Latest Post

अहमदनगर, कोळपेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर बसवून एका फार्म हाऊसवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी अमोल अशोक निमसे याला सिन्नर तालुक्यात गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.शुक्रवारी सायंकाळी 4.40 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेले. बहुतांशी विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेण्यासाठी येत असतात. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला वडील नियमितपणे शाळेतून घेण्यासाठी येत असत. मात्र शुक्रवारी ते परगावी गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या विद्यार्थिनीस शाळेतून आणण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांना शाळेत येण्यास थोडा उशीर झाला. सायंकाळी 5.15 मिनिटांनी ते शाळेत आले.त्यावेळी त्यांना सदर मुलगी विद्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुलीच्या वर्गशिक्षकांशी संपर्क केला असता शाळा सुटून अर्धा तास झाला असून तुमची मुलगी शाळा सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी असेल असे सांगितले. परंतु मुलगी त्या ठिकाणी नव्हती. नातेवाईकाने मुलीच्या घरी चौकशी केली. मात्र ती घरी आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले. त्यांनी शोध घेतला. मात्र ती आढळून न आल्याने मुलीचे अपहरण झाले असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.या मुलीबाबत माहिती घेतली असता ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्याची माहिती समजली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शाळेचे विद्यार्थी व सदरची विद्यार्थिनी ज्या रस्त्याने घरी जाते त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावरील हॉटेल आनंदचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या आरोपीने त्याच्या मोटारसायकलवर पुढे बसवून घेवून जात असल्याचे दिसून आले.त्यानंतर डॉ. बाळासाहेब जुंधारे व जगदाळे कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची गाडी मोतीनगर सुरेगावच्या दिशेने जातांना दिसून आली. त्यानंतर प्रमोद दंडवते यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी शिर्डी-लासलगाव रोडने शहाजापूरकडे जातांना दिसले. पोलिसांनी व शिक्षकांनी रात्रभर तपास करून देखील मुलगी मिळून आली नाही.दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी मोतीनगर सुरेगाव येथे सदर मुलीच्या नातेवाईकाच्या घरी या मुलीला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात गाठले. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे मुलीच्या शोध घेण्यासाठी शहाजापूर शिवारात गेले असता त्यांना शिवाजी बोरसे यांच्या फार्म हाऊसवर हिरो होंडा कंपनीची गाडी (एम. एच. 41-3033) चावीसह मिळून आली.गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आपली गाडी अमोल अशोक निमसे याला दिली असल्याचे सांगितले. एका महिलेने फार्म हाऊसवर शाळेचे दफ्तर आणि जेवणाचा डबा असून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपी व मुलीला जातांना पाहिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना अत्याचार झाले असल्याचे पुरावे आढळून आले.मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कोपरगाव पोलीस पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडंगळी येथून अखेर काल मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आरोपी अमोल निमसेचा शोध घेत अखेर त्याला सिन्नर तालुक्यातील वडगंळीतील एका तांड्यावर पोलीस पथकाने त्याला अटक केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.


चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी फिल्मी स्टाईल वाहनाचा पाठलाग करुन १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रिदर्शिनी चौकात करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. शेख वसिम शेख शहाबुद्दीन (२८) रा. आनंदनगर वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास प्रियदर्शिनी चौकात ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात बोबाडे, संगीडवार, अमजद, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विनोद जाधव आदींनी केली.

अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील न्यू टिळकरोडवर असलेल्या स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. शहर पोलीसांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली. हुक्का पार्लरचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी न्यू टिळकरोडवर विनापरवाना स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास स्मोकी व्हिल्लावर छापा टाकला.यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले. हुक्का पार्लरमधील साहित्य पोलीसांनी जप्त केले. किती साहित्य जप्त केले याची माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-माजलगाव नगरपरिषदेचे तत्कालीन व श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्यासह तीन जणांवर माजलगाव नगरपरिषदेमध्ये 1 कोटी 44 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजलगाव शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्याकामी आलेल्या निधीचा तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित यांनी संगनमत करून तत्कालीन लेखापाल अशोक भीमराज कुलकर्णी, सल्लागार स्थापत्य अभियंता महेश कुलकर्णी यांनी काँक्रिट रोड नाल्यांच्या बावीस शासकीय कामांची बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी आहेत, अशी माहिती असताना सुध्दा त्याचा वापर करून शासनाची 1 कोटी, 44 लाख, 29 हजार, 959 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.<याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावित यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुलेमान सय्यद करत आहेत. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन स्विचऑफ आला, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देवळालीचे लाच प्रकरण, राहात्याचा कार्यभार..देवळालीचे तत्कालीन मुख्याधिकारी नानाभाऊ महानवार यांना तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याचा संदर्भ राहाता शहरातील पालिकेचा स्वच्छतेच्या ठेक्याबाबत होता. त्यावेळी राहात्याच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार गावित यांच्याकडे होता.त्यांच्याकडून संबंधित कंपनीची अडवणूक केली जात होती. या लाचप्रकरणात गावित यांचे नाव आल्याने त्यांना काही दिवस कार्यमुक्त करण्यात आले होते. 

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर  महाविद्यालयाच्या आवारात अज्ञात ईसमाने मोठ्या प्रमाणात औषधे गोळ्या आणून टाकल्या असुन सकाळी 
महाविद्यालयात आलेल्या प्राध्यापकाच्या हा प्रकार लक्षात आला                              बेलापूर  महाविद्यालयाला रविवारची सुट्टी असल्यामुळे कुणीतरी मुदतबाह्य झालेल्या गोळ्या औषधे विद्यालयाच्या गेटमध्ये आणुन टाकली एकाच प्रकारच्या या गोळ्या असुन महाविद्यालयाच्या आवारातच टाकण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवाल विचारला जात आहे महाविद्यालयात सी सी टी व्ही कँमेरे बसविलेले आहे त्यामुळे हे कृत्य कुणी केले याचा उलगडा
होणारच आहे परंतु  महाविद्यालय बंद असताना महाविद्यालयाचा मुख्य दरवाजा उघडा कसा होता या दिवशी नेमकी जबाबदारी कोणावर होती याचा शोध घेवुन असे प्रकार पुन्हा होणार नाहु याची दक्षता घेतली पाहीजे या बाबत प्राचार्य  गुंफा कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता कुणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केले असुन सी सी टी व्ही त पाहुन असे कृत्य करणारावर कारवाई  करु असे त्यांनी  सांगितले

बुलडाणा- 15 डिसेंबर
"कुंपणच शेत खाते" याच म्हन प्रमाणे बैंकेत कार्यरत मूल्यांकन अधिकारीने इतरांच्या संगनमताने नकली सोना तारण ठेवून सहकारी बैंकेची फसवणूक केली,ही बाब लक्षात आल्यावर बैंक मैनेजरच्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलीसाने 6 आरोपींना अटक केली आहे.अशा प्रकारे इतर बैंक व पतसंस्थेतही नकली सोने तारण ठेवण्यात तर आले नाही ना,असे प्रश्न उपस्थित होत आहे.
      बुलडाणा येथील जिजामाता  महिला नागरी सहकारी बैंकचे शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी 13 डिसेंबरला बुलडाणा शहर ठाण्यात तक्रार दिली, त्यात नमूद करण्यात आले की त्यांच्या बैंकेत मूल्यांकन अधिकारी पदी कार्यरत दिपक हरीश वर्मा यांनी इतर काही लोकांशी संगनमत करुण 27 लाख रुपयचे नकली सोने तारण ठेवले व वेळेवर त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही.या बाबत शंका आल्याने सोन्याची तपासणी केली असता तो सोने नकली निघाले.अश्या तक्रारीवरुन 12 आरोपींच्या विरोधात भादवी चे कलम 420, 471, 468, 34 अन्वय गुन्हा दाखल करुन पोलीसाने आरोपी मूल्यांकन अधिकारी दिपक हरीश वर्मा,संजय राधे मठारकर,मोहन खरात,मनोहर श्रीराम सावळे,कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा व प्रवीण रमाकांत वाडेकर यांना अटक करून आज 15 डिसेंबर रोजी बुलडाणा कोर्टात हजर केले असता या 6 आरोपींची 18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.तपास अधिकारी पीएसआई अमित जाधव माहिती देत म्हणाले की आरोपींनी नकली सोने अजुन कुठल्या बैंकेत तारण ठेवले आहे का, याची चौकशी करण्यात येईल.एकंदरित हे प्रकरण तुरतास  लहान वाटत असले तरी फार मोठा खुलासा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 यवतमाळ - एखाद्या थरारपटाला शोभावा अशा पद्धतीचा तपास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला. घटनास्थळावर मिळालेल्या ब्लँकेटवरून थेट उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दुर्गम गावात राहणाऱ्या एटीएम फोडणाऱ्या टोळीचा माग काढला. त्यांच्याकडून चोरलेली पाच लाखांची रोख, गुन्ह्यात वापरलेली गाडी, गॅस कटर हे साहित्य जप्त केले. चार राज्याच्या पोलिसांची मदत घेऊन ही कारवाई करण्यात आली. करंजी रोड येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील सात लाखांची रोख चोरीला गेली होती. ही घटना १७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता उघड झाली. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सुरू केला. घटनास्थळाला सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी मिळालेल्या ब्लँकेटवरून अज्ञात एटीएम चोरट्यांचा माग पोलिसांनी काढला. मो.साकीर मो.जफर (३२), सरफराज उमर खान (३३) दोघेही रा.भोजपूर जि.गाजियाबाद, उत्तर प्रदेश यांना १३ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख, सहा लाख रुपये किमतीची कार, पाच हजारांचे मोबाईल, १५ हजारांचे गॅस कटर असा ११ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उत्तर प्रदेशातून रोख रकमेसह आरोपीला आणणे आजपर्यंत शक्य झाले नाही. यवतमाळ पोलिसांनी ही कामगिरी पूर्ण केली. यात अपर अधीक्षक नुरूल हसन यांनी विशेष पुढाकार घेतला. गाजियाबाद येथील पोलीस अधीक्षक निरज त्यांचे बॅचमेंट असल्याने यवतमाळ पोलिसांना गाजियाबादमध्ये भरपूर सहकार्य मिळाले. सलग तीन दिवस पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे सहकाºयांसह गाजियाबादमध्ये ठाण मांडून होते. शिताफीने आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक फौजदार साहेबराव राठोड, सुधीर पिदूरकर, महेश पांडे, सुरेंद्र वाकोडे, विठ्ठल बुरूजवाडे, सुहास मंदनवार, सचिन मकराम, रितेश श्रीवास, पंकज गिरी, दिगांबर पिलावन यांनी सहभाग घेतला. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर, पांढरकवडा ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. उमरेडमधून मिळली तपासाला
दिशागाजियाबाद ग्वाल्हेर मार्गे महाराष्ट्रात आलेल्या या चोरट्यांनी उमरेड (जि.नागपूर) येथे दोन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर तेथून ब्लँकेट खरेदी केले. हैदराबाद मार्गाने निघाले असता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम या चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. हा गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी डोक्यात माकड टोपी घातली होती. नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. अंगावर ब्लँकेट ओढून एटीएम फोडले व रोख काढून घेतली. जाताना चोरटे सोबत आणलेले ब्लँकेट नेण्याचे विसरले. येथूनच पोलिसांना सुगावा मिळाला. हे ब्लँकेट उमरेडमधील ज्या दुकानातून खरेदी केले होते त्याचा टॅग लागलेला होता. पोलिसांनी त्या टॅगचा शोध घेऊन उमरेडमधील दुकान गाठले. तेथे ब्लँकेट खरेदी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गुन्ह्यात वापरलेली गाडीही सीसीटीव्हीत आली. मात्र त्या गाडीचा क्रमांक दिसत नव्हता. चोरट्यांनी बिल बनविताना आपला खराच मोबाईल क्रमांक नमूद केला. या आधारावर पोलिसांच्या चार पथकांनी तपास करत या दोघांना अटक केली.
  

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget