Latest Post

अहमदनगर - कोतवाली पोलिसांनी धकेबाज कामगिरी केली आहे. कायनेटिक चौक, इलाक्षी शोरूम मागे, यशोधन हॉटेल जवळ एका खोलीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांना रेडहॅन्ड पकडले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ चालू आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी या ठिकानी छापा टाकला. यामध्ये 17 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महा.जु.का.कलम ४, ५ प्रमाणे पोकॉ शाहीद सलीम शेख, नेमणुक- कोतवाली पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी बंडु मिठ्राव दारूनकर वय-४३ रा.वाघमळा, सावेडीगाव.सुशांत संजय फुंदे वय-२८ रा.सुर्यानगर, सनि पॅलेस, पोपट भानुदास मोरे वय-४० रा.अंबिका हॉटेलसमोर,केडगाव, ज्ञानेश्वर मन्छिंद्र दौडकर वयः ३२ वर्षे रा. मारुती मंबिराजवळ, तोफखाना, मुकेश प्रताप कंडारे वय-३१ रा. सर्जेपुरा, जेजेगलली, आरीफ मेहबुब शेख वय-४२ वर्षे रा.शांती कंस्ट्रक्शन, गोंविदपुरा, श्रीकांत धोंडीराम फसले वय-३३ वर्षे रा.दिपनगर, भुषणनगर, केडगाव, प्रशांत रामदास भुसारे वय- २७ वर्षे रा.कापरेमळा,केडगाव,गणेश पोपट लॉढे वय-२९ वर्षे रा.कापरेमळा, केडगान, अनिल वामोवर सातपुते वय-३८ वर्षे रा.शाहूनगर, पारनेर जि.अहमदनगर. पोपट रामभाऊ औटी वय-५८ वर्षे रा. सुतारगलली, पारनेर, इमाम इब्राहीम पठाण वय-६२ वर्षे रा. अचना हॉटेलमागे केडगाव, मनोहर बिश्काथ कोडम वय-४४ वर्षे रा.नित्यसेवा हासिंग सोसा, वसंत टेकडी, सावेडी, किरण बबनराव मुके वय-६७ वर्षे रा.गणेशनगर, कलयाणरोड, सचिन सुरेश दिवाने वय-३३ वर्षे रा.साईराम सोसा, कलगाणरोड, राविन काशिनाथ उदगीरकर वय-३६ वर्षे रा. बालीकाश्रम शाळेच्यमागे,बालीकाश्रम रोड, विजय ज्ञानदेव गायकवाड वय-३० वर्षे रा.बोहरीचाळ, रेलवेस्टेशन,कायनेटीक चौक, हे इलाक्षी शोरुमचे मागे, यशोधन हॉटेलजवळ, एका खोलत तिरट नावाचा जुगार खेळ असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १,३५,३०० रुपये त्यात १०,३०० रुपये रोख रक्कम व १,२५,००० रुपयांचे मोबाईल व एक करीझमा मोटारसायकल व तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे पत्ते, जुगाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला

पुणे : पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्ररदारांसोबतच गैरवर्तन करत त्यांना धमकवणाऱ्या तसेच लाच लुचपत विभागाने कारवाई व गुटख्याचे गोडाऊन फॊडणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर दोन कर्मचारी निलंबित केले आहे. धडक करवाई साठी प्रसिद्ध असणारे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.पोलीस शिपाई हुकूमसिंग रामसिंग भाटी व पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड अशी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, पोलीस हवालदार श्रावण प्रभू गुपचे आणि पोलीस नाईक नितीन मधुकर कदम अशी निलंबित केलेल्या कार्मचाऱ्यांची नावे आहेत.हुकूमसिंग भाटी हे मुख्यालयात नेमणुकीस होते. यापूर्वी मुंबईत नोकरीस होते. त्यावेळी २००२ मध्ये त्यांच्यावर मुंबई लाच लुचपत विभागात ४२०, १२० (ब) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे हे कृत्य विकृत व घृणास्पद असून पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२ नोव्हेम्बर) अधीक्षक पाटील यांनी त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.तर पोपट गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. दरम्यान मे महिन्यात त्यांना कोल्हापूर येथील एका गुन्ह्याच्या तापासाठी पाठविण्यात आले होते. परंतु, गायकवाड हे गैरहजर राहिले. तसेच परवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावी गेले. तेथे साथीदारांच्या मदतीने गुटख्याचे गोडाऊन फोडले आणि ५ लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीर रित्या आणून तो विक्री केला. त्यांचे हे कृत्य पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा आणणारे असल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
तर हवालदार श्रावण गुपचे यांनी दौड पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना एका तक्रारदारालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. हा प्रकार जुलै महिन्यात घडला होता. याबाबत त्यांच्यावर दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची गंभीर दाखल घेऊन पाटील यांनी गुपचे यांना सेवेतून निलंबित केले आहे. तसेच पोलीस नाईक नितीन कदम हे पौड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मद्यपान केले. त्याचा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर व्हायरल झाला होता. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. याची शहानिशा केल्यानंतर कदम याना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि तात्काळ सहकार्य देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

बुलडाणा- 22 नोव्हे
जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम कुंभारी शिवारामध्ये बालू खांडेभराड यांच्या शेतामध्ये अवकाशातून एक यंत्र आज सकाळी दिसून आला. त्या यंत्रांमध्ये एक मोठ्या प्रकारचा बलून फुगा होता व त्याखाली काही इलेक्ट्रॉनिक सामग्रीचे सर्किट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रथम घबराटीचे वातावरण तयार झाले होते.
      सदर घटनेबाबत ग्राम कुंभारी येथील काही नागरिकांनी पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांना माहिती देऊन सदर प्रकार सांगितला. ही घटना दिनांक 22 रोजी सकाळी सात
साडेसातच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी कुठल्या प्रकारचे यंत्र आहे किंवा दुसरा काही प्रकार आहे अशा संभ्रमात परिसरातील नागरिक शेतकरी होते मात्र सदर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, तलाठी देशपांडे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन सदर यंत्राची तपासणी केली. त्यानंतर सदरचे यंत्र पोलीस आणि महसूल विभाग यांनी पंचा समक्ष ताब्यात घेऊन स्थानिक नागरिकांचा संभ्रम दूर केला. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तलाठी देशपांडे यांना विचारणा केली असता सदर चे यंत्र पर्जन्यमापक यंत्र असू शकते, हवामान खात्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे यंत्र बलून किंवा फुग्या द्वारे अवकाशात सोडण्यात येते. याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पुढील कार्यवाही आणि या यंत्राबाबत सविस्तर माहिती प्रशासन घेत आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला. या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्रीशीर माहिती मिटके यांना मिळाली.त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे वेश्या व्यवसाय सूरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी (दि.22) रोजी दुपारी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) अपहरण करून त्यानंतर एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळ्ल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. त्यामुळे याप्रकरणाचा छडा त्वरित पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे.ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. विळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते. याची माहिती कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तरुणीला पोत्यातून बाहेर काढले. कपडे घालण्यास दिले.तसेच विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही तरूणी पाथर्डी परिसरातील असून ती सध्या शेंडीबायपास परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. ही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली. त्यामुळे या प्रकरणाची गाभीर्य वाढले आहे. तीचे हात-पाय बांधलेले होते. यामहिलेची अवस्था पाहता तीच्यावर अत्याचार झाल्याचा संशय काहींनी व्यक्त केला.

बुलडाणा- 21 नोव्हे
रस्ता सुरक्षा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर 270 जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व अन्य निर्माणाधीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी.
     रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला सदर रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्‌याचे काम गतीने पुर्ण करावे. कंत्राटदराने विहीत कालमर्यादेत दर्जेदार काम करून रस्ता पुर्ण करावा. याप्रसंगी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार व यंत्रणांवर रस्ता कामांबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत रस्तानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- दुसर्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे             गावातील भाजपा पदाधिकार्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला घरातील आर्थिक व्यवहारा विषयी त्याने भाजपा पदाधिकार्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले  यावरुन भाजपा पदाधिकार्याच्या घरात वाद निर्माण झाले या वादास कारणीभूत गावातीलच काँग्रेसचा तो कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कार्यकर्ता सापडला नाही अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने आमच्या घरात भांडणे लावतोस काय अशी विचारणा करुन त्या कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली कशी बशी सुटका करुन त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला या वेळी मोठा जमाव जमा झाला होता

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget