध्या अनेक ठिकाणी करताना दिसून येत आहे, अश्या व्यापारी, दुकानदार व अवैध दारू गुटखा साठा करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिकारी व  सर्व विभागाचे अधिकारी याकडे अधिक लक्ष देतील व कारवाई करतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे,.

जिवानवश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक लावावे
बुलडाणा - 15 एप्रिल
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे.  या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क न वापरणे, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावणे आदी गुन्ह्यांविषयी दंड लागू केला आहे.
         जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
असे आहे दंड
सार्वजनिक स्थळी उदा. रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकणे हा गुन्हा करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर सार्वजनिक स्थळी मास्क अथवा रूमाल न वापरणे असे करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. तसेच दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे हा गुन्हा पहिल्यांदा केल्यास 500 रूपये दंड प्रति ग्राहक अथवा व्यक्ती, 1500 रूपये दंड आस्थापना मालक अथवा दुकानदार, विक्रेता यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्यांदा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.किराणा अथवा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास असे पहिल्यांदा आढळल्यास 5000 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग वसूल करणार आहे.

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपाययोजना आणखी कडक करण्यात आल्या असून आता खासगी वाहनांना पूर्णत: पेट्रोलबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक किराणा सामान व दूध विक्रीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक आदेशांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व आस्थापना, दुकाने बंद करण्याचे, तसेच वाहनांना रस्त्यावर प्रतिबंध करण्यात आला होता. शाळा-महाविद्यालये, सेतू केंद्र, तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. परंतु आता लॉकलाऊनमध्ये वाढ झाल्याने या आदेशांना आता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये सर्व खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील भरणारे मोठे भाजीबाजारही बंद राहतील. याशिवाय सर्व सेतू, महा- ई-सेवा केंद्र, आधार केंद्र, तसेच सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदविण्याचे कामकाज बंद राहील. ज्या नागरिकांना दाखले अत्यावश्यक आहेत त्यांनी या दाखल्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करुन संबंधीत कार्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावीत. त्यामुळे सर्व नागरिकांना आॅनलाईन पध्दतीने दाखले वितरीत करण्यात येतील.जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा, खासगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, अंगणवाड्या, कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget