Latest Post

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून रेल्वे पुलाच्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती रस्त्यावरील वाहने अडवून लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे 1 च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, सहाजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह मोटार सायकल जप्त केली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे पुलावर पाच ते सहा व्यक्ती धारदार हत्याराची भीती दाखवत वाहनचालकांची लूट करीत असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याला मिळाली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत,पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड पोलीस वाहनाने संवत्सर चौफुलीकडून रेल्वे पुलाकडे निघाले असता येणार्‍या जाणार्‍या लाईटच्या उजेडात दोन मोटार सायकलवर पाच ते सहाजण मध्यरात्रीनंतर रस्त्यावर उभे राहुन वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुट करीत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांचे वाहन बाजुला लावून छुपा पाठलाग केला. त्यातील दोन आरोपी तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग (वय 24,रा.टिळकनगर), निलेश प्रदिप चव्हाण (वय 26, रा.भगवाचौक गांधीनगर, कोपरगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू, सुरे, लोखंडी पाईप, स्टंप, कटावणीसह,विना नंबरची हिरोहोंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली केली.अन्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी अविनाश भगुरे व त्याचे दोन मित्र रा.कोपरगाव हेदेखील टोळीत असल्याची माहिती दिली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून यापूर्वीही या आरोपींना रस्ते लुट प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कोपरगाव पोलीस ठाण्यात रस्ते लुटीचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी। । अहमदनगर जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे, तसा तो आता गुन्हेगारी क्षेत्रात आघाडीवर चालला आहे, जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या पोलिसांचे प्रभारी राज चालू असून सर्वकाही साई भरोसे सुरू असल्याने जिल्ह्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी पावन भूमीत हीच परिस्थिती असून शिर्डीत वाढलेली गुन्हेगारी वाढतच चालली आहे ,त्यामुळे  शिर्डीतील सर्वसामान्य ग्रामस्थ व साईभक्त त्रस्त झाले आहे त्यामुळे  या गुन्हेगारीच्या विरोधात  तीव्र  आंदोलन करणार  असल्याचा इशारा पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांनी एका   पत्रकान्वये दिला आहे,
    अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा असून जिल्हा सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे ,अशा या जिल्ह्यात आता गुन्हेगारांनी मोठा कळस केला आहे, गुन्हेगारी क्षेत्रात हा जिल्हा आता आघाडीवर चालला असल्याचे दिसत आहे, मात्र अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्याचे थातूरमातूर कारण सांगत पोलीस दलाचे गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच  आहे ,सर्वत्र अवैध वाहतूक, अवैध धंदे ,अवैध दारू, मटका, जुगार, वाळूतस्करी गुटखा विक्री ,गुंडगिरी, मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्याकडे कमी पोलिस बळाचे कारण दाखवून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे, मात्र त्याचे खरे कारण वेगळेच असून या दोन नंबर धंदा व गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात चिरीमिरी मिळत असल्याने अनेक पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी एवढेच नव्हे तर आपली चालू कमाई बंद होईल म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत, जनता साईभक्त, शिर्डीकर यांनी अनेकदा निवेदने व सांगून तसेच वृत्तपत्र ,टीव्ही वर अनेकदा बातम्या येऊनही पोलीस मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, उलट गुन्हेगारी विरोधात आवाज उठविणाऱ्यांना पोलीसांनी गूण्हेगारांना हाताशी धरूण  खोटे गुन्हे दाखल केले.  अवैध धंद्यांवर, व गुन्हेगारीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्ष पाठबळ देण्यात येत आहे, जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सध्या प्रभारी आहे, हीच परिस्थिती शिर्डी सह इतर ही पोलिस स्टेशनला आहे ,अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशात विदेशात प्रसिद्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत सध्या राजरोसपणे पाकीटमारी, गुंडगिरी, लुटमार ,अवैध धंदे, दारू मटका ,जुगार ,गांजा ,चरस विक्री अवैध वाहतूक ,मारामाऱ्या, गुटका विक्री पोलिसांच्या पाठबळावर सुरू आहे ,त्यामुळे शिर्डी तील सर्वसामान्य ग्रामस्थ, साईभक्त यांना त्याचा मोठा त्रास होत आहे शिर्डीतिल ग्रामस्थांनी या बाबत ग्रामसभा घेउन शिर्डीत चालत असलेल्या अवैद्य व्यवसायाला विरोध करुणही काहीच कारवाई केली गेली नाहि अनेकदा निवेदने देऊन वृत्तपत्रात बातम्या येऊनही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी वर अधिक डोळा असणाऱ्या काही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना आपण श्री साईंच्या पावन नगरीत काम करत आहोत, आपली कर्तव्य जबाबदारी आपण विसरत आहोत,, याचेही भान राहिले नाही, त्यामुळे अशा गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या व आपले कर्तव्य ,जबाबदारी असणाऱ्या या मग तो कोणीही असो त्यावर  साईंचा दंडा पडल्याशिवाय राहत नाही, साईंच्या पावन भूमीत सेवा करण्याची संधी योगायोगाने व श्री साईकृपेने  मिळाली असून या संधीचा चांगला उपयोग पोलीस व अधिकाऱ्यांनी करून येथील गुन्हेगारी व गुन्हेगारांवर वचक ,आळा बसावा यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी प्रामाणिक, निस्वार्थीपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे ,अन्यथा या गुन्हेगारी विरोधात व गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात आमरण  उपोषण करण्याचा  इशारा या पत्रकात पत्रकार जितेश मनोहरलाल लोक चांदनी शिर्डी यांनी  दिला आहे,

अकोले ( प्रतिनिधी  )- केवळ सवंग प्रसिध्दीसाठी ह भ प निवृत्ती महाराज ईंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या तृप्ती देसाई यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याच्यावर असलेले गुन्हे विचारात घेवुन त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी डाँ. विजय मकासरे यांनी केली आहे                  ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ  अकोले तालुका बंद ठेवुन निषेध सभा घेण्यात आली होती   .या निषेध सभेला डाॅ.विजय मकासरे यांनीही हजेरी लावून महाराजांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ह.भ.प .निवृत्ती महाराज देशमुख यांच्या पुञ प्राप्तीसाठी केलेल्या वक्तव्याविषयी तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याची  जी मागणी केली आहे ती केवळ प्रसिध्दि साठी आहे असे मत डाॅ.विजय मकासरे यांनी मांडले आहे .
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती विषयी काहीही विधाने करुन आपली प्रसिद्धी करवुन घेणे हाच तृप्ती देसाई यांचा हेतु असतो असेही यावेळी मकासरे म्हणाले
.त्याच प्रमाणे त्यांच्यावर अन्य ९ गुन्हे दाखल आहेत .तरीही प्रशासन त्यांना अटक किंवा तडिपार का करत नाही असा सवाल मकासरे यांनी केला आहे 
ह भ प निवृत्ती महाराजांची  ईंदोरीकर यांची सुरु असलेली  बदनामी आता थांबवावी अन्यथा मोठे जनांदोलन उभे करु  असे मत अकोले येथे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजीत करण्याता आलेल्या निषेध सभेत अनेकांनी  व्यत्क केले.डाँ विजय मकासरे यांच्यावर तृप्ती देसाई यांनी २०१७ मध्ये प्राणघातक हल्ला केला होता तो खटला न्यायप्रविष्ट आहे

बुलडाणा - 24 फेब्रूवारी
देशभरात CAA, NRC व NPR या विधेयकाच्या विरोधात विविध आंदोलन सुरु असून आज शेकडो नागरिक या विधेयकाच्या विरोधात मोताळा ते बुलडाणा असा 25 किलोमीटरचा पायी मोर्चा काढून आपली भूमिका मांडली व आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.या विधेयकाच्या विरोधात 25 किलोमीटर पायी मोर्चा देशात फक्त येथेच काढण्यात आला.
     मोताळा ते बुलडाणा एनआरसी विरोधात 25
किलोमिटरचा प्रवास करीत शेकडो लोकांनी तिरंगा पदयात्रा काढली. या तिरंगा पदयात्रेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शेख मुक्तार शेख अबरार यांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदनी विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे मागील दीड महिन्या पेक्षा जास्त काळापासून निदर्शने सुरू आहेत. याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा व  बुलडाण्यातही शाहीन बाग आंदोलन कुल जमाती तंझीमच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान आज 24 फेब्रवारीला उपोषणाच्या 45 व्या दिवशी मोताळा ते  बुलडाणा असा 25 कि.मि ची सर्वधर्मीय तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा शहरात पोहचल्यावर जयस्तंभ चौकातील शाहीनबाग आंदोलनात सहभागी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
२४ फेब्रूवारी जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन मोताळा येथील शाहीनबाग उपोषण मंडप ते बुलडाणा शाहीनबाग उपोषण मंडपादरम्यान करण्यात आले. राजूर घाटाच्या चढणीनंतर  शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून जयस्तंभ चौक येथे मोर्चा पोहचल्यावर शाहीनबागच्या समोर याचे रूपांतर एका जनसभेत झाले. यावेळी कुल जमाती तंझीमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआरच्या विरोधात आहे.
आपल्या आंदोलनामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना त्रास होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुल जमाती तंझीमच्या वतीने करण्यात आले. या तिरंगा पदयात्रेत शेकडोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

महेश लोढा
 साईबाबांच्या पावन भूमि शिर्डी येथे  स्वच्छतेत हिंदुस्तानात तीसरा  व महाराष्ट्र राज्यात दूसरा क्रमांक पटकवनार्या शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी शिर्डीतिल दान्शुर  रतीलाल (काका) लोढा यांचे  चिरंजीव महेश लोढा यांची व शिर्डी येथील समाज सेवक दीपक वारुळे यांच्या अर्धांगिनी एडवोकेट शीतल दीपक वारुळे यांची शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी बिनविरोध  निवड करण्यात आली असल्याने शिर्डीत जल्लोष साजरा करण्यात आला
एडवोकेट शीतल दीपक वारुळे

अहमदनगर, दि.24 - 'सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!,' राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना. त्यांनी आज ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे त्यांना सांगितले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकर्‍यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले...अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले.

            पोपटरावांनी आभार मानताच मु्ख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार कसले... हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.

             बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या नवनियुक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.ए.के.डोंगरे, (भा.प्र.से.) यांनी सहपत्‍नीक श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेवुन संस्‍थानचा पदभार स्विकारला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget