चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी फिल्मी स्टाईल वाहनाचा पाठलाग करुन १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रिदर्शिनी चौकात करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. शेख वसिम शेख शहाबुद्दीन (२८) रा. आनंदनगर वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास प्रियदर्शिनी चौकात ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात बोबाडे, संगीडवार, अमजद, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विनोद जाधव आदींनी केली.
Post a Comment