बेलापूर (प्रतिनिधी देविदास देसाई)-बेलापुरात एकच दिवशी दोन वेगवेगळ्या गंठण चोरीच्या घटना घडल्या असून एक सकाळी सात वाजता तर दुसरी रात्री साडेअकराच्या दरम्यान घटना घडली आहे .साखळी चोरांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे बेलापुरात सकाळी भगवान श्री हरिहर केशव गोविंद बन येथून दर्शन करून परतत असताना प्रवरा नदीच्या पुलावर सकाळी सात वाजेच्या सुमारास एका महिलेचे दोन तोळ्याचे गंठण तोडून चोरटे पसार झाले या घटनेचा तपास पोलीस करत असतानाच काल रात्री बेलापूर खुर्द येथील एका महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे गंठण रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान तोडून नेण्यात आले श्रावण महिना असल्यामुळे श्री हरी केशव गोविंदाच्या पादुकांची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती रात्री साडेअकराच्या सुमारास ही मिरवणूक बेलापूर खुर्द इथून जात असताना अनेक महिला भगिनी पादुकांच्या दर्शनाकरता थांबल्या होत्या त्यात एक वयोवृद्ध महिला आपल्या घरासमोर ओट्यावर बसलेली होती त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी काही समजण्याच्या आतच त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून पोबारा केला या घटनेनंतर सदर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीसही घटनास्थळी आले सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.सकाळची घटना घडल्यानंतर पोलीस तपास सुरू असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा एका वयोवृद्ध महीलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून नेण्यात आली .सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही शिवाय बेलापूर पोलीस स्टेशनला जादा कर्मचारी देण्यात आलेले असतानाही साखळी चोर इतके धाडस करतातच कसे? असा सवाल नागरिकाकडून विचारला जात आहे.बऱ्याच दिवसानंतर बेलापूर मध्ये झाडीने चोरीच्या सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत या घटनेचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे


Post a Comment