शिर्डी ।राजेंद्र गडकरी ।
सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे, अहमदनगर जिल्ह्यातही लॉक डाऊन सुरू असल्याने जिल्ह्यात सर्व बंद आहे, मात्र त्यातू न अत्यावश्यक सेवा वगळण्यात आले आहे ,अशा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना सध्या येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन त्यांना अडचण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस कार्यालया मार्फत ऑनलाइन पास देण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,
सध्या कोव्हीड19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 144 कलम जारी करण्यात आलेला आहे ,त्यामुळे सर्व बंद आहे ,मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना या बंद काळात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन या व्यक्तींना विशेष पास देण्यात येणार आहे, त्यामध्ये बँक अधिकारी, कर्मचारी, शासकीय-निमशासकीय निमशासकीय महामंडळे,, विविध आस्थापने, तसेच दवाखाने व आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर नर्स ,आरोग्य कर्मचारी, सेविका तसेच शासनाने ज्या कंपन्यांना या काळात सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे अशा कंपन्यातील कर्मचारी ,अंबुलन्स दूध विक्रेते, फळ विक्रेते, पेट्रोल पंप, टेलिकम्युनिकेशन, केबल टीव्ही, तसेच पत्रकार व आरटीओ चे परवाना पत्र घेतलेले माल वाहनधारक आदी ठिकाणी काम करणारे अधिकारी ,कर्मचारी परवानाधारक किराणा, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्तींना आपल्या कंपनीचे किंवा आस्थापनेचे ओळखपत्र किंवा पत्र ऑनलाइन अर्जासोबतजोडून ते जिल्हा पोलीस कार्यालयाकडे पाठवून त्यानंतर या अर्जाची, ओळखपत्राची शहनिशा करून जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना या लॉक डाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी संचार करणे भाग पडणार असल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष पास दिले जाणार आहेत तसेच अंत्यविधीसाठी रक्तातल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन व्यक्तींना तेही त्यांच्याकडे मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला असला तरच अर्ज करून पास मिळणार आहे , त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या डॉक्टरांचे त्यासाठी विशेष पत्र असणाऱ्या रुग्ण यांना विशिष्ट कालावधीसाठी करून पास मिळणार आहे, त्यासाठी या---https://covid19mh.in वेबसाईटवर त्यांनी आपल्या ओळखपत्र सहित विशेष नमुन्यातील अर्ज ऑनलाईन भरावा अशी आवाहन जिल्हा पोलीस कार्यालयामार्फत एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
Post a Comment