Latest Post

बुलडाणा- 22 नोव्हे
जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम कुंभारी शिवारामध्ये बालू खांडेभराड यांच्या शेतामध्ये अवकाशातून एक यंत्र आज सकाळी दिसून आला. त्या यंत्रांमध्ये एक मोठ्या प्रकारचा बलून फुगा होता व त्याखाली काही इलेक्ट्रॉनिक सामग्रीचे सर्किट असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रथम घबराटीचे वातावरण तयार झाले होते.
      सदर घटनेबाबत ग्राम कुंभारी येथील काही नागरिकांनी पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांना माहिती देऊन सदर प्रकार सांगितला. ही घटना दिनांक 22 रोजी सकाळी सात
साडेसातच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. यावेळी कुठल्या प्रकारचे यंत्र आहे किंवा दुसरा काही प्रकार आहे अशा संभ्रमात परिसरातील नागरिक शेतकरी होते मात्र सदर घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील खेडेकर, तलाठी देशपांडे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन सदर यंत्राची तपासणी केली. त्यानंतर सदरचे यंत्र पोलीस आणि महसूल विभाग यांनी पंचा समक्ष ताब्यात घेऊन स्थानिक नागरिकांचा संभ्रम दूर केला. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तलाठी देशपांडे यांना विचारणा केली असता सदर चे यंत्र पर्जन्यमापक यंत्र असू शकते, हवामान खात्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे यंत्र बलून किंवा फुग्या द्वारे अवकाशात सोडण्यात येते. याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, पुढील कार्यवाही आणि या यंत्राबाबत सविस्तर माहिती प्रशासन घेत आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला. या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली पोलीस उपधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तारकपूर परिसरात एका अपार्टमेन्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्रीशीर माहिती मिटके यांना मिळाली.त्यानुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. सुरवातीला दोघांना डमी ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यांना तेथे वेश्या व्यवसाय सूरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची खात्री पटल्यानंतर शुक्रवारी (दि.22) रोजी दुपारी तेथे छापा टाकला. या छाप्यात दोन महिलांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) अपहरण करून त्यानंतर एक 21 वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत विळद परिसरात रेल्वे रूळावर पोत्यात आढळ्ल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. त्यामुळे याप्रकरणाचा छडा त्वरित पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे.ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. विळद परिसरातील रेल्वे रूळावर एका तरुणीला नग्न अवस्थेत, हात-पाय बांधून पोत्यात घालून आणून टाकले होते. याची माहिती कळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तरुणीला पोत्यातून बाहेर काढले. कपडे घालण्यास दिले.तसेच विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही तरूणी पाथर्डी परिसरातील असून ती सध्या शेंडीबायपास परिसरात वास्तव्यास असल्याचे समजले. ही तरूणी गुरूवारी (दि. 21) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली. त्यामुळे या प्रकरणाची गाभीर्य वाढले आहे. तीचे हात-पाय बांधलेले होते. यामहिलेची अवस्था पाहता तीच्यावर अत्याचार झाल्याचा संशय काहींनी व्यक्त केला.

बुलडाणा- 21 नोव्हे
रस्ता सुरक्षा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. रस्त्यांवरील अपघातामध्ये जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर 270 जणांनी आपले प्राण गमविले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व अन्य निर्माणाधीन रस्त्यांवर संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांनी दुरूस्ती, खड्डे बुजविणे, सुरक्षा नियमांची व्यवस्था करावी. रस्ता सुरक्षेप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित यंत्रणाप्रमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समिती प्रमुख डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकांना सातत्याने गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, रस्ता सुरक्षा हा सध्याचा ऐरणीवर असलेला विषय आहे. या विषयाशी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने काम करायला पाहिजे. समिती कामकाजासंबंधित अहवाल, अपघात घडल्यानंतर देण्यात येणारा संयुक्त अहवाल विनाविलंब सादर करावेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर संबंधित यंत्रणेने नियंत्रण ठेवावे. काम सुरू असताना नागरिकांना त्रास होणार नाही, अपघात घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कंत्राटदार काम करीत नसल्यास देयकांची अदायगी थांबवावी.
     रस्ता काम सुरू असलेल्या यंत्रणांनी दर आठवड्याला सदर रस्ता कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती यांनी मलकापूर ते खामगांव रस्ता कामाचे सुधारीत निवीदा होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे फलक लावावेत. मेहकर फाटा ते चिखली शहर रस्त्‌याचे काम गतीने पुर्ण करावे. कंत्राटदराने विहीत कालमर्यादेत दर्जेदार काम करून रस्ता पुर्ण करावा. याप्रसंगी संबंधित रस्ता कामाचे कंत्राटदार व यंत्रणांवर रस्ता कामांबाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.बैठकीत रस्तानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- दुसर्याच्या घरात डोकावणे एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले असुन बेलापूरच्या बाजारपेठेत सकाळी सकाळी झालेल्या भांडणाची गावात चांगलीच चर्चा चालू आहे             गावातील भाजपा पदाधिकार्याच्या घरात कुरापती करण्याचा प्रयत्न एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला घरातील आर्थिक व्यवहारा विषयी त्याने भाजपा पदाधिकार्याच्या घरच्यांना फोनवर सांगितले  यावरुन भाजपा पदाधिकार्याच्या घरात वाद निर्माण झाले या वादास कारणीभूत गावातीलच काँग्रेसचा तो कार्यकर्ता असल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने त्यास शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कार्यकर्ता सापडला नाही अखेर आज सकाळीच तो कार्यकर्ता बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत आल्याचे समजताच भाजपाच्या पदाधिकार्याने आमच्या घरात भांडणे लावतोस काय अशी विचारणा करुन त्या कार्यकर्त्याची चांगलीच धुलाई केली कशी बशी सुटका करुन त्या कार्यकर्त्याने तेथुन पळ काढला या वेळी मोठा जमाव जमा झाला होता

शेवगाव : तालुक्यातील वडूले बुदूक येथे आपल्या मित्राचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.या पैकी एकाचा मृतदेह सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री उशिरा तर दुसऱ्याचा मृतदेह मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आढळून आला. रणजित नंदू काते (वय ३४) व अमृत रघुनाथ चोपडे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील रणजित काते हा तरुण रविवारीपासून (१७ नोव्हेंबर) घरातून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचे सासरे महादेव भारस्कर (रा. रामनगर, शेवगाव) यांनी पोलिसांत जावई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. मात्र, सोमवारी त्याचे कपडे गावाजवळील नंदीनी नदीच्या पुलाजवळ आढळून आले. त्यामुळे तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाला असल्याची शंका गावकऱ्यांना आली. त्याला शोधण्यासाठी सोमवारी सायंकाळी त्याचा मित्र अमृत रघुनाथ चोपडे हा पाण्यात उतरला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो वर न आल्याने ग्रामस्थांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने नदीपात्रातील पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली. यात अमृत चोपडे याचा मृतदेह हाती लागला. मात्र रणजितचा मृतदेह सापडला नव्हता. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास तेथून निघालेल्या काही नागरिकांना रणजित काते यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच तेथे नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिस पाटील राजेंद्र पांजरे यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचाच मृतदेह वर काढला. शोकाकुल वातावरणात वेगवेगळ्या वेळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष धोत्रे तपास करीत आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी) नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी (अब्दुल करीम सय्यद) (वय 70) यांच्या अपहरण प्रकरणातील दोघांना मंगळवारी (दि. 19) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतूर (जि. जालना) येथून अटक केली होती. दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने बुधवारी (दि. 20) त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर दुसर्‍या आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.नगरमधील गुन्हेगार अजहर शेख याच्या सांगणावरून हा गुन्हा केल्याची कबुली या अटक केलेल्या दोघांनी दिली होती. अजहरला 25 लाखांची आवश्यकता होती म्हणून त्याने अन्य साथीदाराच्या मदतीने हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. अटक केलेल्या आरोपींकडे पोलीस चौकशी करीत असताना एकाची शैक्षणिक कागदपत्रे बघितल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या मुलाला सज्ञान होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. तो परतूरमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. या मुलाचे वडील सरकारी नोकरीला असल्याचे समजले.परतूरमध्ये एका जीममध्ये हा मुलगा व्यायामासाठी जात होता. त्या ठिकाणी व्यायामासाठी आलेल्या अजहर शेख याच्याशी त्याची ओळख झाली. त्यातून पुण्याला फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून नगरला आणले व उद्योजकाचे अपहरण करण्यात सहभागी केल्याचे हा मुलगा पोलिसांना सांगत आहे. तर अटक केलेला दुसरा आरोपी निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय- 20, रा. परतूर, जि. जालना) याला बुधवारी (दि. 20) मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एस. चांदगुडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घ्यायचा आहे. गुन्हा कशा पद्धतीने केला, याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती तपासी अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने निहाल शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget