Latest Post

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. भाजपाने चर्चेची दारं खुली असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, कोणताही प्रस्ताव आला नाही अन् पाठवणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा -शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर सहमती झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.

बुलडाणा- 5 नोव्हेंबर
बुलडाणा तालुक्यातील सावळा,भादोला,डोंगरखंडाळा व वरवंड गावांचा आज 5 नोव्हेंबर ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार व रविकांत तुपकर यांच्या समवेत दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करुण शेतकऱ्यांशी संवाद ही साधला.यावेळी उपस्थित असलेल्या कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना कण्यात आले.बुलडाणा तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन,कापूस,उडीद,मुग या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन अक्षरशः पाणी येते आहे.प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आंदोलनाला प्रशासनाला समोर जावे लागेल असा इशाल यावेळी रविकांत तुपकरांनी दिला आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी  )--नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे १००% नुकसान भरपाई मिळावी तसेच बिगर विमा धारक शेतकऱ्यांना हेक्ट२५ हजार नुकसान भरपाई  मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुधाकर खंडागळे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे  केली              बेलापूर येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्याकरिता नामदार राधाकृष्ण विखे पाटील आले होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूर येथील प्रकाश पाटील नाईक यांच्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पहाणी केली त्यावेळी बोलताना सुधाकर खंडागळे यांनी अशी मागणी केली की सर्वच शेतकऱ्यांनी शेतीचा पिकाचा विमा उतरवलेला नाही परंतु या बेमोसमी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या पंच नाम्यांमध्ये सर्वच पिकांचा समावेश करण्यात यावा त्यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वच पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून दोनच दिवसात सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात येतील असे सांगितले यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समिती सभापती दीपक पठारे जिल्हा  परीषद सदस्य  शरद नवले भाजपाचे प्रकाश चित्ते  अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे बाळासाहेब नाईक युवराज नाईक प्रताप राव नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मंडलाधिकारी गोसावी कैलास चायल आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव, शेरी चिखलठाण परिसरात काल ढगफुटीसारखा प्रकार घडला. सुमारे साडेचार तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने तुडूंब भरलेले बंधारेही फुटले तर अनेक शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना त्यात आता ढगफुटीसारखे प्रकार घडत असल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.म्हैसगाव परिसरात ढगफुटी होऊन झालेल्या पावसामुळे केदारेश्वर मंदिराजवळील म्हैस ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला. शेरी येथील तलाव फुटण्याची शक्यता असल्याने तलावाच्या सांडव्याचा भाग मोठा करुन तलावातील पाणी कमी करण्यास स्थानिक तरुणांना सांगितले. एकूणच पावसामुळे या भागात सर्वत्र पाणी भरलेले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरातील 5 ते 6 जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेले बंधारेही फुटले तर रस्त्यावरुन सुमारे 30 फुट पाणी वाहत होते.सोमवारी पहाटे 4 पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हैसगाव परिसराला अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी 11.30 वाजता केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) ओढ्याच्या पुलावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, बुळे पठार भागातील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी या भागात गेलेले तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, मंडलाधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक असे सर्वच अधिकारी सकाळपासून पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते.

प्रतिनिधी) शिर्डीनजीकच असलेल्या निमगाव हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविणारा व त्याच्या साथीदारांसह सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना शिर्डी शहराजवळच सदर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पो. हे. कॉ. इरफान शेख, बाबासाहेब काकड, संदीप गडाख, बाबासाहेब सातपुते, विशाल मेद, ज्ञानेश्वर सुपेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शालिनी सोळसे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात या सर्व कर्मचारी अधिकारी या पथकाने निघोज निमगाव हद्दीत रात्री 12 च्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.बनावट गिर्‍हाईक बनून आपल्या कर्मचार्‍याला पाठवून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले. निघोज निमगाव हद्दीतील हॉटेल साईधनचा मॅनेजर विष्णू अर्जुन ठोंबरे, रा. वैजापूर यांच्यासह गणेश सीताराम कानडे, सुनील शिवाजी दुशिंग, सचिन रामभाऊ शेळके, अक्षय भाऊसाहेब बगळे, गोपीनाथ रावसाहेब हिंगे, हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिला, मुलींना पैशाचे प्रलोभन देऊन वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून ग्राहकांना मुली पुरवून सदरचा कुंटणखाना चालवताना आढळून आले. या सर्व आरोपी विरोधात स्रियांचा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 भादंवि कलम 366 अ बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 26 अन्वये शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी घरगुती, लॉजिंग वर सुद्धा यांची करडी नजर असून लवकरच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. काळाराम मंदिर परिसर, जिजामाता चौक परिसरात कचर्‍याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व नागरिकांची देखील आहे. पण श्रीरामपूर शहरात दोघेही आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण परसले आहे. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे या कचर्‍याच्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याठिकाणी डासांचे प्रमाण वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. तसेच प्लॅस्टिकमुळे ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी साचून त्याचे रुपांतर दुर्गंधीत झाले आहे. उघड्यावर कचरा पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान’ यामध्ये सहभाग घेतला आहे. याबाबत केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. तरी देखील शहर स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचा ठेका नगरपालिकेने दिलेला आहे. याआगोदर दररोज कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत होती. परंतु काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांमधून एकदा घंटागाडी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. काही नागरिक घरातच कचर्‍याची साठवणूक करुन ठेवतात. तर अनेक नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकून देतात. तो कचरा तसाच राहिल्याने दुर्गंधी सुटते. एकंदरीतच शहरात कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.पालिकेने कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प राबवावा.

बुलडाणा- 4 नोव्हेबर
नकली सामान विकण्याचा प्रमाण वाढलेला असून नकली बीडी सुद्धा विकल्या जात आहे व सरकारी टैक्स भरून व्यवसाय करणाऱ्या बीडी उद्योगला फटका बसत असून कामगारावर ही याचा परिणाम दिसून येत आहे.अशाच प्रकारे बुलडाणा जिल्ह्यात नकली ऊंट बीडी विकणारे 4 लोकांवर गुन्हा दाखल करुण त्यांना अटक करण्यात आले आहे.यात मुख्य सूत्रधार देऊळगांव महि येथील आहे.
      पोलिस कडून मिळालेली माहिती प्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात ऊंट बीडीचे नकली लेबल, सील पट्टी, क्राफ्ट तैयार करून विक्री होत असल्याची माहिती फिर्यादी भास्कर पंडित सेल्स एग्जीक्यूटिव रा. नाशिक यानी दिल्या नंतर त्यांनी संशयित केलेले ठिकाणे दुसरबीड गावातील मदन शिवाजी बुधवत समृद्धि किराणा दुकान व ग्राम शेंदुर्जन येथील सागर अरविंद शिंगणे नामक इसमास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली त्यांनी माहिती दिली की सदर ऊंट बीडीचे माल देऊळगांव मही येथील वैष्णवी किराना चे मालक ज्ञानेश्वर चेके व रविंद्र अंबादास टाले यांच्या कडून खरेदी केल्याचे सांगितले.या प्रकरणी पोलीस स्टेशन किनगांव राजा येथे आरोपी मदन शिवाजी बुधवत रा.दुसरबीड याच्या विरोधात तर पोलीस स्टेशन साखरखेरडा येथे आरोपी सागर अरविंद शिंगणे रा.शेंदुर्जन,ज्ञानेश्वर नारायण चेके रा.देऊळगांव मही व रविंद्र अंबादास टाले रा.खैरव यांच्या विरुद्ध भादवी कलम 420,सहकलम 102,103,104 व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 63 व इतर कलमान्वय गुन्हा दाखल कण्यात आलेला आहे.यात तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.तर हे नकली बीडीचे माल कुठे व कोणी तैयार करते?याचे मुख्यसूत्रधार कोण?हे पोलीस तपासात निष्पन्न होने गरजेचे आहे.
     सदर कार्यवाही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटिल भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली अपर पुलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे नेतृत्वात आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणाचे डीवायएसपी डी.बी. तड़वी, पोलीस स्टेशन साखरखेरडाचे ठानेदार संग्राम पाटील,पोलीस स्टेशन किनगांव राजाचे ठानेदार सोमनाथ पवार,पोउनि भाईदास माळी व दोन्ही ठाण्याचे स्टाफ यांनी संयुक्तरित्य केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget