बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर महाविद्यालयाच्या आवारात अज्ञात ईसमाने मोठ्या प्रमाणात औषधे गोळ्या आणून टाकल्या असुन सकाळी
महाविद्यालयात आलेल्या प्राध्यापकाच्या हा प्रकार लक्षात आला बेलापूर महाविद्यालयाला रविवारची सुट्टी असल्यामुळे कुणीतरी मुदतबाह्य झालेल्या गोळ्या औषधे विद्यालयाच्या गेटमध्ये आणुन टाकली एकाच प्रकारच्या या गोळ्या असुन महाविद्यालयाच्या आवारातच टाकण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवाल विचारला जात आहे महाविद्यालयात सी सी टी व्ही कँमेरे बसविलेले आहे त्यामुळे हे कृत्य कुणी केले याचा उलगडा
होणारच आहे परंतु महाविद्यालय बंद असताना महाविद्यालयाचा मुख्य दरवाजा उघडा कसा होता या दिवशी नेमकी जबाबदारी कोणावर होती याचा शोध घेवुन असे प्रकार पुन्हा होणार नाहु याची दक्षता घेतली पाहीजे या बाबत प्राचार्य गुंफा कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता कुणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केले असुन सी सी टी व्ही त पाहुन असे कृत्य करणारावर कारवाई करु असे त्यांनी सांगितले
Post a Comment