प्रतिनिधी) शिर्डीनजीकच असलेल्या निमगाव हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविणारा व त्याच्या साथीदारांसह सहा महिलांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना शिर्डी शहराजवळच सदर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पो. हे. कॉ. इरफान शेख, बाबासाहेब काकड, संदीप गडाख, बाबासाहेब सातपुते, विशाल मेद, ज्ञानेश्वर सुपेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शालिनी सोळसे व पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात या सर्व कर्मचारी अधिकारी या पथकाने निघोज निमगाव हद्दीत रात्री 12 च्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.बनावट गिर्हाईक बनून आपल्या कर्मचार्याला पाठवून या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले. निघोज निमगाव हद्दीतील हॉटेल साईधनचा मॅनेजर विष्णू अर्जुन ठोंबरे, रा. वैजापूर यांच्यासह गणेश सीताराम कानडे, सुनील शिवाजी दुशिंग, सचिन रामभाऊ शेळके, अक्षय भाऊसाहेब बगळे, गोपीनाथ रावसाहेब हिंगे, हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिला, मुलींना पैशाचे प्रलोभन देऊन वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून ग्राहकांना मुली पुरवून सदरचा कुंटणखाना चालवताना आढळून आले. या सर्व आरोपी विरोधात स्रियांचा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 भादंवि कलम 366 अ बाल न्याय अधिनियम 2000 चे कलम 26 अन्वये शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी घरगुती, लॉजिंग वर सुद्धा यांची करडी नजर असून लवकरच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
Post a Comment