November 2025

श्रीरामपूर प्रतिनिधी - अहिल्या नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी ॲङ समिन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.


गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.

2019 व 2024 च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यातत्यांचा सिंहाचा वाटा होता.

 नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज नाराज होते.पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीन दलित,मुस्लिम-अल्पसंख्याक,शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्व समावेशक भूमिका पसंत पड़ल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला. 

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालक मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदि उपस्थित होते. या प्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.

सदर प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोड़ला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.

एडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाने वार्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत. प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : उंची : 5 फूट 6 इंच रंग : सावळा चेहरा : उभट केस : काळे, छोटे वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे. सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे. 📞 संपर्क : 9860158354 तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण

श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने वातावरण रंगले. त्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.



यानिमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):  तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘घरकुल योजना’ अंतर्गत ६०१ घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप तसेच ११ लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.



या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, बांधकाम कामगार, महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत, राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.


डॉ. विखे पाटील म्हणाले, या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली. परंतु आता ते दिवस संपले. श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही, ही माझी ग्वाही आहे. त्यांनी पुढे सांगितले की, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून, आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. पुढील सात ते आठ महिन्यांत या प्रश्नावरही निर्णय लागेल, असे ते म्हणाले.


डॉ. विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते. रात्री सातनंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात. परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही. गेल्या २५ वर्षांत सत्तेत राहिलेल्यांनी काय केले, हे आता जनतेने विचारले पाहिजे. ते म्हणाले,  विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. एमआयडीसीची अवस्था बघा  आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही. त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो. हे बदलायचे काम आपण करणार आहोत. ६ महिन्यांत शिवाजी महाराज पुतळा; पुढे आंबेडकर स्मारक

विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते. पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यांत सोडवणार आहोत. दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे. ते म्हणाले, ज्यांना ४० वर्षांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही, ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार?


हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी देत आहे, असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी, रस्ते, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.


त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले, गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही. ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत. ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो, कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे,  असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला 


ते म्हणाले, श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला, तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो. बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच, आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो 


आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले, मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही. मला फक्त विकास करायचा आहे. या जमिनीवर तुम्ही घर बांधाल, तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल  हेच माझं समाधान आहे. मला तुमच्याकडून काही नको, फक्त आशीर्वाद द्या. कारण गरिबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते, जी मला पुन्हा उभं करते.


कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले, आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटांत संपला. वेळेचं महत्त्व ठेवू या. बोलणं कमी, काम जास्त असू द्या. या कार्यक्रमास  जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मा. तालुकाध्यक्ष दिपक पटारे  तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मा. सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे, भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे, ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के, विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे  शरद त्रिभुवन,  ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने, सरपंच दिलीप त्रिभुवन, सरपंच जितेंद्र गोलवड, उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी ‘विकासासाठी संघर्ष’, ‘सामाजिक समतेचा आदर्श’ आणि ‘राजकारणापेक्षा कार्य’ या तीन मुद्यांवर ठाम भूमिका मांडली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget