Latest Post

बेलापूर( प्रतिनिधी )- जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी चे नऊ लाख रुपये खर्चाचे  काम जिल्हा नियोजन समितीतून एक वर्षापूर्वी मंजूर केले परंतु ग्रामपंचायतच्या आडमुठे धोरणामुळे ते काम रखडले त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून तो निधी माझ्या गटातीलदुसर्या ग्रामपंचायतीला दिला असल्याचा खुलासा जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केला आहे                         याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की एक वर्षापूर्वी हे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केले होते व हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता वेळोवेळी पाठपुरावा करून ते काम करण्यास विनंती केली परंतु पदाधिकाऱ्यांनी व स्वयंघोषित पुढाऱ्याने या कामाची ई निवीदा न करता त्याचे  तीन तुकडे करून हे पैसे खर्च करण्याचा प्रयत्न  केला   त्यास मी विरोध केला व मी सुचवलेले काम न घेता दुसरे काम घेतले  हा निधी मंजूर करण्यास तुमचा काहीही संबंध नाही असे ग्रामसभेत सांगितले जिल्हा परिषदेचे एकही काम गावात होऊ देणार नाही असा चंग या गाव पुढाऱ्यांनी बांधला त्यामुळे हा निधी परत जाऊ नये म्हणून माझ्या गटात असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग केला तसेच झेंडा चौक मेन रोड या रस्त्याकरीता  जिल्हा परिषदेतून सात लाख रुपये मंजूर केले होते परंतु हा रस्ता होऊ नये म्हणून संबंधित पुढाऱ्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली व हा रस्ता ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय करण्यात येऊ नये असे लेखी कळविले या रस्त्याबाबत काम होऊ नये म्हणून  मंजूर असलेली व्यायाम शाळा रद्द करून तो निधी रस्त्याकडे वळविला तसेच ग्रामसभेचा खोटा ठराव घेतला त्यामुळे मी रस्त्याचे मंजूर केलेले  कामही  रखडले बेलापूर गावात पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी आलेला असून त्यात एकही भरीव काम केले नाही 30 लाख रुपयांची लाईट बसवलेले आहे ते ही निकृष्ट दर्जाचे होते सर्व कामे तुकडे करून ई टेंडर न करता करण्याचा पदाधिकारी यांनी घाट घातलेला आहे व या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे   तक्रार केल्यामुळे त्यांची चौकशी सुरू झाली आणि या चौकशीमुळे बिथरलेल्या पदाधिकाऱ्यांनी मला बदनाम करण्यासाठी निखालस खोटे वृत्त दिले असल्याचा खुलासाही जिल्हा परिषद सदस्य यांनी केला असुन या पुढील काळात मी सुचविलेले काम करण्यास तयार असेल तर पुन्हा निधी देण्यास बांधील असल्याचेही नवले यांनी सांगितले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-उपचारा दरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून पेशंटच्या मृत्यूस जबाबदार धरून याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर पैसे न दिल्यास जिवे ठार व अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. संजय शंकर अनारसे (व्यवसाय, डॉक्टर, रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुरनं. 874/2019 आयपीसी 384, 385, 389 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उर्मिला रमेश गायकवाड या महिलेस दि. 21 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी डॉ. अनारसे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या पोटात गोळा असल्याने त्यांच्यावर 24 ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात तिची तब्येत बिघडल्याने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र तेथेही सुधारणा न झाल्याने या महिलेस नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे फरक न पडल्याने परत श्रीरामपुरात आणले. दि. 27 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेंशटचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आपल्या हॉस्पिटलची बदनामी न होण्यासाठी वरील तिनही आरोपींनी डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर जिवे ठार मारुन तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्यामुळे याबाबत डॉ. अनारसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केल्याने वरील तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय उजे करत आहेत.

बुलडाणा- 10 डिसेंबर (कासिम शेख)
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मागील 1 डिसेंबर पासून C1 नावाचा पट्टेदार वाघ आलेला असून तो सद्या याच जंगलात आहे.या वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्य करावे अशे चर्चा आज बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अशी भावना आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्हा व्यघ्र समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या मध्य भागी बुलडाणा, चिखली,मोताळा व खामगांव या चार तालुक्यात 205 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य आहे जिथे बिबट,अस्वल लांडगे सारखे हिंस्र प्राण्या सह इतर अनेक जातीचे पशु पक्षी राहतात.अनेक वेळी इतर व्यघ्र प्रकालपातील वाघ इथे येऊन गेल्याचे बोलले जात आहे.मागील 1 डिसेंबरच्या रात्री या अभ्यारण्यात C1 नावाचा वाघ दाखल झाला.रेडिओ कॉलर लावलेला सदर वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभ्यारण्यातुन निघुन तब्बल 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभ्यारण्यात आलेला आहे.वाइल्ड लाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया,देहरादूनचे अभ्यासक श्री.हुसैन सदर वाघाचा सतत पाठलाग करुण त्याच्यावर अभ्यास करत आहे.
C1 वाघाच्या या जंगलात प्रवेश केल्याने अकोला वन्यजीव विभाग सतर्क झालेला असून आवश्यक त्या पाऊले उचलली जात आहे.प्रत्येक जिल्ह्यात व्यघ्र समिति कागदोपत्री असून C1 वाघाच्या प्रवेशाने बुलडाणा जिल्ह्यातील समिती ही चर्चेत आली आहे. जिल्हा एसपी या समितीचे अध्यक्ष असून आज आयोजित बैठकीवर सर्वांची नजर होती.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालयात आयोजित या समितीच्या बैठकीत बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे दोन एसीएफ रणजीत गायकवाड व संदीप गवारे,अकोट वन्यजीव विभागाचे एसीएफ लक्षण अवारे,  ज्ञानगंगा अभयारण्यचे दोन्ही आरएफओ डांगे व मयूर सुरवसे,बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख हजर होते.या वेळी ज्ञानगंगा अभयरण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगांव या मार्गावर अनेक ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावे, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वन्यजीवांच्या रक्षणासाठी सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद असते तरी काही
अधिकारी,राजकीय पुढारी व इतर काही लोक चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून बंद असलेला गेट उघडायला लावतात आता अत्यावश्यक सेवा वगळून कोणाच्याही वाहणाला रात्रीच्या वेळी अभयरण्यातून जाऊ द्यायचे नाही अशे ठरले व जे कोणीही गेट उघडन्यास भाग पड़त असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करावे तसेच C1 वाघाचे संरक्षण वन्यजीव विभाग, प्रादेशिक वन विभाग व पोलीस विभागाला संयुक्तरित्य करायचे आहे अशी आपली जबाबदारी व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. फरार झालेल्या आरोपीचे नाव राहुल गणेश शिंदे (वय २०) असे आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली.  शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे.याबाबत विचारणा केली  असता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट साहेबांनी आरोपी हा शहर पोलीस कर्मचारी व आधिकारी यांच्या पथकाने अवघ्या पाच तासात आरोपी च्या मुसक्या आवळल्या व पुन्हा काराग्रहात रवाना केल्याची माहिती दिली.

श्रीरामपूर/प्रतिनिधी-
 येथील साखर कामगार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.रवींद्र जगधने यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ डॉक्टर सेलच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
10 डिसेंबर मानव अधिकार दिनानिमित्त श्रीरामपूर शहरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साखर कामगार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर .रवींद्र जगधने यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ डॉक्टर सेलच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येऊन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी रवींद्र तुपे यांची श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी तर डॉ.सुनील कोळसे यांची अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. दरम्यान साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मानवाधिकार दिनानिमित्त फळे वाटप करण्यात आले.यावेळी आंतराष्ट्रीय मानवअधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास निर्मळ, राष्ट्रीय संपर्कप्रमुख  गणेश भांड, दक्षता चेअरमन(पत्रकार) करण नवले ,डॉ सेलचे भारताचे अध्यक्ष- डॉ.प्रशांत चव्हाण,लीगल ॲडव्हायझर भारताचे -अँड.प्रसन्ना बिंगी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष- विठ्ठल गोराणे, संपर्क प्रमुख-सचिन सारंगधर,रवींद्र तुपे,युथ चेअरमन-अजिंक्य काळे , उप अध्यक्ष-लकी गोयल,पत्रकार-श्रीकांत जाधव ,विलास भालेराव , डॉ.कोळसे आदी उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी )--बेलापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात उपोषणार्थी किरण खरोटे यास कामावर घेण्याबाबत  सकारात्मक निर्णय घेण्याचे विस्तार अधिकारी विजय चराटे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांनी कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेतले                              बेलापूर येथील ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबियासह बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते काल सकाळपासून उपोषणार्थीना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी गावातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई बोंबले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यादव काळे  अशोक गवते अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेंद्र त्रिभुवन  पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदींनी उपोषण सोडण्यासाठी परावृत्त केले दरम्यान जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी देखील उपोषणार्थी खरोटे यांची  भेट घेऊन ग्रामविकास अधिकारी चांडे यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगितले सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही तडजोडीची चर्चा सुरू होती दोनदा तीनदा याबाबत चर्चा होऊन एकमत न झाल्यामुळे ही चर्चा फिसकटली अखेर  विस्ताराधिकारी विजय चराटे  यांनी सरपंचांना व  ग्राम विकास अधिकारी चांडे यांना तातडीची बैठक बोलावून त्यात सदर कामगारास कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच उपोषण कर्त्यास हा निर्णय मान्य नसल्यास त्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे दाद मागावी असे लेखी आश्वासन दिले या आश्वासनानुसार खरोटे याने विस्ताराधिकारी विजय कराटे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडेल व सरपंच राधाताई बोंबले यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले यावेळी अशोक कारखाना संचालक विजय खंडागळे अशोक गवते प्रकाश जाजू माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार दिलीप दायमा युसुफ शेख नामदेव बोंबले बंटी शेलार महेश कुर्हे  यादव काळे मुस्ताक शेख प्रसाद खरात महेंद्र साळवी आदी उपस्थित होते

औरंगाबाद : पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत चक्क सहायक फौजदारच जुगार खेळताना आढळून आल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बऱ्याच दिवसांपासून खुलेआम जुगार अड्डा सुरु होता. मात्र स्थानिक पोलिसांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचे आरोप नेहमीच होत होते. त्यामुळे अखेर औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी रविवारी रात्री अचानक छापा टाकला. या छाप्यात वीरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले.औरंगाबाद ग्रामीण विशेष पथकाला वीरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शाहरूख टी स्टॉलमध्ये काही जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता वीरगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार हनुमान पालेपवाड यांच्यासह पाच व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकणी पाचही जुगाऱ्यांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे जुगार अड्डा सुरु होता का ? त्यामुळे ठाणेप्रमुखावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget