बेलापूर ( प्रतिनिधी )--नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे १००% नुकसान भरपाई मिळावी तसेच बिगर विमा धारक शेतकऱ्यांना हेक्ट२५ हजार नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुधाकर खंडागळे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली बेलापूर येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्याकरिता नामदार राधाकृष्ण विखे पाटील आले होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूर येथील प्रकाश पाटील नाईक यांच्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पहाणी केली त्यावेळी बोलताना सुधाकर खंडागळे यांनी अशी मागणी केली की सर्वच शेतकऱ्यांनी शेतीचा पिकाचा विमा उतरवलेला नाही परंतु या बेमोसमी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या पंच नाम्यांमध्ये सर्वच पिकांचा समावेश करण्यात यावा त्यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वच पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून दोनच दिवसात सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात येतील असे सांगितले यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समिती सभापती दीपक पठारे जिल्हा परीषद सदस्य शरद नवले भाजपाचे प्रकाश चित्ते अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे बाळासाहेब नाईक युवराज नाईक प्रताप राव नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मंडलाधिकारी गोसावी कैलास चायल आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment