Latest Post

राहुरी (तालुका प्रतिनिधी) राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेतठ असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या. तर उर्वरित पसार झाले.ही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील असून दत्तात्रय बोर्‍हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

कोल्हार( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
श्री दत्त जयंतीनिमित्त सुर्योदय आश्रम इंदोर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हजारो भाविक, गुरू बंधू  या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सुर्योदय आश्रम इंदोर येथे श्री दत्त जयंती निमित्त आध्यात्मिक कार्यक्रम 5 ते 11 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव ,श्री गुरुदेव पाद्य पूजन ,महाआरती ,ध्यान साधना,भजन असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर गरजूंना ब्लॅंकेट वाटप ,साडी वाटप  मोबाईल टॅबलेट वाटप तसेच आरोग्य ,नेत्र स्वास्थ्य शिबिर असे सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. या श्री दत्त जयंती उत्सवात सर्व भाविकांनी व गुरु बंधूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सद्गुरू प .पु .भय्यूजी महाराज यांच्या पत्नी ,सुर्योदय परिवाराच्या संचालिका,डॉ.आयुषी देशमुख यांनी केले आहे.
 इंदोर येथील सूर्योदय आश्रमात श्री दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

अहमदनगर (प्रतिनिधी) शेतातील मजुरीचे काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याप्रकरणी शहरातील उद्योगपती राजेंद्र कांतीलाल चोपडा (रा. शेंडी ता. नगर) यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, शहरातील उद्योगपती राजेंद्र चोपडा यांची नगर तालुक्यातील शेंडी (पोखर्डी) येथे शेत जमीन आहे. या शेतामध्ये शेती काम करण्यासाठी मजुर होते. एक महिला मजुर केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गुरुवारी (दि. 5) उद्योगपतीकडे पोखर्डी येथे गेल्या. केलेल्या कामाचे पैसेची मागणी त्या महिला मजुराने चोपडा यांच्याकडे केली.यावरून मजुराला चोपडा यांनी शिवीगाळ केली. चोपडा यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनी त्या महिलेला काठीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाण झालेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. 07) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करत आहेत.

बुलडाणा- 8 डिसेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात 7 डिसेंबरच्या साकाळी राहत्या घरी एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार व मर्डरचा गुन्हा दाखल करुण घटनास्थळी कोणताच पुरावा नसतांना जळगांव जा. ठानेदार सुनील जाधव यांनी आपली कुशलतेने त्याच गावातील "रितेश देशमुख" नामक व्यक्तीला कालच अटक करुण आज न्यायालयात उभे केले असता आरोपीला येत्या 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील  जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा गावात शनिवारी सकाळच्या सुमारास एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचे घरातच निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आले होते. महिलेच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आले व महिलेवर बलात्कार झाल्याचे घटनास्थळी  वाटत होते दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव जा. पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व ठानेदार जाधव यांनी काही खुना शोधून आरोपीला शोधला व विशेष श्वानाला पाचारण केले तर श्वान ही त्याच व्यक्तीच्या घरा पर्यंत जावून पोहोचला होता. गुप्त माहिती आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी त्याच गावातील रितेश देशमुख नामक या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलीस तपासा दरम्यान आपल्या पतीने रात्री लिलाबाईचा खून करून आल्याचं आपल्याला सांगितलं होतं. एवढंच नाहीतर त्याने स्वतःच्या हाताने कपडेही धुतले होते, अशी माहितीही तिने दिली.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन खुनाची आणि आरोपीला अटक केल्याची माहिती माध्यमांना दिली होती. आरोपीने हत्या का केली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचं ही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात जळगांव जा. ठाण्यात आरोपी रितेश देधमुख विरोधात भादवीची कलम 302,376,452 अन्वय गुन्हा दाखल करुण आरोपीला रितेश देशमुखला स्थानिक न्यायालयात हजर केले असता आरोपीला 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.हादरुन टाकनारी या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव हे करीत आहेत.

अहमदनगर(प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून  ईशू सिंधू हजर झाल्यापासून त्यांनी सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. सर्वसामान्यांना त्यांची न्याय मिळवून देण्यासाठी धडपड असते.  एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती निर्माण झाली. जिल्ह्याच्या कारभारात काम करत असताना  जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या रुपाने एक चांगला सहकारी मिळाला  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने त्यांना शनिवारी (दि.7) निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ, कॅम्पचे पो. नि. प्रविण पाटील, नगर  तालुका पोलिस ठाणे पो.नि. रजपूत, एमआयडीसीचे  पो.नि आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागीय पोलिस उपअधीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे शाखा आदींसह विविध विभागातील कर्मचार्‍यांसह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक व  पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्ह्यात पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ सांभाळून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. विविध सण उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून शांतता ठेवली, गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला होता, असे प्रत्येक अधिकारी व  कर्मचार्‍यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

बेलापूर  (प्रतिनिधी )- जनसुविधा योजनेअंतर्गत हिंदू स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून   देखील  जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारी वरुन ते काम रद्द करुन इतरत्र वळविल्यामुळे  गावाचा विकास निधी दुसरीकडे जाणार असल्याचा आरोप बेलापूरच्या सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी केला आहे याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात सरपंच राधाताई बोंबले व उपसरपंच रवींद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर येथील हिंदू स्मशान भूमी च्या संरक्षक भिंतीच्या कामाकरिता नऊ लाख रुपये खर्चाच्या कामाचा  प्रस्ताव तयार करून त्यास ३ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने  प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती त्यानंतर 28 मे २०१९ रोजी या कामास जिल्हा परिषदेने  तांत्रिक मान्यता देण्यात आली त्यानंतर बेलापूर  ग्रामपंचायतीने ई  निविदा काढण्यात ई निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने  ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला व सदर कामाकरिता जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करण्यात आली होती परंतु  २२ नोव्हेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्राचा संदर्भ देवुन ग्रामपंचायतीस पत्र पाठवून बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील स्मशानभूमी  रक्कम नऊ लाख हे काम सुरू झाले नसल्यास सदर काम रद्द झाले बाबतचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे पत्रात नमूद केले आहे या कामाबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने सर्व प्रक्रिया पार पाडली असून केवळ जिल्हा परिषद सदस्यांच्या हेकेखोर पणामुळे हा निधी बेलापूर खूर्द येथे वळविणार असल्याचे पत्र जिल्हा  परिषदेने दिले आहे  या कामासाठी निधी उपलब्ध होऊ नये याकरिता जिल्हा परिषद सदस्यांनी प्रयत्न केल्याची बाब समोर येत असून केवळ सदस्याच्या आडमुठेपणामुळे  मुळे गावाला निधी मिळू शकत नाही याबाबत बेलापूर ग्रामपंचायतीने 3 डिसेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून या कामाबाबत सर्व प्रक्रिया पार पाडल्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी  बोंबले व खटोड यांनी केली आहे     [जनतेत सांगायचे विकास कामासाठी सर्वांच्या बरोबर आहे आणी दुसरीकडे गावाच्या विकास कामात अधिकार्यावर दबावआणून कामात खोडा घालायचा हे काम जि प सदस्य करत आसुन मागील सात वर्षात गावासाठी काय काम केले किती निधी आणला हे सदस्याने जाहीर करावे --सुधीर नवले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती ]

हैदराबाद - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. मात्र, ज्या 4 आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आलाय, त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसलाय. हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ (26), जोलू शिवा (20), जोलू नवीन (20), चिंताकुन्टा चेन्नाकेसवलू (20) या चार आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.  मात्र, पोलीस कोठडीत असतानाच हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटर करुन चारही आरोपींना ठार केले. हैदराबाद पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, आरोपींच्या कुटुंबींयांनी आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र, आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवऱ्याला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की, माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण, त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे. हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बऱ्यापैकी पैसा मिळविला. मात्र, दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.पशुवैद्यकीय तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget