श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. फरार झालेल्या आरोपीचे नाव राहुल गणेश शिंदे (वय २०) असे आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली. शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे.याबाबत विचारणा केली असता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट साहेबांनी आरोपी हा शहर पोलीस कर्मचारी व आधिकारी यांच्या पथकाने अवघ्या पाच तासात आरोपी च्या मुसक्या आवळल्या व पुन्हा काराग्रहात रवाना केल्याची माहिती दिली.
Post a Comment