शिर्डी। जितेश लोकचंदानी। आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहरांमध्ये नगर-मनमाड व शहरातील इतर रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावलेली होती ,परंतु दररोजच्या वाहनांच्या वर्दळीमुळे व प्रदूषणामुळे ही झाडे काळी पडली होती, मात्र लॉकडाऊन शिर्डीत सुरू झाल्यापासून सर्व वाहने व वर्दळ बंद आहे ,त्यामुळे प्रदूषणही खूपच कमी झाले आहे, व त्यामुळे रस्त्याच्या दुभाजका मधली झाडे आता टवटवीत व हिरवीगार अशी दिसू लागली आहेत, सध्या कडक उन्हाळा सुरू असतानाही ही झाडे अशी हिरवीगार व टवटवीत वाटू लागली असल्याने हा लॉक डाऊनच्या बंदकाळाचा परिणाम असल्याची चर्चा सध्या येथे होत असून येथील नागरिकाकडून या प्रकाराबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे,
शिर्डीत दररोज हजारो साईभक्त देश-विदेशातून येत असतात, त्यामुळे शिर्डीतील रस्ते सुशोभीकरण करण्यात आले आहे ,नगर-मनमाड व इतर ठिकाणी ,रिंग रोड अशा सर्व ठिकाणी रस्त्याच्या दुभाजका मध्ये विविध जातीची सुशोभित अशी वृक्षे शिर्डी नगरपंचायत ने लावली आहेत ,अनेक दिवसांपासून ही वृक्ष आहेत ,मात्र या वृक्षांची मोठी देखभाल नगरपंचायत करते, तरी ही वृक्षे वाहनांचा धूर व प्रदूषण यामुळे काळवंडलेली दिसत होती, मात्र सध्या लॉकडाऊन काळात येथे वाहने येत जात नसल्याने व इतर प्रदूषण फारच कमी झाल्याने ही दुभाजका मधली व इतर ठिकाणची वृक्षे आता अगदी हिरवीगार व टवटवीत दिसू लागले असून येणारे जाणाऱ्यांचे लक्ष आता याकडे जातआहे,व व सर्वांनाच वृक्ष आपल्याकडे पाहण्यासाठी आकर्षित करत आहेत,
Post a Comment