Latest Post

     
श्रीरामपूर/प्रतिनिधी
जीवनात ही घडी अशीच राहू दे मैत्रीच्या या फुलांवरी वसंत नाचू दे असाच काहीसा अनुभव श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कुल च्या 1996 इयत्ता 10 वि च्या बॅच च्या मैत्री मेळाव्यायातू न अनुभवयास मिळाला.शाळेच्या त्या दिवसांच्या आठवणी कटू गोड यांना उजाळा देताना प्रत्येकालाच पुन्हा एकदा शाळेत असल्याचा आनंद मिळाला .मित्र मैत्रिणी नि एकत्र येऊन आपले 22 वर्ष पुन्हा मागे वळून बघितले आणि भविष्याचा वेध घेणारा वर्तमानकाळ एकमेकांशी वाटलं .वेगवेगळ्या क्षेत्रात असताना देखील भविष्यात या मैत्रीच्या रेशीमगाठी टिकवण्यासाठी आणाभाका घेतल्या .आपआपल्या जीवनात घडलेल्या सुखाच्या काही दुःखाच्या क्षणांना वाटून मन मोकळे केले .
 एक उनाड दिवस भोजनाचा आस्वाद घेऊन घालवला
या कार्यक्रमाचे नियोजन कल्पना वाघ ,रवींद्र वाघ ,मनोहर लबडे ,नितीन लबडे,समीर शेख यांनी अतिशय सुरेख असे केले.व सर्वानाच मैत्रीचा हा कट्टा नव्याने जगण्याची ही उमेद देऊन गेला.

अहमदनगर (प्रतिनिधी)  शहरातून जाणारे अवजड वाहने, चारचाकी, दुचाकीविरोधात वर्षांच्या शेवटच्या दिवशी शहर वाहतूक शाखेने तपासणी मोहिम राबविली. मंगळवारी (दि. 31) रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील विविध भागात राबविलेल्या या मोहिमेत पोलिसांनी अडीचशे वाहन चालकांवर कारवाई करत 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला.शहरातील पत्रकार चौक, एसपी ऑफिस चौक, जीपीओ चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक, जुने बसस्थानक, पुणे रोड, यांच्यासह शहरातील महत्वाच्या मार्गावरील केडगाव, शेंडी, विळद, वाळुंज बायपासवर वाहनचालकांना रोखून त्यांच्यावर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभर कारवाई केली. त्यात मोटारसायकलवरील हेल्मेट नसणे, ट्रिपल सीट, लायसन्स नसणे, नंबरप्लेट नसलेल्या तसेच, अल्पवयीन विद्यार्थी अशा 100 दुचाकी वाहनांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 62 हजार 900 रूपयांचा दंड वसूल केला.अवजड वाहने, चारचाकी वाहनामध्ये प्रवास करताना सिल्टबेल्ट न लावणे, काळ्या काचा असणे, कागदपत्रे नसणे अशा 151 चारचाकी वाहनांवर कारवाई करत 32 हजार 300 रूपयाचा दंड वसूल केला आहे. वर्षांचा शेवटचा दिवस असल्याने शहर वाहतूक शाखेकडून पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाहनावर कारवाईची मोहिम राबविली होती. यासाठी शहर वाहतूक शाखेचे 25 ते 30 कर्मचारी व 20 होमगार्ड शहरातील विविध चौकात दिवसभर व रात्री बारा पर्यंत कारवाई करण्यात आली.

माजी विद्यार्थी सस्नेह मेळाव्यात वयोवृद्द शिक्षकांचा कॅटवॉक.. विद्यार्था बरोबर शिक्षकांनी केला आनंकव्यक्त

२५ वर्षांनतर वाजली शाळेची घंटा...छडी नको म्हणून माजी विद्यार्थी धावले वर्गाकडे..सस्नेह मेळाव्याचे अनोखे आयोजन
 शाळेतील आठवणींना उजाळा देत साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९४ सालच्या दहावी वर्गाचा सस्नेह मेळावा अगदी उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षानंतर शभंरहुन आधिक विद्यार्थी आणि २६ शिक्षक या अभुतपुर्व सोहळ्यासाठी उपस्थीत होते.दहावी पर्यंत शाळेचे दिवस संपल्याने प्रत्येकाने आपआपल्या करिअरसाठी आणि पुढील प्रवासासाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतली.. मात्र, ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, मैत्री कशाला म्हणतात हे शिकलो तसेच ज्या शिक्षकांनी ज्ञानेची गंगा बहाल करत विद्यार्थी घडवले त्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९३-९४ सालचे विद्यार्थी एकत्र आले.
रविवारी या सोहळा साईनाथ विद्यालयातील भव्य स्टेजवर आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यध्यापक अभिमन्यू चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक शांताराम मिराणे, हभप गोंदकरसर, रसाळताई ह्या होत्या. कार्यक्रमाला २६ शिक्षकांची उपस्थीती लाभली. यात तिडकेसर, रसाळसर,शेज्वळसर,राऊतसर,ढमढेरेसर, निकमसर,त्र्यंबकेसर, देशपांडेताई, चव्हाणताई, शहाणेताई, विद्यामान मुख्याध्यापक मुठाळसर,बेलदारसर,डुबलसर, कदमसर, त्याच बरोबर शाळेतील त्याकाळचे शिपाई देखील उपस्थीत होते.
२९ डिसेंबर राजी आयोजित या सोहळ्यात सकाळी ९.१५ मीनीटाने शाळेची घंटा वाजली आणी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या पायरीचे दर्शन घेत वर्गात प्रवेश केला. विद्यालयातील साईच्या मुर्तीला आकर्षक सजावट यावेळी करण्यात आली. तसेच शिर्डी माझे पंढरपुर आरती होवून वर्गाच्या बाहेर उपस्थीत शिक्षकांचा पाद्य पुजनाचा अनोखा सोहळा यावेळी पार पडला. शिर्डी ग्रामाचार्य वैभवशास्त्री यांनी मंत्रोपचार केले तर माजी विद्यार्थींनी पाटावर बसुन शिक्षकांच्या पायावर पाणी आणि फुली वाहीली. तर विद्यार्थांनी सर्व शिक्षकांचे दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेक शिक्षक भावूक झाले तर त्यांचे डोळे पाणवले.
पाद्यपुजन आणि गुरुपुजना नंतर भव्य स्टेजवर शिक्षकांचे वेलकम करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय सुचना माजी विद्यार्थीनी पंकजा दाभाडे यांनी मांडली तर वैशाली सुर्वे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी सुनिल दवंगे यांनी मांडले.
यावेळी सर्व शिक्षकांचा शॉल,गुलाबपुष्प आणि पेन देवून योथिचित सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना देखील आठवण राहावी यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांकडून पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान विमला पोरवाल,रविंद्र गोंदकर, डॉ.सुनिल साबळे, रविंद्र जोशी, माधवी गिते यांनी जुन्या आठणींना उजाळा देत आपण कसे घडलो हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
तर मिराणेसरांनी शाळेत फॅशनेबल भांग पाडणारे आता टक्कल घेवून फिरतात मग कसे ओळखणार असे नेहमी प्रमाणे आपल्या विनोदी स्वभावातून बोलल्याने एकच हशा उडला. शेज्वळसरांनी माजी विद्यार्थांवर कवितावाचन केले, तर रसाळताई आणि गोदंकरसरांनी वर्गातील विद्यार्थांचं मोठ कौतूक केले,  माजी विदयार्थांनी शाळेला साऊंड सिस्टम भेट दिल्याने मुख्याध्यापक मुठाळसरांनी यामुळे शाळेतील कार्यक्रमात या मोठा उपयोग होईल असे सांगीतले.
अध्यक्षीय भाषणात तत्कालीन मुख्याध्यापक चव्हानसरांनी सर्व विद्यार्थांना कशी शिस्त लावली हे सांगत बेशिस्त सायकल पार्क करणा-या विद्यार्थांना कसे धोपाटल ही आठवण करुन दिली, माझा विद्यार्थी यशस्वी व्हावा, जीवनात कसा जगला पाहीजे त्याने आपली मान खाली घालता काम नये, या एकचं उद्देशाने सर्वांना शिस्तीत वागायला शिकवले. आणि आज ऐवढ्या वर्षानंतर मोठे झालेले विद्यार्थी बघून आपण जे पेरलं तेच उगलं यामुळे आपलं जीवन सार्थक झाल्याची भावाना चव्हणसरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.तर मैदानावर पुन्हा एकदा मुला-मुलींचा खो-खो चा खेळ रंगला. पकडा-पकडी आणि विसर पडलेल्या कमेंटने शाळेचे मैदान पुन्हा एकदा दणाणून गेले.यावेळी खेळाच्या माजी शिक्षीका शहाणेताईंनी व्हीसल वाजवून आपले कर्तव्य बजावले.
यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तारांकित हॉटेल मध्ये सहभोजन आयोजन करण्यात आले. तर वयोवृद्ध शिक्षकांचा आणि विद्यार्थांनीचा कॅटवॉक ही आयोजीत करण्यात आला.तसेच सर्व मुला-मुली झिंगाट गाण्यावर मनसोक्त थिरकले. एक दिवस स्वतःसाठी असा उद्देश ठेवून दिडशे जणांचा सा सस्नेहमेळावा अगदी अविस्मरणीय ठरला आहे. हा सस्नेह मेळावा यशस्वी व्हावा म्हणून माजी विदयार्थी प्रसन्न शिरगावकर, सुनिल दवंगे, संदिप रामदास सोनवणे, मंगेश कुलकर्णी, सचिन गंगवाल,सचिन औताडे, अशोक मोरे, अशोक तुपे, रविंद्र महाले, ज्ञानेश्वर लांबोळे, विमला पोरवाल, पंकजा दाभाडे,सुरैय्या पठाण,वैशाली सुर्वे, यांनी आधिक परिश्रम घेतले. त्याच बरोबर दहावी अ आणि ब मधील सव्वाशे विद्यार्थी या निमित्ताने उपस्थीत होते.

०१) समाधी मंदिरातील शंखास सौ.रक्षा अलोक शर्मा (दिल्‍ली) यांनी सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे सुमारे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे आवरण संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍याकडे देणगी स्‍वरुपात सुपूर्त केले.



फोटो नं ०२) बेंगलोर येथील दानशुर साईभक्‍त श्री.बसवराजा यांनी सरत्‍या वर्षाला निरोप व नुतन वर्षाच्‍या स्‍वागतानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली.

धुळे( प्रतिनिधी )शहरातील जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात असलेल्या देविदास नगरात बनावट दारूचा कारखाना  आझादनगर पोलिसांनी  उद्ध्वस्त केला. तब्बल दोन तास चाललेल्या  या कारवाईत पोलिसांनी दारू बनविण्यासह पॅकिंगचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आले आहे.अशी माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.याबाबत माहिती  जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात एका मोकळ्या जागेत बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  हेकॉ.दीपक पाटील, संजय सुर्यवंशी, महिला हेकॉ.वाडिले, पोना.पाथरवट, रमेश माळी, पोकॉ. संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख, डी.बी.मालचे, जे.बी.भागवत, सागर सोनवणे, संतोष घुगे यांच्या पथकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास देविदास नगरात छापा टाकला.यावेळी देविदास नगरातील सुर्यमंदिराजवळ एका घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळा जागेत दारू बनविण्याचा कारखाना सुरू  असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह बाटलीचे बुच, रिकाम्या बाटल्या, बुच सिलबंद करण्याचे मशिन, प्लास्टिकचे ड्रम आदी मिळून 32 हजार 549 रूपयांचा ऐवज जप्त केला.याप्रकरणी सागर गणेश परदेशी या 25 वर्षीय तरूणालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (फ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अहमदनगर (प्रतिनिधी)  मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात झालेल्या भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. कमलेश अनिल पटवा (वय- 27 रा. भुतकरवाडी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुधाने भरलेला टँकर नगर कडुन मनमाडच्या दिशेने चाललेला असताना यावेळी तारकपूरकडून सावेडीकडे दुचाकीवर चाललेला तरुण टँकरला जाऊन धडकला.टँकर तरुणांच्या अंगावरून गेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- तरुणांच्या बौध्दिक विकासा बरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे त्या करीता बेलापूर गावात लवकरच व्यायाम शाळा बांधुन व्यायामाचे साहीत्य देखील  देणार असल्याची घोषणा आमदार लहु कानडे यांनी केली              
 नाताळ व नव वर्षानिमित्त  समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने सायकल व रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या विजेत्या स्पर्धकाना आमदार लहु कानडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते आमदार कानडे पुढे म्हणाले की बेलापूर ग्रामपंचायतीने व्यायाम शाळेस जागा उपलब्ध करुन द्यावी त्या ठिकाणी व्यायाम शाळा व व्यायामाचे साहीत्य देण्याची जबाबदारी माझी आहे संगणकामुळे आजचा तरुण हुशार झाला असला तरी त्यास शारिरीक व्यायाम करण्यास वेळच नसतो परंतु शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे समता स्पोर्टस् क्लबने सामाजिक कार्याची  गेल्या तीस वर्षाची परपंरा अखंडीतपणे चालु ठेवली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आपल्या चांगल्या कार्यात माझीही मदत लागल्यास ती मदत करण्यास मी तयार आहे असेही ते म्हणाले  सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक  मिळविणारे प्रविण जाधव यांना सायकल बक्षिस देण्यात आली दुसर्या क्रमांकाचे रुपये २२२२ चे बक्षिस उदय टिमकरे याने मिळविले तृतीय क्रमांकाचे रुपये ११११ चे बक्षिस प्रसाद कलंगडे याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे रुपये ७७७ चे बक्षिस सुशांत राऊत याने मिळविले आकाश धाटे यास उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले धावण्याच्या स्पर्धेचे पहीले बक्षिस रुपये ३३३३ चे  किशोर मरकड याने मिळविले  दुसऱ्या क्रमांकाचे रुपये २२२२चे बक्षिस दिनेश पाटील याने मिळविले  तृतीय क्रमांकाचे रुपये ११११चे बक्षीस अजय साबळै याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे बक्षीस रुपये ७७७ कमलेश गायकवाड याने मिळविले किसन बनकर व राहुल देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षिस  देण्यात आले या वेळी पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले भरत साळुंके मनोज श्रीगोड देविदास देसाई दिलीप दायमा जावेद शेख आदि उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संतोष शेलार उपाध्यक्ष रोहण शेलार गणेश शेलार सुयश शेलार अविनाश शेलार सुहास शेलार विपुल शेलार ऋतिक शेलार संजय शेलार अक्षय शेलार आदिनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय शेलार यांनी केले तर बंटी शेलार यांनी आभार मानले प्रास्ताविक संजय शेलार यांनी केले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget