डावरे यांच्या निधनाने बेलापूर भाजपामध्ये पोकळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी डावरे कुटुंबीयांची घेतली भेट

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथील ज्येष्ठ पत्रकार ,भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, समाजसेवक, दानशुर व्यक्तीमत्त्व कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांच्या दुःखद निधनाने बेलापूर परिसरासह पत्रकारिता तसेच सामाजिक , राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असुन त्यांच्या जाण्याने बेलापूर भाजपामध्ये एक पोकळी निर्माण झाली असल्याचे मत जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.


कै. डावरे यांची गावातुन  वाबळे गल्ली ,झेंडा चौक ते स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाची वार्ता राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना समजताच त्यांनी डावरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विष्णुपंत डावरे यांची पत्नी रत्नमाला डावरे पुतणे प्रफुल्ल डावरे बंधू हरिहर डावरे व डावरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कै. डावरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे मत नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, हाजी इस्माईल शेख, रणजित श्रीगोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, देविदास देसाई, पुरुषोत्तम भराटे, कणजीशेठ टाक, रवींद्र खटोड,राजेश खटोड,भरत साळुंके सुभाष बोरा,रावसाहेब अमोलिक, राकेश कुंभकर्ण, निलेश हरदास, मुस्ताक शेख,रखमाजी गाढे,रमेश काळे, विशाल आंबेकर, अजिज शेख, सचिन वाघ, शफिक बागवान, सचिन अमोलिक, किशोर बोरुडे, करण गोसावी, अनिल थोरात,सुमित बोरुडे, आदित्य कर्डिले, सुरज  बडे,मोहसीन सय्यद, प्रभात कुऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget