बुलडाण्यात नकली सोने सहकारी बैंकेत तारण ठेऊन 27 लाखांची फसवणूक,6 आरोपी अटक,मोठा खुलासा समोर येण्याची शक्यता
बुलडाणा- 15 डिसेंबर
"कुंपणच शेत खाते" याच म्हन प्रमाणे बैंकेत कार्यरत मूल्यांकन अधिकारीने इतरांच्या संगनमताने नकली सोना तारण ठेवून सहकारी बैंकेची फसवणूक केली,ही बाब लक्षात आल्यावर बैंक मैनेजरच्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलीसाने 6 आरोपींना अटक केली आहे.अशा प्रकारे इतर बैंक व पतसंस्थेतही नकली सोने तारण ठेवण्यात तर आले नाही ना,असे प्रश्न उपस्थित होत आहे.
बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बैंकचे शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी 13 डिसेंबरला बुलडाणा शहर ठाण्यात तक्रार दिली, त्यात नमूद करण्यात आले की त्यांच्या बैंकेत मूल्यांकन अधिकारी पदी कार्यरत दिपक हरीश वर्मा यांनी इतर काही लोकांशी संगनमत करुण 27 लाख रुपयचे नकली सोने तारण ठेवले व वेळेवर त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही.या बाबत शंका आल्याने सोन्याची तपासणी केली असता तो सोने नकली निघाले.अश्या तक्रारीवरुन 12 आरोपींच्या विरोधात भादवी चे कलम 420, 471, 468, 34 अन्वय गुन्हा दाखल करुन पोलीसाने आरोपी मूल्यांकन अधिकारी दिपक हरीश वर्मा,संजय राधे मठारकर,मोहन खरात,मनोहर श्रीराम सावळे,कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा व प्रवीण रमाकांत वाडेकर यांना अटक करून आज 15 डिसेंबर रोजी बुलडाणा कोर्टात हजर केले असता या 6 आरोपींची 18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.तपास अधिकारी पीएसआई अमित जाधव माहिती देत म्हणाले की आरोपींनी नकली सोने अजुन कुठल्या बैंकेत तारण ठेवले आहे का, याची चौकशी करण्यात येईल.एकंदरित हे प्रकरण तुरतास लहान वाटत असले तरी फार मोठा खुलासा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.