बेलापूर (प्रतिनिधी )--बेलापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात उपोषणार्थी किरण खरोटे यास कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे विस्तार अधिकारी विजय चराटे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांनी कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेतले बेलापूर येथील ग्रामपंचायत कर्मचारी किरण खरोटे यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबियासह बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते काल सकाळपासून उपोषणार्थीना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी गावातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई बोंबले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यादव काळे अशोक गवते अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेंद्र त्रिभुवन पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा आदींनी उपोषण सोडण्यासाठी परावृत्त केले दरम्यान जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी देखील उपोषणार्थी खरोटे यांची भेट घेऊन ग्रामविकास अधिकारी चांडे यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगितले सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही तडजोडीची चर्चा सुरू होती दोनदा तीनदा याबाबत चर्चा होऊन एकमत न झाल्यामुळे ही चर्चा फिसकटली अखेर विस्ताराधिकारी विजय चराटे यांनी सरपंचांना व ग्राम विकास अधिकारी चांडे यांना तातडीची बैठक बोलावून त्यात सदर कामगारास कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच उपोषण कर्त्यास हा निर्णय मान्य नसल्यास त्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे दाद मागावी असे लेखी आश्वासन दिले या आश्वासनानुसार खरोटे याने विस्ताराधिकारी विजय कराटे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडेल व सरपंच राधाताई बोंबले यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले यावेळी अशोक कारखाना संचालक विजय खंडागळे अशोक गवते प्रकाश जाजू माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार दिलीप दायमा युसुफ शेख नामदेव बोंबले बंटी शेलार महेश कुर्हे यादव काळे मुस्ताक शेख प्रसाद खरात महेंद्र साळवी आदी उपस्थित होते
Post a Comment