बेलापूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे बेस्ट कॉप ऑफ दि मंथ पुरस्काराने सन्मानित
बेलापूर( प्रतिनिधी )--बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना बेस्ट कॉप ऑफ दी मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात येथील प्रमोद लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या मेडिकल दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी कामगार दुपारच्या वेळेस जेवण करण्याकरीता गेले असता मेडिकलचे शटर उघडून ड्रॉवरचे लॉक तोडून त्यात असणारी रुपये एक लाख तीस हजार ही रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेली होती . याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेऊन आरोपी विकास लक्ष्मण थोरात राहणार उक्कलगाव तालुका श्रीरामपूर यास सीताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 83 हजार रुपये रोख हस्तगत केले. त्याचबरोबर नशेच्या गोळ्या व औषध विक्री करण्यासाठी आलेला आरोपी जावेद शिराज शेख यास ताब्यात घेऊन तपास करत असताना आरोपी जावेद शेख हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झाला होता या आरोपीचा शोध घेऊन त्या आरोपीस 24 तासाच्या आत पुन्हा अटक करण्यात आली या दोन्ही गुन्ह्यांमध्ये बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली त्याबद्दल नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना बेस्ट कॉप ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांच्या विशेष कार्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन चा सर्व स्टाफ त्याचबरोबर माझी जि प सदस्य शरद नवले पत्रकार देविदास देसाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे तिरंगा न्यूज संपादक अस्लम बिनसाद पत्रकार दिलीप दायमा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा आदींनी बडे याचे अभिनंदन केले आहे
Post a Comment